For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Lust Story 2 : काजोलसोबत इंटीमेट सीनवेळी कुमुद मिश्रा घाबरले, सांगितला अनुभव

06:26 PM Jun 30, 2023 IST | मुंबई तक
lust story 2   काजोलसोबत इंटीमेट सीनवेळी कुमुद मिश्रा घाबरले  सांगितला अनुभव
Advertisement

Kumud Mishra : 'लस्ट स्टोरी 2'मध्ये काजोलसोबत कुमुद मिश्रा दिसणार आहेत. चित्रपटातील कुमुद यांची व्यक्तिरेखा त्यांच्या सध्याच्या प्रतिमेपेक्षा खूपच वेगळी आणि बोल्ड आहे. त्यांचे बोल्ड सीन आहेत. कुमुद मिश्रा यांनी चित्रपटाच्या शूटिंगवेळी काय घडलं तो अनुभव शेअर केला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. (Lust Story 2 Kumud Mishra got scared during an intimate scene with Kajol says his Experience)

Advertisement Whatsapp share

लस्ट स्टोरी 2 साठी ज्यावेळी तुम्हाला ऑफर मिळाली तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? असा प्रश्न कुमुद यांना विचारला असता ते म्हणाले की, 'लस्ट स्टोरी ची स्क्रिप्ट आली तेव्हा मला ती वाचायला खूप इंटरेस्टींग वाटली. साहजिकच मी अशा प्रकारचे काम केले नव्हते, त्यामुळे काही गोष्टी होत्या ज्याबद्दल मला शंका होती. हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत असल्याने मला सर्व जाणून न घेता पुढे जायचे नव्हते. मी दिग्दर्शकाला भेटलो, आमच्यात खूप चर्चा झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही त्या दृश्यांबद्दल बोलत नव्हतो जे मला अवघड वाटले. तसंच, त्याच्याशी झालेल्या संभाषणात, मला त्याच्या हेतूची कल्पना आली.'

Advertisement

आक्रोश अन् अश्रुंचा पूर! डोळ्यासमोर गमावली चार लेकरं; पावसाने कुटुंब केलं उद्ध्वस्त

'याबाबत आम्ही अनेक बैठकी घेतल्या. माझ्या आणि त्यांच्या स्क्रिपटींग टीममध्ये स्क्रिप्टवरून चर्चा झाली, त्यावरून प्रेक्षक हे गांभीर्याने घेत असल्याचे समजले. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला असे आढळून येईल की त्यात अनेक भाग आहेत, ज्यांमध्ये भावना आणि नातेसंबंध अतिशय गुंतागुंतीच्या पद्धतीने दाखवले आहेत.'

Advertisement सब्सक्राइब करा

बोल्ड सीन्स करताना कोणता संकोच वाटला का?

'संकोच नक्कीच होता. माझे वय २१ वर्षे नाही, वय झाले आहे आणि अशा स्थितीत अशा दृश्यांबाबत मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. हे सीन्स करताना मी पूर्ण कलाकार बनलो. संकोच फक्त बोल्ड सीनमध्येच होत नाही, अनेक वेळा तुम्ही सामान्य सीनमध्येही या परिस्थितीतून जाता. असेही घडते की तुम्ही सामान्य दृश्ये करत आहात, परंतु ते करू शकत नाही. इथे मला सुरुवातीला संकोच वाटला थोडा मी घाबरलोही पण, माझी सहकलाकार काजोल होती. तिच्या कोणत्याही कामात प्रश्नच नाही आहे. तिची कामगिरी जबरदस्त आहे. आम्हा कलाकारांना तो टप्पा गाठायला अनेक वर्षे लागतात.

ज्येष्ठ नागरिकांचा एसटीतून मोफत प्रवास, शिंदे सरकारची जाहिरात चर्चेत का?

इतकी वर्षे काम केल्यानंतर सहकलाकारांना कसे सामोरे जायचे, त्यांच्याशी कसे वागायचे हे तिला माहीत आहे. सर्वात मोठा प्लस पॉइंट काजोलचा होता. तिच्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या आणि एकदा का सेटवर एकत्र काम करायला सुरुवात केली की हळूहळू कम्फर्ट तयार होतो.'

Advertisement

काजोलसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना भेट कशी झाली?

'मी जेव्हा काजोलला पहिल्यांदा भेटलो तेव्हा ती तिचा स्वभाव खूप मनमोकळा होता. पहिल्या भेटीतच पुढचे काम सोपे होणार असं वाटले. ती अशी अप्रतिम अभिनेत्री आहे जी तिच्यासोबतच्या कलाकारांसाठी सपोर्टिव्ह ठरते.'

शरद पवारांच्या ‘त्या’ गुगलीवर गेली अजित पवारांची विकेट? फडणवीस ‘सेफ’?

चित्रपटातील भूमिकेवर कुटुंबाची विशेष म्हणजे मुलाची प्रतिक्रिया काय होती?

'माझ्या कुटुंबातील कोणीही ते अद्याप पाहिलेले नाही. मुलगा खूप लहान आहे, साहजिकच त्याने चित्रपट पाहावा असे मला वाटत नाही. तो अजूनही 14 वर्षांचा आहे, मी कुटुंबाच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. अनेकवेळा ते त्या विषयावर बोलत नाही, तेव्हा मला समजते की त्यांना तो आवडला नसावा. माझ्या कामावर ते चांगला प्रतिसाद देतील एवढीच माझी इच्छा आहे. माझी पत्नीही अभिनेत्री आहे, ती कधी बोलते तर कधी गप्प राहते. जेव्हा ती गप्प असते तेव्हा मला तिच्याशी बोलावं लागतं. मग आम्ही चर्चा करतो.'

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज