For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Nitin Desai Suicide: ...म्हणून नितीन देसाईंनी केली आत्महत्या?

12:16 PM Aug 02, 2023 IST | मुस्तफा शेख
nitin desai suicide     म्हणून नितीन देसाईंनी केली आत्महत्या
Nitin Desai Suicide: ...म्हणून नितीन देसाईंनी केली आत्महत्या?
Advertisement

Nitin Desai Suicide Reason: मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीसह अवघ्या महाराष्ट्राला धक्का देणारी बातमी आज (2 ऑगस्ट) सकाळीच समोर आली. बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सर्वांनाच प्रचंड धक्का बसला आहे. या वृत्ताने अवघ्या सिनेविश्वावर शोककळा कोसळली आहे.

Advertisement Whatsapp share

जो स्टुडिओ स्वत:च्या हाताने घडवला, तिथेच संपवलं आयुष्य...

नितीन देसाई हे कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्यासारख्या दिग्गज कला दिग्दर्शकाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत आता अनेक उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक हे घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत.

Advertisement

नितीन देसाई यांचा मृत्यू कधी आणि कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूचे कारण आर्थिक तंगी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देसाई काल रात्री दहा वाजता त्यांच्या खोलीत गेले. पण आज सकाळी ते बराच वेळ बाहेर आले नाही. त्यानंतर त्यांचा बॉडीगार्ड आणि इतर लोकांनी दरवाजा ठोठावला, मात्र त्यांनी दरवाजा उघडला नाही. खिडकीतून पाहिल्यावर नितीन देसाई यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसून आला. त्यानंतर याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहचताच पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात पाठवला.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा >> Nitin Desai : खिडकीतून बघितलं अन् बॉडीगार्ड हादरला; एनडी स्टुडिओत काय घडलं?

नितीन देसाई 9 ऑगस्ट रोजी त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा करणार होते. मात्र खेदाची गोष्ट म्हणजे वाढदिवसापूर्वीच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

आर्थिक तंगीमुळे केली आत्महत्या?

कर्जतचे आमदार महेश बालदी यांनी नितीन देसाई यांच्या निधनावर बोलताना अशी प्रतिक्रिया दिली की, 'नितीन देसाई यांनी आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या केली असू शकते. नितीन देसाईंचा एनडी स्टुडीओ माझ्या मतदारसंघात येत होता. अनेक दिवसांपासून ते आर्थिक संकटाशी झुंजत होते. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या केली असावी.'

Advertisement

ब्लॉकबस्टर चित्रपट आणि ND

नितीन देसाईंनी 1989 मध्ये ‘परिंदा’या चित्रपटातून कला दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे सेट तयार केले होते. त्यांनी डिझाइन केलेल्या प्रसिद्ध चित्रपटांच्या सेटमध्ये प्यार तो होना ही था, हम दिल दे चुके सनम, मिशन कश्मीर, राजू चाचा, देवदास, लगान, बाजीराव मस्तानी यांचा समावेश आहे. बिग बॉसचा सेटही त्यांनीच डिझाईन केला होता. 2005 मध्ये त्यांनी मुंबईजवळ कर्जतमध्ये 52 एकरमध्ये पसरलेला एनडी स्टुडिओ सुरू केला होता.

हे ही वाचा >> Nitin Desai : सिनेसृष्टीवर आघात! कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार

नितीन देसाई यांना सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक म्हणून 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत, नितीन देसाई यांनी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले, ज्यात संजय लीला भन्साळी, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, ​​आशुतोष गोवारीकर यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. चित्रपटसृष्टीत त्यांचे योगदान मोठे आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज