For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

नितीन देसाईंनी ND स्टुडिओमध्येच का संपवलं आयुष्य, 'ते' प्रकरण काय?

02:49 PM Aug 02, 2023 IST | मुंबई तक
नितीन देसाईंनी nd स्टुडिओमध्येच का संपवलं आयुष्य   ते  प्रकरण काय
नितीन देसाईंनी ND स्टुडिओमध्येच का संपवलं आयुष्य, 180 कोटींचं प्रकरण काय?
Advertisement

Nitin Desai Suicide Reason: मुंबई: कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंनी (Nitin Desai) सिने क्षेत्रात जे काही काम केलं ते कायमच डोळे दिपवणारं आणि भव्यदिव्य अशा स्वरूपाचंच असायचं. ते त्यांच्या प्रत्येक सिनेमा किंवा मालिकांमधून आपल्याला पाहायला मिळालं आहे. प्रचंड आलिशान असे सेट्स तयार करणारे नितीन देसाई आपल्या या कलेतून थिएटरमधील प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करून टाकायचे. त्यांच्या याच भव्यदिव्यतेचा सगळा अर्क हा ND स्टुडिओमध्ये होता. पण हाच स्टुडिओ अखेर त्यांचा काळ ठरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.. (nitin desai suicide reason came to light what about nd studios 180 crore loan news marathi latest)

Advertisement Whatsapp share

बॉलिवूड म्हटलं की मुंबई हे समीकरण कायम आहे.. कारण अनेक सिनेमांचं शूटिंग हे मुंबईतील वेगवेगळ्या स्टुडिओंमध्ये होतं. मात्र, 2005 साली कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी अवघ्या बॉलिवूडला दिपवून टाकणारा ND Studio थेट कर्जतमध्ये उभा केला. तब्बल 52 एकरहून अधिकच्या परिसरात हा स्टुडिओ उभा करण्यात आला होता.

Advertisement

हे ही वाचा >> Nitin Desai : खिडकीतून बघितलं अन् बॉडीगार्ड हादरला; एनडी स्टुडिओत काय घडलं?

नितीन देसाई यांनी उभा केलेल्या या स्टुडिओच्या प्रेमात बॉलिवूड देखील पडलं होतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच अनेक बिग बजेट सिनेमे आणि मालिकांचं शूटिंग इथे सुरू झालं होतं. नितीन देसाई यांचा बॉलिवूडमध्ये संपर्कही दांडगा होता. त्यामुळे अनेक बडे निर्माते ते देखील सिनेमाच्या शूटिंगसाठी ND ला पसंती देत असत. मात्र, नंतरच्या काळात बॉलिवूडकरांनी या स्टुडिओकडे काहीशी पाठ फिरवली. त्यातच कोरोनाचं संकट आल्याने नितीन देसाई आणि एनडी स्टुडीओ हे आर्थिक गर्तेत सापडले.

Advertisement सब्सक्राइब करा

ND स्टुडिओमुळे नितीन देसाईंना करावी लागली आत्महत्या?

मिळालेल्या माहितीनुसार, एका फायनान्स कंपनीकडून नितीन देसाई यांनी तब्बल 180 कोटींचं कर्ज घेतलं होतं. पण ते कर्ज त्यांना वेळेत फेडता आलं नाही. ज्यामुळे एनडी स्टुडिओ जप्त केलं जाणार होतं. फायनान्स कंपनीने यासंबंधीची परवानगी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मागितली होती. तशा आशयाचा अर्ज देखील त्यांनी केला होता.

180 कोटींच्या कर्जामुळे गमावला जीव

2016 आणि 2018 साली नितीन देसाईंनी तब्बल 180 कोटींचं कर्ज घेतलं होतं. जेव्हा त्यांनी जे कर्ज घेतलं होतं... त्यावेळी त्यांनी स्टुडिओची जमीन आणि इतर काही संपत्ती या तारण ठेवल्या होत्या. मात्र, मागील काही वर्षात देसाईंना कर्जाची रक्कम फेडता आली नाही. तसेच त्यावरील व्याजही त्यांना देता आलं नव्हतं. त्यामुळे त्यांचं 180 कोटींचं कर्ज हे जवळजवळ 250 कोटींपर्यंत पोहचलं होतं. या सगळ्याचा तणाव त्यांना प्रचंड जाणवत होता.

Advertisement

हे ही वाचा >> Nitin Desai : आलिशान शब्दही फिका, असा आहे देसाईंचा एनडी स्टुडिओ, Inside photos

आता अशीही माहिती समोर येत आहे की, नितीन देसाईंनी जे कर्ज घेतल होतं. ते फेडण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित फायनान्स कंपनीने देसाईंकडे तगादा लावला होता. पण देसाई यांना कर्जाची रक्कम चुकवता आली नाही. ज्यामुळे कंपनीने याबाबत जप्तीच्या कारवाईसाठी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट कोणतेही आदेश अद्याप तरी दिले नव्हते. मात्र, आपण आता या आर्थिक गर्तेतून बाहेर पडू शकणार नाही याच नैराश्यातून नितीन देसाईंनी आत्महत्या केल्याचं सध्या बोललं जात आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज