For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Miss Universe Winner : निकारागुआच्या शेनिस पॅलासिओसने जिंकला 'मिस युनिव्हर्स'चा किताब

11:54 AM Nov 19, 2023 IST | प्रशांत गोमाणे
miss universe winner   निकारागुआच्या शेनिस पॅलासिओसने जिंकला  मिस युनिव्हर्स चा किताब
miss universe 2023 winner is sheynnis palacios from nicaragua share video miss universe
Advertisement

Sheynnis Palacios Miss Universe 2023 Winner : मिस युनिव्हर्स 2023 च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये निकारागुआची (Nicaragua) शेनिस पॅलासिओस (sheynnis palacios) 72 वी मिस युनिव्हर्सची विजेती (Miss Universe 2023 Winner) ठरली आहे. जगभरातील सौंदर्यवतींना मागे टाकत तिने हा मुकुट आपल्या नावावर केला आहे. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर शेनिस पॅलासिओस खूप भावूक झाली होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.या संबंधित व्हिडिओही समोर आला आहे. (miss universe 2023 winner is sheynnis palacios from nicaragua share video miss universe)

Advertisement Whatsapp share

यंदा 72 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा एल साल्वाडोरची राजधानी सॅन साल्वाडोर येथील जोस अडोल्फो पिनेडा एरिना येथे पार पडली. मिस युनिव्हर्स स्पर्धेचा नुकताच अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात निकारागुआची शेनिस पॅलासिओस 72 वी मिस युनिव्हर्स 2023ची विजेती घोषित करण्यात आले.

Advertisement

हे ही वाचा : IND vs AUS Final : भारत-ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कपची फायनल लढत! खेळपट्टी आणि हवामान कसं आहे?

Advertisement

मिस युनिव्हर्स 2022 आर बोनी हिने शेनिस पॅलासिओसला मिस युनिव्हर्स 2023 चा मुकुट घातला. मुकुट परिधान केल्यानंतर शानिस पॅलासिओस खूप भावूक झाली होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू स्पष्ट दिसत होते. विशेष म्हणजे मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी शॅनिस पॅलासिओस ही निकारागुआची पहिली महिला ठरली आहे. त्यामुळे 'ब्युटी क्वीन' हे किताब जिंकणे तिच्यासाठी आणखीनच महत्त्वाचे आहे.

हे ही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याचा बंद कारमध्ये सापडला मृतदेह! पोलिसांनी सांगितली धक्कादायक माहिती

या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची मोराया विल्सन ही दुसरी उपविजेती ठरली आहे, तर थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड गी सौदर्य स्पर्धेत प्रथम उपविजेती ठरली.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज