For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

OMG 2 : 'रख विश्वास तू है शिव का दास!' अक्षय कुमार जबरदस्त लुक, टीजर बघितलात का?

03:37 PM Jul 11, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
omg 2    रख विश्वास तू है शिव का दास   अक्षय कुमार जबरदस्त लुक  टीजर बघितलात का
Advertisement

Bollywood : Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचे वेगवेगळे कन्सेप्ट आधारित चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकत असतात. नुकताच त्याच्या OMG 2 चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, यामी गौतम हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. यामध्ये अक्षयने भगवान शिवशंकरची भूमिका साकारली आहे. फर्स्ट लुक समोर आल्यापासून चाहते या प्रोजेक्टसाठी उत्सुक झाले आहेत. चित्रपटाच्या टीझरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. (OMG 2 Teaser Out Akshay Kumar Awesome Look)

Advertisement Whatsapp share

चित्रपट कोणत्या कहाणीवर आधारित आहे?

नास्तिक कांजीलाल मेहता यांची कहाणी OMG मध्ये दाखवण्यात आली होती. त्याचबरोबर एका आस्तिक भक्ताची कहाणी त्याच्या सिक्वेलमध्ये दाखवण्यात येणार आहे. हा आस्तिक भक्त कांतिशरण मुत्गल आहे. जो शिवभक्तीत मग्न दिसतो. त्याचा विश्वास असतो की दुःखात मारलेली हाक नेहमी देवाला आपल्या भक्तांकडे आकर्षित करते. देव त्याच्या भक्तांमध्ये भेदभाव करत नाही. यावेळी टॅगलाइन आहे, 'रख विश्वास, तू है शिवा का दास'.

Advertisement

वाचा : 602 मध्ये ऑफिस नको रे बाबा!; अजित पवारच अंधश्रेद्धेचे ‘बळी’, प्रकरण काय?

कहाणीत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा एक दिवशी कांतीशरणच्या आयुष्यात वादळ येते. अडचणीच्या काळातही कांतिशरणची श्रद्धा भोलेनाथावर कायम असते. भक्ताचा असा विश्वास पाहून भगवान शिवशंकरला तर मदतीला यायचच होतं. यावेळी अभिनेता अक्षय कुमारची भगवान शिवशंकराच्या अवतारातस हटके एन्ट्री आहे. तो त्याचा परम भक्त कांतीशरण मुत्गलच्या समस्या दूर करण्यासाठी पृथ्वीवर येतो.

Advertisement सब्सक्राइब करा

अरुण गोविल पुन्हा दिसणार रामाच्या अवतारात तर, अक्षय दिसणार शिवशंकरच्या भूमिकेत...

हा पहिलाच प्रोजेक्ट आहे ज्यात पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार एकत्र दिसणार आहेत. या रंजक कथेव्यतिरिक्त यामधील उत्तम स्टारकास्ट हा चित्रपट आणखी रोमांचक बनवते. या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया असणार आहेत हे पाहावं लागणार आहे. अमित राय दिग्दर्शित OMG 2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात रामायण मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल चित्रपटात पुन्हा रामची भूमिका साकारणार आहेत. त्यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

वाचा :  ‘बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसात उद्धव ठाकरे त्यांना…’, नितेश राणेंचा खळबळ उडवणारा राजकीय बॉम्ब

OMG - Oh My God! हा चित्रपट 2012 मध्ये आला होता. यामध्ये परेश रावल आणि अक्षय कुमार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. तर आता OMG 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement

गदर 2 सोबत OMG 2 ची टक्कर?

अक्षयच्या या चित्रपटाची टक्कर सनी देओलच्या गदर 2 या चित्रपटाशी होईल. ही सर्वात मोठी टक्कर असणार आहे. दोन्ही चित्रपटांचे टीझर जबरदस्त गाजले होते. अक्षय कुमारच्या चित्रपटांसाठी 2022 वर्ष काही खास ठरले नाही. त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, राम सेतू, सेल्फी बॉक्स ऑफिसवर जास्त काळ टिकले नाहीत. OMG 2 हा खिलाडी कुमारचा 2023 मधील पहिला प्रोजेक्ट आहे. केवळ अक्षयलाच नाही तर त्याच्या चाहत्यांनाही या चित्रपटाकडून खूप आशा आहेत.

वाचा : Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : दानवे फडणवीसांना म्हणाले, “कावळ्यांची काविळ”

अक्षयच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये द ग्रेट इंडियन रेस्क्यू, सूरराई पोत्रू रिमेक, बडे मिया छोटे मिया, हेरा फेरी 3, वेदात मराठे वीर दौडले सात यांचा समावेश आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज