For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

कोब्राचं विष, ड्रग्ज, तरुणी; एल्विश यादवच्या पार्टीत काय असतं? मित्राने सांगितली Inside Story

09:06 AM Nov 08, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
कोब्राचं विष  ड्रग्ज  तरुणी  एल्विश यादवच्या पार्टीत काय असतं  मित्राने सांगितली inside story
Elvish Yadav Friend dg immortal Opens up About his party style and many more
Advertisement

Elvish Yadav Party Inside Story : डीजी इमॉर्टल उर्फ ​​दिग्विजय मेहरा हे हरियाणा म्यूझिक इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव आहे. अलीकडेच त्याने एल्विश यादवसोबत (Elvish Yadav) सिस्टम आणि छोरा हरियाणा ही गाणी रिलीज केली आहेत. डीजी आणि एल्विश यांच्यातील बाँडिंगवर अनेक गोष्टी बोलल्या जातात. अशावेळी डीजीने एल्विश यादवच्या त्या पार्टीबद्दल आणि त्यांच्यातील मैत्रीबद्दल सांगितलं आहे. (Elvish Yadav Friend dg immortal Opens up About his party style and many more)

Advertisement Whatsapp share

मिळालेल्या माहितीनुसार, डीजी इमॉर्टल म्हणला की, 'एल्विश आणि मी एकत्र खूप काम केलं आहे. त्याच्यासोबत मी आमचं पहिलं गाणं सिस्टम बनवलं होतं. एल्विश हा याराचा यार आहे. त्याने आजूबाजूच्या लोकांनाही नेहमीच मदत केली आहे.'

Advertisement

वाचा : Glenn Maxwell : वेदनेने कासावीस, तरीही खेळला; मॅक्सवेलने मोडला कपिल देव यांचा विक्रम

'एल्विशसोबत बोलणं झालं...' मित्राने नेमकं काय सांगितलं?

जेव्हा डीजीला असा प्रश्न विचारण्यात आला की, मित्राला या वादात पाहिल्यानंतर त्याला याबाबत काय वाटतं? यावर डीजा म्हणाला, 'काही दिवसांपूर्वीच माझं एल्विशशी बोलणं झालं. मी विचारलं की बाहेर एवढी सर्व चर्चा सुरू आहे. तू ठीक आहेस का? यावेळी तो हेच म्हणाला की, या सर्व बातम्या खोट्या आहेत. मला माहित नाही, हे सर्व माझ्यासोबत घडत राहते. यात तथ्य नाही. माझ्याशी नेहमी वाद जोडला गेला आहे.'

Advertisement सब्सक्राइब करा

वाचा : Glenn Maxwell च्या द्विशतकाची कमाल! अफगाणिस्तानच्या हाता-तोंडाशी आलेला विजय आणला खेचून

डीजी पुढे म्हणाला, 'ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याच्यावर कुंड्या चोरल्याचेही आरोप लावले गेले आहेत. जितके लोक तितक्या गोष्टी घडत आहेत. तुम्ही मला सांगा, एल्विशला हे सर्व करण्याची गरज का आहे? लोक म्हणतात की तो ड्रग्ज विकतो... पण त्याला हे सर्व करण्याची गरज नाही. तो चांगला कमावतो. त्याच्याकडे पैशाची कमतरता नाही. तो असे का करेल? एक दिवस सत्य नक्कीच बाहेर येईल याची खात्री आहे. सत्यासमोर काहीही टिकू शकत नाही. हे सर्व त्याच्या द्वेष करणाऱ्यांचे काम आहे. त्यांना त्याला उंचावर जाताना पाहायचे नाही.'

एल्विशच्या पार्टीत नेमकं होतं तरी काय?

डीजी म्हणाला, 'मी त्याच्यासोबत बँकॉकमध्ये यापूर्वीची पार्टी केली होती. आमची पार्टी खूप आरामात झाली. मीडियामध्ये ज्या प्रकारच्या पार्टीचा उल्लेख केला जात आहे, तसं तर होत नाही. आम्ही खातो, पितो आणि मजा करतो आणि घरी जातो. साप, परदेशी मुली किंवा ड्रग्ज असा शो ऑफ काही होत नाही. ही पार्टी साधीच होती. मी काही दिवसात एल्विशला भेटणार आहे. आम्ही नक्कीच बोलू आणि सत्य समोर आणू.'

Advertisement

वाचा : काय? कुत्र्यासारखा दिसणारा साप, व्हिडिओ पाहून डोकं चक्रावेल

एल्विशच्या सापांसोबतच्या फोटोंवर स्पष्टिकरण देत डीजी म्हणाला, 'हे चित्र बँकॉकचे आहे. या शूटमध्ये मी ही हजर होतो. लोकांनी ते खूपच रंगवलं. हे सापाचे फोटो आमच्या एका व्हिडीओ शूटचा भाग होता.'

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज