For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

प्रसिद्ध अभिनेत्याचा बंद कारमध्ये सापडला मृतदेह! पोलिसांनी सांगितली धक्कादायक माहिती

11:11 AM Nov 19, 2023 IST | mahadev kamble
प्रसिद्ध अभिनेत्याचा बंद कारमध्ये सापडला मृतदेह  पोलिसांनी सांगितली धक्कादायक माहिती
चित्रपट जगतात आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटविणाऱ्या प्रसिद्ध मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता विनोद थॉमस यांचे वयाच्या 45 व्या वर्षी निधन झाल्यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.
Advertisement

Vinod Thomas Died : चित्रपट जगतात आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटविणाऱ्या प्रसिद्ध मल्याळम चित्रपट (Malayalam Film) अभिनेत्याच्या निधनामुळे (Death) मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता विनोद थॉमस यांचे वयाच्या 45 व्या वर्षी निधन झाल्यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. पंपाडीजवळील हॉटेलमध्ये उभ्या असलेल्या कारमध्येच विनोद थॉमस हे मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटकडून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत तपासाला सुरुवात केली आहे.

Advertisement Whatsapp share

कारमध्येच झाला मृत्यू

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हॉटेल प्रबंधनच्या मॅनेजमेंटकडून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारमध्ये गेल्या काही तासांपासून एक व्यक्ती दिसून येत असल्याचे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन विनोद थॉमस यांना कारमधून बाहेर काढण्यात आले, व त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Advertisement

मृत्यूचं नेमकं कारण काय?

अभिनेता विनोद थॉमस यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, मात्र अजून त्यांच्या मृत्यूचे नेमकं कारण समजू शकलं नाही. डॉक्टरांबरोबरच पोलिसही त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधू लागले आहेत.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >>IND vs AUS Final : भारत-ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कपची फायनल लढत! खेळपट्टी आणि हवामान कसं आहे?

दमदार अभिनय

विनोद थॉमस हे मल्याळम चित्रपटातील एक दिग्गज कलाकार होते. त्यांनी 'अय्यप्पनम कोस्युम', 'नाथोली ओरू चेरिया मीनाल्ला', 'ओरू मुराई वंथ पथया', 'हॅपी वेडिंग' आणि 'जून' यासारख्या चित्रपटांतून त्यांनी काम केले होते. त्यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटसृष्टीत त्यांची एक वेगळी ओळख होती.

विनोद थॉमसचा मृत्यू धक्कादायक

अभिनेता विनोद थॉमस यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. विनोद आता आपल्यामध्ये नाहीत यावर अजूनही कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. तसेच त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरुनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तर त्यांच्या निधनाची बातमी ही साऱ्यांसाठी धक्कादायक असल्याची भावना त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : ‘देशात मोदी-शहाच निवडणूक आयोग बनलाय’, ठाकरेंचा सामनातून हल्ला

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज