For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Manipur Violence : महिलांच्या नग्न अवस्थेतील 'त्या' व्हिडीओवर बॉलिवूडचा संताप!

05:39 PM Jul 20, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
manipur violence   महिलांच्या नग्न अवस्थेतील  त्या  व्हिडीओवर बॉलिवूडचा संताप
Advertisement

Manipur violence : मणिपूर येथे गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. येथील नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओने देशभरात खळबळ उडाली आहे. माणुसकीला लाजवेल असा हा व्हिडीओ आहे. पुरूषांच्या टोळीने यामध्ये दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढली. यावर देशात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत सेलिब्रिटीही काही गप्प बसले नाहीयेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसह इतर सेलिब्रिटींनीही या घटनेचा निषेध करत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (Akshay Kumar and Many More Bollywood Celebrities on Manipur violence nude video of two women)

Advertisement Whatsapp share

मणिपूर व्हायरल व्हिडीओवर सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया

अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करून पीडितांना न्याय देण्याची मागणी केली आहे. त्याने लिहिलं, 'मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी हादरलो. मला आशा आहे की दोषींना इतकी कठोर शिक्षा दिली जाईल की कोणीही पुन्हा असे घृणास्पद कृत्य करण्याचा विचार करू शकणार नाही.'

Advertisement

Manipur: जमावाकडून महिलांची नग्न धिंड, गँगरेप आणि खून… मणिपूरमध्ये काय घडलं?

तसंच अभिनेत्री रेणुका शहाणेही काही गप्प बसल्या नाहीत. त्या त्यांच्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. मग, मणिपूरच्या हिंसाचारावर त्या कशा गप्प राहातील. त्यांनी सरकारला फटकारले आणि जनतेवर होत असलेल्या अत्याचारावर प्रश्न उपस्थित केले. रेणुका शहाणेंनी लिहिलं, 'मणिपूरमध्ये होणारे अत्याचार रोखणारं कोण नाहीये का? या दोन्ही महिलांच्या व्हिडीओने तुम्हाला धक्का बसला नसेल तर तुम्ही माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहात का? भारतीय असणे ही दूरचीच गोष्ट आहे.'

Advertisement सब्सक्राइब करा

ग्लॅमर बोल्ड गर्ल उर्फी जावेदने एका इंस्टा पोस्टमध्ये लिहिले, 'मणिपूरमध्ये जे काही घडते ते लज्जास्पद आहे. मणिपूरसाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी.'

 

Advertisement

संपूर्ण प्रकरण नेमकं आहे तरी काय?

मणिपूर राज्यातील कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे 2023 रोजीचा हा व्हिडीओ आहे. त्यातच दुसरीकडे काही लोक एकाच समाजातील दोन्ही महिलांना नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरवत आहेत. पुरुष सतत पीडित महिलांचा विनयभंग करत आहेत. तर, पीडित महिला मदतीसाठी ओरडत आहेत. या व्हिडीओनंतर संपूर्ण देशभरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पीडित महिला कुकी या समाजातील आहेत. त्यांची छेडछाड करणारी ही पुरूषांची टोळी मैतेई समाजातील आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज