TMKOC : 'असित मोदीसोबत भांडण का झालं?' तारक मेहताने केलं सर्व काही उघड!
Tarak Mehta : 'तारक मेहता का उलटा चष्मा' या प्रसिद्ध टीव्ही मालिकेचे निर्माता असित मोदी गेल्या अनेक दिवसांपासून वादत सापडला आहे. याच कार्यक्रमातील काही कलाकारांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता या शोमधील 'तारक मेहता' ची भूमिका साकरणारा शैलेश लोढा याने त्याच्या अनुभवाबाबत सांगितलं आहे. शोपासून राजकारण आणि निवडणूक लढवण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी शैलेश लोढाने शेअर केल्या. निर्माता असित मोदीसोबत झालेल्या भांडणाबद्दलही त्याने स्पष्टच वक्तव्य केलं. (Shailesh Lodha explained the reason behind TMKOC's tussle with Asit Modi)
असित मोदींनी केलेल्या आरोपांवर बोलताना शैलेश लोढा म्हणाला, “मी आधीच कवी संमेलनात भाग घेत होतो. शो सुरू होण्याआधीच मी 2012 मध्ये कॉमेडी का महामुकाबला हा शो केला होता. 'बहुत खूब' केलं होतं. तसंच, 'वाह-वाह, काय बात है' हा शो ही केला.
नरेंद्र मोदींनी ओबीसींसाठी नेमकं केलं काय? राहुल गांधींनी पंतप्रधानांना घेरले
शैलेशने सांगितले की बाहेर काम करण्याचा कोणताही मुद्दा नव्हता. तो म्हणाला, “खरी गोष्ट अशी होती की, मी एका शोच्या शूटिंगला गेलो होतो, तिथे तो ज्या पद्धतीने बोलला ते मला आवडलं नाही. हा बरोबरीच्या लोकांसोबत बोलण्याचा योग्य मार्ग असू शकत नाही. त्यांचा हुकूमशाही पद्धतीने बोलण्याचा अंदाज सहन केला जाऊ शकत नाही."
शैलेश लोढा शोबद्दल काय म्हणाला?
शोबद्दल सांगताना शैलेश म्हणाला, 'जेव्हा त्याला असित मोदींचा फोन आला तेव्हा तो कॉमेडी सर्कस करत होता. त्यावेळी त्याच्यात खूप सहजता होती. मी त्याला ओळखत नव्हतो. तर मी त्याला म्हणालो की मी उद्या सकाळी जोधपूरला जात आहे, तुम्ही मला मुंबई विमानतळावर भेटू शकता. तिथे आम्ही शोबद्दल बोललो. तेव्हा ते मला म्हणाले होते की तू तारक मेहताची भूमिका साकारशील.”
क्रुरतेचा कळस गाठणाऱ्याचा एन्काऊंटर, ट्रेनमध्ये महिला कॉन्स्टेबलची केली होती हत्या
हा शो हिट होत असल्याबद्दल बोलताना शैलेश म्हणाला की, 'सुरतमधील एका शोमध्ये त्याला याची जाणीव झाली. जिथे तो पाहुणा म्हणून गेला होता. तिथल्या हजारो लोकांच्या गोंगाटाने त्याला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' काहीतरी वेगळं असल्याची जाणीव करून दिली. त्यानंतर हा शो हिट झाल्याचे लक्षात आले.'