For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

'Gadar 2' चित्रपटाचा महाभारत-रामायणाशी खास कनेक्शन, दिग्दर्शकाने केला खुलासा!

05:41 PM Jul 27, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
 gadar 2  चित्रपटाचा महाभारत रामायणाशी खास कनेक्शन  दिग्दर्शकाने केला खुलासा
Advertisement

Gadar 2 : Sunny Deol : अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'गदर 2' चा ट्रेलर बुधवारी 26 जुलै रोजी प्रदर्शित झाला. यावेळी ट्रेलरमध्ये तारा सिंगची दमदार अ‍ॅक्शन पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. तारा सिंग आणि सकिना यांची जोडी आता मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेलर लॉन्च दरम्यान, स्टारकास्ट आणि मेकर्सना चित्रपटाशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. यादरम्यान दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी या चित्रपटासाठी 'महाभारत' आणि 'रामायण'पासून प्रेरणा घेतली आहे. (Gadar 2 film's special connection with Mahabharata-Ramayana director Anil Sharma revealed)

Advertisement Whatsapp share

'गदर 2' चा महाभारत-रामायणाशी नेमक कनेक्शन काय?

'गदर 2' हा 2001 मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'गदर एक प्रेम कथा'ला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. तर आता 'गदर 2' च्या ट्रेलरमध्ये चाहत्यांना तारा सिंगची पूर्वीपेक्षा दमदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. ट्रेलर लॉन्चच्या वेळी सनीला विचारण्यात आले की, तू चित्रपटात अभिमन्यू चक्रासह अवजड वाहनाचे चाक उचललं आहेस. महाभारतात अर्जुनाने भगवान कृष्णासोबत युद्ध केले होते त्याचप्रकारे चित्रपटात तू आणि उत्कर्ष मैदानात लढताना दिसलात. हा चित्रपट महाभारतातून प्रेरित आहे का?

Advertisement

Pune Crime News : 12 वर्षाच्या मुलाला खायला लावली कबुतराची विष्टा

यावर प्रतिक्रिया देताना चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले, 'होय, मी महाभारतापासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट रामायण आणि महाभारत या महाकाव्यांवरून खूप प्रेरित आहे.' ते पुढे म्हणाले, 'स्टोरी तर मी रामायण, महाभारतातूनच घेतो. यापूर्वीचा चित्रपटही रामायण होता. सीतेला नेण्यासाठी राम लंकेत येतो. यामध्येही पाहा पुढे काय होतं. जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्ही त्याच्याशी रिलेट करू शकाल.'

Advertisement सब्सक्राइब करा

‘अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील’, प्रफुल पटेलांचं विधान

कसा आहे ट्रेलर?

गदर 2 च्या ट्रेलरमध्ये भावनांसोबतच अॅक्शन पॅक्ड ड्रामाही दिसतोय. जो चाहत्यांना आवडला आहे. यावेळी चित्रपटाची कथा तारा सिंग आणि त्यांचा मुलगा चरणजीत यांच्याभोवती फिरताना दिसणार आहे. वडील आणि मुलाचे अतूट नाते चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट 1970 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान दाखवण्यात आला आहे.

यावेळी सनीला एक नाही तर दोन खलनायकांचा सामना करावा लागणार आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तारा सिंह पुन्हा पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवणार आहेत.

Advertisement

2001 मध्ये आलेल्या गदर चित्रपटाचे बजेट सुमारे 19 कोटी रुपये होते. तर गदर 2 चे बजेट जवळपास 100 कोटी असण्याचा अंदाज आहे.

Pune Crime : पत्नी-पुतण्याला का घातल्या गोळ्या? कारण येणार समोर, पोलिसांना तपासाचा मार्ग सापडला

'गदर' चित्रपटाच्या पहिल्या भागाने रचला होता विक्रम!

'गदर 2' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आहे. हे पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. त्याचवेळी, ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम दिसली. चित्रपटाच्या पहिल्या भागाने अनेक रेकॉर्ड तोडले. एवढेच नाही तर 'गदर'च्या नावावर एक विश्वविक्रमही आहे. माहितीनुसार, सनी देओलचा हा एकमेव चित्रपट आहे ज्याने 10 कोटी तिकिटांची विक्री केली आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज