For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Raghav Chadha यांचं रॉयल सासर! मेव्हणी ग्लोबल स्टार तर, सासरे...

02:37 PM Sep 24, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
raghav chadha यांचं रॉयल सासर  मेव्हणी ग्लोबल स्टार तर  सासरे
Advertisement

Parineeti Chopra Family : चाहत्यांची प्रतीक्षा संपली! अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये सात फेरे घेऊन दोघंही एकमेकांची साथ कायमची धरणार आहेत. आता चाहत्यांना परिणीतीला आणि राघव चढ्ढा यांना लग्नाच्या गेटअप लुकमध्ये पाहायचं आहे. पण लग्नाआधी, आज आपण परिणीती चोप्राच्या कुटुंबाची म्हणजेच राघव चढ्ढा यांच्या सासरची ओळख करून घेऊयात. (Raghav Chadha's in-law's Know everything about Parineeti Chopra's family)

Advertisement Whatsapp share

राघव चड्ढा यांचे सासरे काय करतात?

परिणीती पंजाबी कुटुंबातील आहे. अभिनेत्री तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. परिणीतीच्या वडिलांचं नाव म्हणजेच राघव चड्ढा यांच्या होणाऱ्या सासऱ्यांचं नाव पवन चोप्रा आहे, जे एक मोठे उद्योगपती आहेत. पवन चोप्रा अंबाला कॅन्टोन्मेंटमध्ये भारतीय लष्करासाठी सप्लायर म्हणूनही काम करतात. परिणीतीच्या वडिलांना गाण्याचीही आवड आहे.

Advertisement

‘जनतेपेक्षा त्यांना हायकमांड…’, सुप्रिया सुळेंच्या देवेंद्र फडणवीसांना कानपिचक्या

परिणीतीची आई काय करते?

परिणीतीची आई आणि राघव चड्ढा यांच्या होणाऱ्या सासूबाई रीना मल्होत्रा ​​या एनआरआय आहेत. त्यांचा जन्म सिंगापूर येथे झाला. एकेकाळी त्या केनियात राहायच्या. मात्र, नंतर त्या भारतात शिफ्ट झाल्या. परिणीतीची आई हाऊसमेकर तसंच आर्टिस्टही आहेत. त्या त्यांची चित्रं आणि कला प्रदर्शनांमुळे चर्चेत राहतात.

Advertisement सब्सक्राइब करा

राघव चड्ढांचे मेव्हणे दिसायला आहेत खूपच देखणे!

परिणीती चोप्राला दोन भाऊ आहेत. एका भावाचे नाव सहज चोप्रा आणि दुसऱ्याचे नाव शिवांग चोप्रा आहे. अभिनेत्रीचे दोन्ही भाऊ दिसायला खूप देखणे आहेत. परिणीती दोन्ही भावांच्या खूप जवळ आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसते.

Nagpur Rain : ‘ हे दुःख सहन करण्यापलिकडचे’, पूरस्थिती बघून फडणवीस म्हणाले…

परिणीतीचे दोन्ही भाऊ काय काम करतात?

परिणीतीचा भाऊ सहज चोप्रा हा उद्योजक आहे. त्याचा दिल्लीत फूड आणि ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. परिणीती अनेकदा तिच्या भावाच्या बिझनेसचे प्रमोशन करताना दिसते. तर, परिणीतीचा धाकटा भाऊ शिवांग चोप्रा डॉक्टर आहे. लंडनच्या मेडिकल कॉलेजमधून त्याने शिक्षण घेतले.

Advertisement

परिणीतीची चुलत बहीण आहे ग्लोबल स्टार!

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा ही परिणीती चोप्राची चुलत बहीण आहे. परिणीती आणि प्रियांका यांच्यात खूप मजबूत बॉन्ड आहे. परिणीतीच्या साखरपुड्याला प्रियांका चोप्रानेही हजेरी लावली होती. प्रियांका आणि परिणीती अनेकदा एकमेकांसोबत हँग आउट करताना दिसतात.

परिणीतीचा जिजू सुप्रसिद्ध गायक

परिणीतीचा जिजू म्हणजेच प्रियांकाचा पती निक जोनास हा हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता आहे. निक जोनासचे जगभरात जबरदस्त चाहते आहेत. परिणीतीचा निकसोबतही खास बॉन्ड आहे.

परिणीतीची भाची आहे सुपरक्यूट!

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची मुलगी मालती मेरी ही परिणीती चोप्राची भाची आहे. मालती खूप क्यूट आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मुंबईकडे येत असतानाच प्रसूतीकळा; रेल्वे स्थानकात दिला गोंडस बाळाला जन्म

चुलत भाऊ चित्रपटांशी निगडीत

परिणीती चोप्राचा चुलत भाऊ आणि प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा हा एक प्रोफेशनल शेफ आणि प्रोड्युसर आहे. तो प्रियांकाचं प्रोडक्शन हाऊस पर्पल पेबल पिक्चर्स सांभाळतो.

परिणीतीची काकू मल्टिटॅलेंटेड

परिणीती चोप्राची काकू मधू चोप्रा ही अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई आहे. मधु चोप्रा मल्टिटॅलेंटेड आहेत. फिजिशियन, बिझनेसवुमन असण्यासोबतच त्या एक फिल्म प्रोड्युसर देखील आहेत. मधु चोप्रा यांनी व्हेंटिलेटर आणि बम बम बोल रहा है काशी या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज