For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

MNS : ''मी नास्तिक, पण प्रभू रामाचा...'', जावेद अख्तर काय म्हणाले?

04:47 PM Nov 10, 2023 IST | प्रशांत गोमाणे
mns     मी नास्तिक  पण प्रभू रामाचा       जावेद अख्तर काय म्हणाले
javed akhtar bollywood actor on raj thackeray mns diwali celebration prabhu ram and sita hindutva
Advertisement

Javed Akhtar on Hindutv : प्रभू राम आणि माता सीता यांच्या भूमीवर माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे. मी नास्तिक असलो तरी मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा खूप आदर करतो, असे विधान ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी केले आहे. जावेद अख्तर (Javed Akhtar) मनेसच्या शिवाजी पार्कवरील दीपोत्सव कार्यक्रमात बोलत होते.(javed akhtar bollywood actor on raj thackeray mns diwali celebration prabhu ram and sita hindutva)

Advertisement Whatsapp share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्कात दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान, अभिनेता रितेश देशमुख,आशुतोष गोवारीकर, शर्मिला ठाकरे मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह अनेक मनविसे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना जावेद अख्तर यांनी वरील विधान केले. मी नास्तिक असलो तरी मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा खूप आदर करतो. प्रभू राम आणि माता सीता यांच्या भूमीवर माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे. भगवान श्रीराम हे आपल्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा भाग आहेत.रामायण हाही आपला सांस्कृतिक वारसा आहे, त्यामुळेच मी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलो असल्याचे जावेद अख्तर यांनी सांगितले.

Advertisement

हे ही वाचा : Maratha Reservation : ”ही तर भुजबळांची फजिती”, जरांगे पाटलांनी डिवचलं

जेव्हाही आपण मर्यादा पुरुषोत्तम बद्दल बोलतो तेव्हा फक्त भगवान श्री राम आणि माता सीता लक्षात येते. सीता आणि राम हे प्रेमाचे प्रतीक आहेत, त्यांची नावे वेगळी घेणे पाप आहे. ज्याला त्यांना वेगळे करायचे होते तो रावण होता. जर तुम्ही फक्त एकाचे नाव घेतले तर तुमच्याही आत कुठेतरी रावण दडलेला आहे. मला आठवतं की लखनऊमध्ये जेव्हा लोक सकाळी फिरायला जायचे तेव्हा जय सिया राम म्हणत एकमेकांना शुभेच्छा देत असत, असेही जावेद अख्तर यांनी सांगितले.

Advertisement सब्सक्राइब करा

आजच्या काळात असहिष्णुता वाढली आहे. यापूर्वीही काही लोक होते ज्यांच्यात सहनशीलता नव्हती. देशात सहिष्णुता फक्त हिंदूंमुळे आहे. हिंदूंची विचारसरणी खूप मोठी आहे, त्यांनी आपली विचारसरणी मोठी ठेवावी आणि ती बदलू नये, असे जावेद अख्तर म्हणाले आहेत. तसेच आजच्या काळात आमचा शोले चित्रपट बनला असता तर मंदिराच्या दृश्यावरून वाद झाला असता. कदाचित सलीम साहब आणि मी तो सीन लिहू शकलो नसतो, असेही जावेद अख्तर यांनी सांगितले.

हे ही वाचा : Maratha Reservation : उदयनराजेंच्या साताऱ्यात 20 हजार, तर शंभूराज देसाईंच्या पाटणमध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी!

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज