For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Atul Parchure : 'कर्करोग अन् चुकीच्या उपचारांने प्रकृती..' मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा!

02:42 PM Jul 16, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
atul parchure    कर्करोग अन् चुकीच्या उपचारांने प्रकृती    मराठी अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
Advertisement

Marathi Actor Atul Parchure : अनेक वेळा पडद्यावर आपल्या अभिनयाने लोकांना हसवणारे चेहरे अनेक समस्यांशी झगडताना दिसतात. मराठमोळे अभिनेते आणि 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) फेम अतुल परचुरे (Atul Parchure) यांच्याबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या विनोदांनी आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे अतुल परचुरे कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराशी झुंज देत आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे. (Marathi actor Atul Parchure's shocking revelation that cancer and wrong treatment worsened his health)

Advertisement Whatsapp share

मराठी सुप्रसिद्ध अभिनेता अतुल परचुरे यांचा धक्कादायक खुलासा!

एका मुलाखतीत अतुल यांनी त्यांच्या आजाराशी संबंधित एक दुःखद कहाणी सर्वांसोबत शेअर केली. ते म्हणले की, 'माझ्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली होती. तेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होतो. त्यावेळी मी ठीक होतो. पण काही दिवसांनी मला जेवताना त्रास जाणवू लागला. मला जाणवलं की काहीतरी गडबड आहे. तब्येत बिघडल्यावर भावाने औषधं आणून दिली, पण त्याचा काही फायदा झाला नाही.'

Advertisement

वाचा : राष्ट्रवादीत पुन्हा मोठ्या घडामोडी, अजित पवारांसह सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला

अतुल परचुरे पुढे म्हणाले, 'मी अनेक डॉक्टरांकडे गेलो. यानंतर माझी अल्ट्रासोनोग्राफी झाली. यादरम्यान डॉक्टरांच्या डोळ्यात भीती दिसली. तेव्हा मला वाटले की काहीतरी गडबड आहे. तेव्हा मला कळले की माझ्या लिव्हरमध्ये 5 सेमी लांबीची गाठ आहे आणि ती कर्करोगाची आहे. मी डॉक्टरांना विचारले की, मी बरा होईल की नाही? भविष्यात सर्व काही ठीक होईल, असं त्यावेळी डॉक्टरांनी मला सांगितलं. पण उपचाराचा माझ्यावर विपरीत परिणाम झाला आणि माझी प्रकृती पूर्वीपेक्षा जास्तच खालावली. शस्त्रक्रियेलाही विलंब झाला.'

Advertisement सब्सक्राइब करा

अतुल परचुरेंच्या तब्येतीवर उपचारांचा विपरीत परिणाम

अतुल सांगतात, 'हा आजार योग्य वेळी ओळखला गेला. पण उपचाराची पहिली प्रक्रिया चुकली. माझ्या स्वादुपिंडावर याचा परिणाम झाला. त्यामुळे वेदनाही वाढल्या होत्या. योग्य उपचार न मिळाल्याने माझी प्रकृती बिघडली होती. मला नीट बोलताही येत नव्हते. बोलतांना जीभ लटपटायची. डॉक्टरांनी सांगितले की, या स्थितीत मला थोडा वेळ थांबावे लागेल. शस्त्रक्रिया केल्यास कावीळ होण्याची भीती होती. माझ्या लिव्हरमध्ये पाणी भरल्यामुळे माझा मृत्यूही होऊ शकत होता. त्यानंतर मी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार घेतले.'

वाचा : Maharashtra CM : फडणवीसांना पहिली पसंती! उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना ठरले भारी

अतुल हे एक लोकप्रिय मराठी अभिनेता आहेत, जे बऱ्याच काळापासून द कपिल शर्मा शोचा एक भाग आहेत. ते म्हणाले, 'मी बऱ्याच दिवसांपासून द कपिल शर्मा शो करत आहे. सुमोनाच्या वडिलांच्या भूमिकेसाठी मला बोलावलं होतं. पण कॅन्सरमुळे मी जाऊ शकलो नाही. कॅन्सर झाला नसता तर कपिलसोबत आंतरराष्ट्रीय ट्रीपलाही गेलो असतो. आता रिपोर्ट आल्यावर समजेल की मी पूर्वीपेक्षा बरा झालो की नाही.'

Advertisement

वाचा : अजित पवार गटाची शरद पवारांसोबत तासभर बैठक कशासाठी? प्रफुल पटेल म्हणाले…

'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' व्यतिरिक्त 56 वर्षीय अतुल 'आर.के. लक्ष्मण की दुनिया, 'जागो मोहन प्यारे' आणि 'भागो मोहन प्यारे' यांसारख्या शोमध्येही दिसले आहेत.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज