For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Jane Dipika Garrett: ही प्लस साइज मॉडेल कोण, का सुरू आहे हिची जगभर चर्चा?

08:35 PM Nov 17, 2023 IST | मुंबई तक
jane dipika garrett  ही प्लस साइज मॉडेल कोण  का सुरू आहे हिची जगभर चर्चा
प्लस साइज मॉडेल Jane Dipika Garrett ची जगभर चर्चा (फोटो सौजन्य: @jadedipika_ Instagram)
Advertisement

Jane Dipika Garrett Plus Size Model: सध्या सर्वत्र मिस युनिव्हर्स 2023 (Miss Universe 2023) स्पर्धेची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत जेन दीपिका गॅरेट (Jane Dipika Garrett) नावाची प्लस साइज मॉडेल (plus size model) देखील सहभागी झाली आहे. अलीकडे, एल साल्वाडोरमध्ये मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत जेनला प्रेक्षकांनी पसंत केलं आहे. तिला प्रेक्षकांचाही मोठा पाठिंबा मिळाला. (miss universe 2023 who is jane dipika garrett plus size model connection with nepal discussion happening all over the world

Advertisement Whatsapp share

Advertisement

जेन दीपिका गॅरेट (Jane Dipika Garrett) मिस युनिव्हर्स 2023 मध्ये नेपाळचे प्रतिनिधित्व करत आहे. ती मिस नेपाळ राहिली आहे. या प्रसिद्ध स्पर्धेत सहभागी होणारी जेन ही पहिली प्लस साइज मॉडेल आहे. यासोबत तिने शरीराचा आकार, शरीराची सकारात्मकता आणि स्वीकारार्हता यासंबंधीच्या सर्व स्टिरियोटाइप्स मोडून काढल्या आहेत.

Advertisement सब्सक्राइब करा

मिस युनिव्हर्स 2023 च्या मंचावर प्रेक्षकांनी जेन दीपिका गॅरेटचे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. तिचा आत्मविश्वास आणि शैली पाहण्यासारखी होती. जेन सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चेत आहे. तिने डिझायनर रुबिन सिंगरने बनवलेला सुंदर स्विमसूट परिधान करून रॅम्प वॉक केला आणि तिने आपली प्लस साइज बॉडी फ्लाँट केली.

Advertisement

हे ही वाचा>> Nana Patekar : ‘नाना पाटेकरांचा चाहता, पण…’, टपली खालेल्या तरूणाने सांगितलं नेमकं काय घडलं?

अशा स्थितीत अनेक यूजर्सच्या मनात प्रश्न आहे की जेन दीपिका गॅरेट कोण आहे? जेन दीपिका गॅरेट ही नेपाळची मॉडेल आहे. मॉडेलिंगसोबतच ती नर्स आणि बिझनेस डेव्हलपर म्हणूनही काम करते. ती शारीरिक सकारात्मकता आणि महिलांच्या हार्मोनल आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेसाठी काम करते.

जेन दीपिका गॅरेट सध्या 22 वर्षांची आहे. ती काठमांडू, नेपाळची रहिवासी आहे. तिचा जन्म अमेरिकेत झाला. पूर्वी ती वॉशिंग्टन डीसीमध्ये राहायची. तिने नर्सिंगचे शिक्षण घेतले आणि काठमांडू, नेपाळ येथून बॅचलर डिग्री मिळवली.

जेन दीपिका गॅरेटने 20 मॉडेल्सना हरवून मिस नेपाळचा किताब पटकावला होता. तिने तिच्या मोहकतेने आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता पसरवण्याच्या तिच्या निर्णयाने जजेसची मने जिंकली. विजयानंतर तिने आपल्या वजनाबाबत मोठी गोष्ट सांगितली.

हे ही वाचा>> Deepfake Video: रश्मिका मंदानाचा एवढा बोल्ड व्हिडीओ? हादरवून टाकणारं ‘हे’ प्रकरण काय?

जिंकल्यानंतर जेन दीपिका गॅरेट म्हणाली होती, 'एक कर्व्ही महिला म्हणून जी इतर अनेकांच्या सौंदर्य मानकांमध्ये बसत नाही, आज मी इतर कर्व्ही महिलांचे प्रतिनिधित्व करत आहे. ज्या महिलांना वाढलेले वजन आणि हार्मोनल समस्या यासारख्या गोष्टींचा त्रास होतो. माझा विश्वास आहे की सौंदर्याचे कोणतेही एक मानक नाही, उलट प्रत्येक स्त्री स्वतःहून सुंदर असते.'

हे ही वाचा>>

जेन दीपिका गॅरेटचे अनेक थ्रोबॅक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये तुम्हाला तिचा बदललेला लुक पाहायला मिळतो.

मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत जेन टॉप 10 मध्ये स्थान मिळवेल अशी अपेक्षा आहे. तिच्या आधी नेपाळच्या मनिता देवकोटा हिने 2018 मध्ये टॉप 10 मध्ये स्थान मिळवले होते.

सर्व फोटो: जेन दीपिका गॅरेट / @jadedipika_ Instagram

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज