For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

'आपले नेते अडाणी', ठाकरेंची खासदार काजोलच्या मदतीला धावली

04:10 PM Jul 09, 2023 IST | मुंबई तक
 आपले नेते अडाणी   ठाकरेंची खासदार काजोलच्या मदतीला धावली
Advertisement

Actress Kajol Contraversial Statement : अभिनेत्री काजोल ही हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या दमदार अभिनय आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. काजोल नेहमीच आपले मुद्दे उघडपणे मांडत असते. पण यावेळी, तिने असं काही विधान केलं ज्यामुळे तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काजोलने तिच्या एका वक्तव्यात देशातील नेत्यांना अशिक्षित म्हटलं आहे, ज्यावरून एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडिया यूजर्स काजोलला तिच्या व्हायरल कमेंटवर प्रचंड ट्रोल करत आहेत. आता तिनेही ट्रोलिंगवर आपले मौन सोडलं आहे. (Leaders are not educated netizens angry after Kajol's controversial statement MP Priyanka Chaturvedi Takes her side)

Advertisement Whatsapp share

देशातील नेत्यांवर काजोलची टीका!

काजोल लवकरच 'द ट्रायल' या वेब सीरिजद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. वेब सीरिजमध्ये झळकणारी काजोल सध्या जोरदार प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान, एका मुलाखतीत तिने देशातील नेत्यांचे शिक्षण आणि कामाची मंद गती यावर भाष्य केलं, ज्यावर लोक संतापले आहेत.

Advertisement

वाचा : शिवसेना आमदारांना नोटिसा, ठाकरे म्हणाले, ‘…तर आम्ही कोर्टात जाऊ’

नेत्यांवर टीका करताना काजोल म्हणाली, 'भारतसारख्या देशात घडणाऱ्या बदलांची गती ही मंद आहे. कारण आपण आपल्या परंपरा आणि विचारांमध्ये मग्न आहोत आणि अर्थातच त्याचा संबंध शिक्षणाशीही आहे.'

Advertisement सब्सक्राइब करा

काजोल पुढे म्हणाली, 'तुमच्याकडे असे राजकीय नेते आहेत ज्यांची कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. मला याचा खेद आहे, पण मी बाहेर जाऊन हे सांगणार आहे. देशावर राजकारण्यांची सत्ता आहे. यातील अनेक नेते असे आहेत की त्यांच्याकडे योग्य दृष्टीकोनही नाही, जो केवळ शिक्षणातून येतो.'

वाचा : ‘भाजप-शिवसेना युती तुटण्यामागे शरद पवारांची डील’; भुजबळांनी टाकला नवा ‘बॉम्ब’

नेटकऱ्यांचा काजोलवर संताप

नेत्यांच्या शिक्षणावर काजोलचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काजोलला ट्रोल करताना एका यूजरने लिहिलं, 'प्रिय काजोल, विशिष्ट टोनमध्ये इंग्रजी बोलणे म्हणजे शिक्षण नाही. हे एक कौशल्य असू शकते. आपल्याकडे अश्विनी वैष्णव, डॉ. जयशंकर, निर्मला मॅम, किरण रिज्जू, पियुष गोयल, नितीन गडकरी यांसारख्या सुशिक्षित नेत्यांचे राज्य आहे पण दुर्दैवाने त्यांना तुमच्यासारखं इंग्रजी बोलता येत नाही. थोडी लाज बाळगा.'

Advertisement

आणखी एका यूजरने काजोलला ट्रोल करत तिला आठवण करून दिली की, तिने स्वतः शाळा सोडलेली आहे.

नेत्यांवरील विधानानंतर काजोलचे स्पष्टीकरण

ट्रोल झाल्यानंतर काजोलनेही ट्विटद्वारे तिच्या व्हायरल वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. तिने ट्विट करत लिहिलं, 'मी फक्त शिक्षण आणि त्याचे महत्त्व यावर बोलत होते. कोणत्याही राजकीय नेत्याचा अपमान करणे हा माझा उद्देश नव्हता. आपल्याकडे असे काही महान नेते आहेत जे देशाला योग्य मार्गावर घेऊन जात आहेत.'

वाचा : ‘तुम्ही 50 ठिकाणी माफी मागणार आहात का?’, छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल

काजोलच्या विधानावर प्रियांका चतुर्वेदीही स्पष्टच म्हणाल्या...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही आता काजोलच्या वक्तव्यावर आपले मत मांडले आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं, 'तर काजोलचं म्हणणं आहे की आपल्यावर अशिक्षित आणि दूरदृष्टी नसलेल्या नेत्यांचे राज्य आहे. कोणीही नाराज नाही, कारण हे त्यांचे मत आहे, सत्य नाही. तिने कोणाचेही नाव घेतलं नसून तरीही सर्व भक्त संतप्त झाले आहेत.' असं ट्वीट करत प्रियांका चतुर्वेदींनीही भाजपवर निशाणा साधला.

काजोलच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती 'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ही वेब सिरीज 14 जुलैला रिलीज होणार आहे. 'द ट्रायल' हा अमेरिकन कोर्टरूम ड्रामा 'द गुड वाईफ'चे हिंदी व्हर्जन आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज