For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Pushkar Shotri: मराठमोळा अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरात प्रचंड मोठी चोरी, जिच्यावर ठेवला विश्वास तिनेच...

02:32 PM Oct 28, 2023 IST | अजय परचुरे
pushkar shotri  मराठमोळा अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरात प्रचंड मोठी चोरी  जिच्यावर ठेवला विश्वास तिनेच
मराठमोळा अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरात चोरी (फोटो सौजन्य: instagram)
Advertisement

Pushkar Shrotri house lady housekeeper stole gold: मुंबई: मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri) याच्या मुंबईतील (Mumbai) घरातून तब्बल 10 लाखांहून अधिकचा ऐवज चोरी झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. पुष्करच्या घरीच काम करणाऱ्या महिलेने ही चोरी केल्याची माहिती आता समोर आली आहे. याप्रकरणी पुष्करच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी महिला उषा गांगुर्डे (वय 41 वर्ष) हिला तिच्या पतीसह अटक करण्यात आली आहे. (burglary in marathi actor pushkar shrotri house housekeeper stole gold worth rs 10 lakh)

Advertisement Whatsapp share

मुंबई Tak शी बोलताना पुष्कर काय म्हणाला?

दरम्यान, या प्रकरणी मुंबई Tak ने अभिनेता पुष्कर श्रोत्रीशी संपर्क साधला असताना त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यावेळी पुष्कर म्हणाला की, 'मुबंईतील घरात कोणीही नसताना मोलकरणीने ही चोरी केल्याचं पुष्करने यावेळी सांगितलं. पुष्कर हा काही कामानिमित्त अमेरिकेत होता तर त्याची पत्नी ही दुबईत होती. याच गोष्टीचा फायदा घेत मोलकरणीने घरातील सोनं आणि लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी मोलकरणीला अटक देखील केली आहे. या प्रकरणी आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला आहे. मात्र, चोरीची दागिने आपण वेगवेगळ्या ठिकाणी विकले असल्याचे तिने यावेळी आपल्या जबाबात सांगितलं आहे.' अशी माहिती पुष्करने दिली.

Advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुष्करच्या मुंबईतील घरात मागील सहा महिन्यांपासून उषा गांगुर्डे ही महिला घरकाम करत होती. घरकाम आणि पुष्करच्या वडिलांची काळजी घेण्यासाठी तिला ठेवण्यात आलं होतं. पण काही दिवसांपूर्वीच घरात कोणीच नाही या गोष्टीचा फायदा घेत उषाने घरातील 1.20 लाख रुपयांची रोकड आणि तब्बल 10 लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास केले होते.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >> Crime: 75 वर्षांच्या सासऱ्यासोबत सुनेचे अनैतिक संबंध, नंतर सासऱ्याच्या गुप्तांगावरच केले वार!

22 ऑक्टोबर रोजी पुष्करच्या पत्नीला घरातील पैसे चोरी झाल्याचा संशय आला. त्यामुळे तिने या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी घरातील मोलकरीण उषा गांगुर्डे हिची चौकशी केली. तेव्हा तिने आपणच चोरी केली असल्याचं पोलिसांना सांगितलं. तसेच हे पैसे आपण आपला पती भानुदास गांगुर्डे याला दिल्याचं म्हटलं.

मात्र, यावेळी घरातील दागिने चोरल्याची कबुली काही आरोपी उषा हिने पोलिसांना दिली नव्हती. याच्या दोन दिवसांनी म्हणजेच 24 ऑक्टोबरला पुष्करच्या पत्नी घरातील दागिने तपासले तेव्हा त्यात काही तरी गडबड असल्याचं तिला वाटलं. त्यामुळे ते दागिने घेऊन तिने सोनाराचं दुकान गाठलं. जिथे त्यातील काही दागिने हे बनावट असल्याचं तिला समजलं.

Advertisement

त्यामुळे पुष्कराच्या पत्नीने पुन्हा पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार नोंदवली. यावेळी उषाने पुन्हा आपणच सोन्याची चोरी केल्याचं पोलिसांना सांगितलं. पण कोणाला संशय येऊ नये म्हणून तशाच प्रकारचे बनावट दागिने बनवून त्या ठिकाणी ठेवल्याचं आरोपी उषाने सांगितलं. पण चोरी केलेले दागिने वेगवेगळ्या ठिकाणी विकले असल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे आता विकलेले दागिने शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

हे ही वाचा >> OYO रूममध्ये प्रियकरासोबत पोहोचली विवाहित प्रेयसी, चेकआऊटवेळी दोघंही आढळले भयानक अवस्थेत!

याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी आरोपी उषा आणि तिच्या पतीविरोधात कलम 381, 31, 406, 420 अंतर्गंत गुन्हा नोंदवला असून दोघांनाही अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज