For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

'मणिपूर फाइल्स बनवून दाखवा' विवेक अग्निहोत्रींच्या ट्वीटवर यूजरची संतप्त प्रतिक्रिया! म्हणाले...

05:05 PM Jul 23, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
 मणिपूर फाइल्स बनवून दाखवा  विवेक अग्निहोत्रींच्या ट्वीटवर यूजरची संतप्त प्रतिक्रिया  म्हणाले
Advertisement

Vivek Agnihotri : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir FIles) या चित्रपटात काश्मिरी पंडितांची कहाणी प्रेक्षकांना दाखवण्यात आली. हा चित्रपट पाहून प्रत्येकजण भावूक झाला. 90 च्या दशकात खोऱ्यातील काश्मिरी पंडितांसोबत झालेल्या हिंसक घटना आणि त्यांचे पलायन अशाप्रकारच्या स्टोरी मोठ्या पडद्यावर याआधी कधीच दाखवण्यात आल्या नव्हत्या. आता विवेक अग्निहोत्री काश्मिरी पंडितांवर एक वेब सिरीज घेऊन येत आहे. 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' असं या वेबसिरीजचं नाव आहे. विवेक यांनी नुकताच त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. (twitter User angry reaction And Ask to make Manipur files to Vivek Agnihotri)

Advertisement Whatsapp share

विवेक अग्नीहोत्री यांनी काश्मीर पंडितांवर एक ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'भारतीय न्यायव्यवस्था काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर मूकबधिर होती आणि तशीच आहे. तेव्हाही आणि आजही, काश्मिरी पंडितांच्या 'जगण्याच्या हक्काचे' संरक्षण करण्यात ते स्वत: अपयशी ठरले आहेत, ज्याचे संविधानात वचन दिले आहे.'

Advertisement

Lok Sabha 2024 : विरोधकांना UPA विसर्जित करून INDIA बनवण्याची गरज का पडली?

विवेकच्या अग्नीहोत्रींच्या ट्वीटवर मणिपूरचा उल्लेख!

'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्या ट्वीटवर एका यूजरने प्रचंड संतापात ट्विट केले. या यूजरने लिहिलं की, 'वेळ वाया घालवू नका आणि जर तुम्ही माणूस असाल तर जा आणि 'मणिपूर फाइल्स' चित्रपट बनवा.' केवळ हा एक यूजरच नाही तर इतर अनेकांनीही विवेकच्या ट्वीटला प्रतिसाद देत मणिपूरच्या घटनेचा उल्लेख केला आणि या भीषण घटनेवर चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला.

Advertisement सब्सक्राइब करा

19 जुलै 2023 रोजी मणिपूर हिंसाचाराचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये मणिपूर हिंसाचाराला बळी पडलेल्या एका समुदायातील दोन महिला नग्नावस्थेत दिसत आहेत. या अवस्थेत इतर समाजाचे लोक त्यांची या अवस्थेत रस्त्यावर धिंड काढत आहेत. यांच्याशी गैरवर्तन करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 4 मे रोजी ही घटना घडल्याचे कळते. पण हा प्रकार आता समोर आल्याने या घटनेने संपूर्ण देश हादरला.

Nagpur Crime : 14 किलो सोने, 200 किलो चांदी अन् 17 कोटी रोख; पोलिसही चक्रावले!

सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांवर या व्हिडिओवर जोरदार टीका होत असून या घटनेतील आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अक्षय कुमारपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर या घटनेबाबत संताप व्यक्त केला.

Advertisement

युजरच्या ट्वीटला दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांचं प्रत्युत्तर...

विवेक यांनीही या युजरला त्यांच्या अकाऊंटवरून उत्तर दिले. त्यांनी आपल्या रिप्लाय ट्वीटमध्ये लिहिलं, 'माझ्यावर इतका विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. पण सगळे चित्रपट माझ्याकडूनच बनवणार का? तुमच्या 'टीम इंडिया'मध्ये एकही पुरुष चित्रपट निर्माता नाही का? कदाचित या उत्तरात विवेक यांचा इशारा विरोधी पक्षांच्या युतीला होता. ज्यांनी काहीदिवसांपूर्वीच त्यांचे नाव 'I.N.D.I.A.' असे जाहीर केले.

Video : मुंबई एसी लोकलमध्ये चढला, पण…, नंतर जे घडलं ते पाहुन आवरणार नाही हसू

विवेक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचा 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट ऑगस्टमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. विवेक यांची नवी वेब सिरीज 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड'ही येत आहे, मात्र त्याची प्रदर्शनाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज