For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Nana Patekar : 'नाना पाटेकरांचा चाहता, पण...', टपली खालेल्या तरूणाने सांगितलं नेमकं काय घडलं?

01:43 PM Nov 17, 2023 IST | प्रशांत गोमाणे
nana patekar    नाना पाटेकरांचा चाहता  पण      टपली खालेल्या तरूणाने सांगितलं नेमकं काय घडलं
nana patekar viral video slapped boy explain what exactly happened whle shooting varanasi
Advertisement

Nana Patekar viral video : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एका तरूणाला टपली मारल्याची घटना घडली होती.या संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर नाना पाटेकरांवर टीका होत होती. या टीकेनंतर आता नाना पाटेकरांनी व्हिडिओ जारी करून माफी मागितली. यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर नाना पाटेकर यांचा मार खालेल्या तरूणाने आपली बाजू मांडली आहे. तसेच या संपूर्ण घटनेमागची सत्यता सांगितली आहे.(nana patekar viral video slapped boy explain what exactly happened while shooting varanasi)

Advertisement Whatsapp share

नाना पाटेकरांनी टपली मारलेल्या या तरूणाने आता पुढे येऊन घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. माझं नाव राज सुनकर आहे. मी बनारसमधील तुलसीपुर येथे राहतो. मी आंघोळ करण्यासाठी गेलो होतो, पण त्यावेळी माझी नजर शूटिंगच्या ठिकाणी पडली. तिथे नाना पाटेकर होते. मी काही वेळ थांबून वाट पाहिली आणि नंतर त्यांच्याजवळ जाऊन फोटो मागितला. पण त्यांनी फोटो देण्यास नकार दिला आणि मला मारुन तिथून पळवलं, असे तरूणाने सांगितले. तसेच मला सिनेमात कोणतीही भूमिका मिळाली नाही. त्यामुळे या घटनेनंतर माझ्या संपूर्ण एरियात माझा अपमान झाला. मी मार खाल्ला आणि तिथून निघून गेलो,, असे देखील तरूणाने म्हटले आहे.

Advertisement

हे ही वाचा : Crime : गर्लफ्रेंडला निर्जनस्थळी बोलावलं अन् गळा चिरला, बॉयफ्रेंडने हत्या का केली?

Advertisement

मी नाना पाटेकरांचा मोठा चाहता आहे. ज्यावेळी त्यांना मी पाहिलं त्यावेळी मला आधी विश्वास बसत नव्हता. पण नंतर आणखीण जवळ जाऊन पाहिल्यानंतर मला हे नाना पाटेकर असल्याचा विश्वास बसला. मी त्यांच्याकडे फोटो काढण्यासाठी जात असताना त्यांच्या बाउंसर्सनी मला अडवलं. पण मी त्यांचा मोठा फॅन आहे, त्यामुळे मी न थांबता त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे गेलो. पण त्यांनी मला मारलं, या प्रकरणी कोणतीही कारवाई होऊ नये, असे आवाहन या तरूणाने केली आहे.

नाना पाटेकर काय म्हणाले?

नाना पाटेकर यांनी देखील या घटनेवर व्हिडिओ जारी करून आपली भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सिनेमाची शुटींग सुरु होती. सीनमध्ये एक मुलगा माझ्यामागून येणार होता आणि मी त्याला मारणार होतो, असा सीन आम्हाला शुट करायचा होता. याबाबत आमची एक रिहर्सल ही झाली होती. दिग्दर्शक म्हणाले पुन्हा रिहर्सल करूया.

हे ही वाचा : मृतावर गोळीबार, सर्जिकल ब्लेडने केल्या जखमा, सुनेचा बदला घेण्यासाठी सासऱ्याने असा रचला कट

आम्ही रिहर्सल सुरु करणार तेव्हढ्यात व्हिडिओत दिसणार मुलगा माझ्या मागून आला आणि मी त्याला मारलं. मला नव्हतं माहिती तो कोण आहे. पण जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी आमचा माणूस नव्हता, असे नाना यांनी सांगितले.

दरम्यान मी मागे वळताच व्हिडिओत दिसणारा मुलगा पळून गेला, त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मी कोणाला मारलेलं नाही. चुक झाली असेल तर माफ करा, कोणाचं मन दु:खावलं गेलं असेल तर माफ करा पण गैरसमज करून घेऊ नका, असे देखील नाना पाटेकर यांनी सांगितले. मी चाहत्यांना कधीही फोटोसाठी नाही म्हणत नाही. असंख्य चाहते माझ्यावर प्रेम करतात. त्यांच्यासोबत मी असं कधीच वागू शकत नाही, असे देखील नाना पाटेकर व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज