For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Seema Deo Death: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड!

12:08 PM Aug 24, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
seema deo death  ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड
Advertisement

Seema Deo Passed Away : हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन झालं आहे. त्या 81 वर्षाच्या होत्या. सीमा देव यांनी गुरुवारी (24 ऑगस्ट 2023) सकाळी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. त्यांना अल्झायमरचा आजार होता. मुलगा अभिनय देवसोबत त्या वांद्रे येथे राहत होत्या. (Senior actress Seema Dev passed away at the age of 81)

Advertisement Whatsapp share

त्यांनी विविध चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. सीमा देव यांच्या पार्थिवावर गुरूवारी संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Advertisement

India Alliance : मुंबईतील बैठकीत विरोधक दोन गोष्टी ठरवणार, काय आहे अजेंडा?

सीमा देव यांचा विवाह अभिनेता रमेश देव यांच्याशी झाला होता. रमेश देव यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. रमेश देव यांचं 2 फेब्रुवारी 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 93 वर्षांचे होते.

Advertisement सब्सक्राइब करा

'आनंद' चित्रपटात सीमा देव यांची होती खास भूमिका!

रमेश देव यांनी 'आनंद'मध्ये अमिताभ बच्चन यांचा मित्र डॉ. प्रकाश कुलकर्णी यांची भूमिका केली होती. त्या चित्रपटात सीमा देव त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत होत्या. अमिताभ बच्चन त्यांना चित्रपटात भाभी म्हणून हाक मारायचे.

छत्रपती संभाजीनगर : आईनेच 20 वर्षाच्या लेकीला पेटवले, कारण ऐकून पोलिसही हादरले

80 हून अधिक चित्रपटांमध्ये केलंय काम

सीमा देव यांनी आपल्या करिअरमध्ये 80 हून अधिक हिंदी आणि मराठी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचं खरं नाव नलिनी सराफ होतं. 1960 मध्ये 'मियाँ बीवी रझा' या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्या 'भाभी की चुडियाँ', 'दस लाख', 'कोशिश', 'कोरा कागज', 'संसारा' आणि 'सुनहरा संसार' आणि 'सरस्वतीचंद्र' या हिट चित्रपटांमध्ये दिसल्या.

Advertisement

Brown, Whole Wheat, Multigrain Bread : ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं की हानिकारक?

सीमा देव यांची मुलं काय करतात?

सीमा देव आणि रमेश देव यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव अशी दोन मुलं आहेत. अभिनय हा दिग्दर्शक असून त्याने 'डेल्ही बेली' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. तर मुलगा अजिंक्य हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज