For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Nitin Desai ना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले 'ते' 5 जण कोण?

06:04 PM Aug 07, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
Advertisement

Nitin Desai Suicide Case 5 Accused : हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी (2 ऑगस्ट) गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जत येथील त्यांच्याच एनडी स्टुडिओमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. नितीन यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब आणि इंडस्ट्रीशी संबंधित स्टार्सना मोठा धक्का बसला आहे. आता नितीन यांची पत्नी नेहा देसाई यांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Who are those 5 accused in Nitin Desai's suicide case)

Advertisement Whatsapp share

पत्नी नेहा देसाई यांच्या तक्रारीवरून खालापूर पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शुक्रवारी, 4 ऑगस्ट रोजी एडलवाइस ग्रुप आणि ईसीएल (ECL) फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध हा एफआयआर दाखल करण्यात आला. कलम 306 आणि आयपीसी 34 अंतर्गत हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Advertisement

Maharashtra : ‘राज ठाकरेंना फोन करणार, पण…’, उद्धव ठाकरे खासगीत काय बोलले?

नेहा नितीन देसाई यांच्या म्हणण्यानुसार, 'या कंपन्यांचे अधिकारी नितीन यांना कर्जाबाबत मानसिक त्रास देत होते. या तणावातून त्यांनी आत्महत्या केली. ईसीएल फायनान्स ही एडलवाइस ग्रुपची नॉन-बँकिंग फायनान्स शाखा आहे, जी कर्ज पुरवते.' पण, कर्ज वसुलीसाठी नितीन यांच्यावर कोणताही दबाव टाकला जात होता, हा आरोप एडलवाइस एआरसीने फेटाळून लावला आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

आत्महत्येस परावृत्त करणारे ते 5 आरोपी कोण? ऑडियो क्लिपमधून उघड!

नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांची वकील वृंदा हिला काही व्हॉईस क्लिप पाठवण्यासाठी त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डरचा वापर केला. वकिल वृंदाने नेहा देसाईसोबत या व्हॉइस क्लिप शेअर केल्या. त्यांची पत्नी नेहा यांच्या जबाबाच्या आधारे खालापूर पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनुसार केयुर मेहता, रसेश शाह, स्मित शाह, EARC कंपनीचे आर के बन्सल आणि प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन देसाईंच्या व्हॉईस क्लिपमध्ये नेमकं काय?

व्हॉईस क्लिपमध्ये नितीन म्हणाले, 'रसेश शाह हा एक गोडबोल्या असून त्याने छोटया मोठया उद्योजकांसाठी कष्टाने बनविलेला माझा स्टुडीओ गिळण्याचे काम केले. 100 फोन केले परंतु फोन उचलत नाही. 138, EOW, NCLT, DRT, यांच्याकडुन प्रचंड छळवाद केला. माझेकडे दोन- तीन इनव्हेस्टर गुंतवणुक करण्यासाठी तयार असताना मला सहाकार्य केले नाही.'

Advertisement

SambhajiRaje: ‘चक्की पिसिंग.. पिसिंग..’ आता देवेंद्र फडणवीसांना संभाजीराजेंनीही डिवचलं!

'माझ्यावर डबल टिबल किंमतीचा बोजा टाकून प्रेशराईज केलं. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्यावर वेगळ्या पद्धतीने प्रेशर केलं. स्मित शहा, केयर मेहता, आर.के.बन्सल यांनी माझा स्टुडीओ लुटण्याचा, माझी नाचक्की करून मला घेरण्याचे काम करीत आहेत. या लोकांनी माझी वाट लावली. मला पैशांच्या बाबतीत धमक्या देऊन नराधमांनी मला प्रेशराईज केले, सोन्यासारखे असलेले ऑफिस विकायला लावले, एका मराठी कलाकाराला जिवे मारण्याचे काम या नराधमांकडून होत आहे. मला षडयंत्र करून, दडपुन टाकुन मला संपविले. माझ्या मनात नसतानाही त्यांनी करायला भाग पाडले आहे.”

कर्जबाजारी झाल्याने नितीन देसाईंनी उचललं टोकाचं पाऊल!

58 वर्षीय आर्ट डायरेक्टर नितीन देसाई यांची कंपनी एनडी आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडवर 252 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांनी 2016 आणि 2018 मध्ये ईसीएल फायनान्सकडून 185 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. जानेवारी 2020 पासून कर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. व्याजासह कर्जाची रक्कम 250 कोटी रुपये झाली होती. कंपनीने वसुलीसाठी कायदेशीर पावले उचलली होती. स्टुडिओ जप्त करण्याचा प्रस्तावही कंपनीने तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवला होता. एनडी स्टुडिओ सील होण्याचीही शक्यता होती. अशा स्थितीत त्यांना आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलावं लागलं.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज