For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Nipah virus : 'निपाह'ने घेतला दोघांचा जीव, संसर्ग होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यायची?

12:15 PM Sep 14, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
nipah virus    निपाह ने घेतला दोघांचा जीव  संसर्ग होऊ नये म्हणून काळजी कशी घ्यायची
Advertisement

Nipah Virus Cases : केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह विषाणूची प्रकरणं समोर आली आहेत. कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूची लागण झालेल्या दोन्ही लोकांचा मृत्यू झाला. इतर दोन बाधितांवर उपचार सुरू आहेत. एक नऊ वर्षांचा मुलगा तर दुसरा रुग्ण 24 वर्षांचा आहे. दोघंही त्याच कुटुंबातील आहेत ज्याचा 30 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, त्यांनी तज्ज्ञांची एक टीम केरळला पाठवली आहे. (2 people died in Kerala due to Nipah virus Why is this disease so dangerous)

Advertisement Whatsapp share

निपाह विषाणू कोरोना विषाणू इतका वेगाने पसरत नाही, परंतु त्याची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू भयानक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, निपाहच्या 40 ते 75 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. जर निपाह इतका धोकादायक असेल तर त्याचा प्रसार कसा होतो आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना आहेत? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

Advertisement

वाचा : Parliament Special Session : हा आहे मोदी सरकारचा अजेंडा, मांडणार 4 विधेयके

निपाह विषाणू म्हणजे काय?

निपाह हा एक झुनोटिक आजार आहे. याचा अर्थ संक्रमित प्राण्यांद्वारे किंवा दूषित अन्नपदार्थांद्वारे ते मानवांमध्ये पसरते. WHO नुसार, निपाह संसर्ग संसर्गित व्यक्तीच्या जवळ राहणाऱ्या इतर लोकांमध्ये पसरू शकतो. मानवांमध्ये निपाह विषाणूचा संसर्ग पहिल्यांदा मलेशियामध्ये 1998 मध्ये आणि सिंगापूरमध्ये 1999 मध्ये आढळून आला होता. या विषाणूचं नाव मलेशियातील त्याच गावाच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं, जिथे पहिल्यांदा एका व्यक्तीमध्ये हा विषाणू आढळला होता. त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मलेशियामध्ये एकूण 265 लोकांना याची लागण झाली होती. तर 105 लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून या संसर्गाची लागण झालेले लोक दरवर्षी भारत, बांगलादेश आणि आजूबाजूच्या देशात आढळतात.

Advertisement सब्सक्राइब करा

निपाह विषाणूची लक्षणं कोणती?

निपाह विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर 4 ते 14 दिवसांनी त्याची लक्षणं दिसतात. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, यामुळे ताप, डोकेदुखी, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यात अडचण आणि उलट्या यांसारखी लक्षणं दिसतात. जेव्हा गंभीर लक्षणे दिसतात तेव्हा निद्रानाश, भ्रम, दिशाभूल, कोमा आणि मेंदूला सूज येऊ शकते. जे गंभीर बनते आणि नंतर मृत्यू होतो.

वाचा : Maratha Reservation : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं! CM शिंदे आल्यानंतर काय घडलं?

निपाहचा प्रसार कसा होतो?

निपाह विषाणू प्राण्यांद्वारे दूषित करण्यात अन्नातून माणसांमध्ये पसरतो. माहितीनुसार, वटवाघळांची लाळ किंवा मूत्राने दूषित झालेल्या फळांचे सेवन केल्याने निपाह होऊ शकतो. निपाहची अशी काही प्रकरणंही समोर आली आहेत ज्यात पीडित महिला वटवाघुळं राहत असलेल्या झाडावर चढल्या होत्या. वटवाघुळ, ज्यांना सामान्यतः फ्लाइंग फॉक्स म्हणतात, त्यांच्यामुळे या विषाणूची लागण होते. हा विषाणू वटवाघळांमुळे डुक्कर, कुत्रे, मांजर, शेळ्या, घोडे आणि मेंढ्या अशा प्राण्यांमध्येही पसरतो.

Advertisement

वटवाघळांनी दूषित केलेल्या फळांमुळे किंवा इतर पदार्थांमुळे हा आजार माणसापर्यंत पसरतो. बांगलादेश आणि भारतात अशा संसर्गाची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. रुग्णांसोबत राहणाऱ्या किंवा त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांमध्ये हा संसर्ग होण्याचा धोका असतो.

1998-99 मध्ये पहिल्या प्रकरणांची नोंद झाल्यापासून, दक्षिण आशियाई देशांमध्ये हा विषाणू अनेक वेळा पसरला आहे. 2001 पासून बांगलादेशात किमान दहा वेळा निपाह पसरला आहे. भारताबद्दल बोलायचं झालं तर, 2001 आणि 2007 मध्ये पश्चिम बंगालमध्ये त्याचा उद्रेक दिसून आला. तर केरळमध्ये 2018, 2019, नंतर 2021 आणि आता 2023 मध्ये निपाहची प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

निपाह विषाणूचा संसर्ग दर किती?

  • निपाह विषाणू कोरोना व्हायरसपेक्षा खूप हळू पसरतो. पण ते कोरोनापेक्षा जास्त घातक आहे.
  • 2001 मध्ये जेव्हा निपाह पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पसरला तेव्हा 66 पैकी 45 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुमारे ६८ टक्के आहे.
  • यानंतर 2007 मध्ये पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात 5 लोकांना संसर्ग झाला, त्या सर्वांचा मृत्यू झाला.
  • 2018 मध्ये, केरळमध्ये निपाहची लागण झालेल्या 18 पैकी 17 जणांचा मृत्यू झाला.
  • तर 2019 आणि 2021 मध्ये केरळमध्ये निपाहने 2 जणांचा बळी घेतला.

आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा निपाह भारतात पसरला तेव्हा त्याचा संसर्ग मोठ्या भागात पसरू शकला नाही. लवकरच त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले. मुख्य कारण म्हणजे त्याचा संसर्ग होण्याचे प्रमाण फार वेगवान नाही. तो माणसाकडून माणसात सहज पसरत नाही.

वाचा : Anantnag Encounter : दोन चिमुकली मुलं… शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांची ह्रदयद्रावक कहाणी

निपाहविषाणूवर उपचार काय?

लक्षणं पाहून आणि RT-PCR चाचणी करून निपाहची पुष्टी केली जाऊ शकते. त्यानंतर उपचार केले जातात. एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वेळा मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा अँटी-व्हायरल औषधे यांसारख्या विशिष्ट प्रकारच्या उपचारांचा वापर केला जातो. परंतु सध्या निपाह विषाणूवर कोणताही विशिष्ट उपचार नाही.

निपाह विषाणूपासून कसं कराल स्वत:चं रक्षण?

  • वटवाघुळ आणि डुकरांच्या संपर्कात येणे टाळावे.
  • वटवाघुळांचे वास्तव्य असलेल्या भागात वस्ती करू नका.
  • कच्च्या खजुराचा रस पिणे टाळावे.
  • फळं खाण्यापूर्वी नेहमी ती धुवून घ्यावीत. कारण, वटवाघळांच्या मूत्राने किंवा लाळेने ती दूषित होऊ शकतात.
  • निपाह विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळावे.
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज