For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

ISRO मध्ये नोकरी कशी मिळवायची? पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या..

12:25 PM Sep 01, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
isro मध्ये नोकरी कशी मिळवायची  पात्रता  पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
Advertisement

Indian Space Research Organisation : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) नोकरी कशी मिळवायची, इस्रोमध्ये कसं जायचं किंवा इस्रोमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल, जर तुम्हाला देखील यासंबंधित माहिती मिळवायची असेल आणि त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप खास आहे. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (How to get job in ISRO)

Advertisement Whatsapp share

ISRO मध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल?

जर तुम्हाला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) नोकरी करायची असेल तर प्रथम सिव्हिल, इलेक्ट्रिकल आर्किटेक्चर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग या क्षेत्रातून पदवीधर असणं गरजेचं आहे.

Advertisement

One Nation One Election वरून संजय राऊत संतापले; मोदींना म्हणाले, ‘फुगा…’

अर्ज केल्यानंतर, तुम्हाला इस्रोमध्ये नोकरी मिळविण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तुमची मुलाखत घेतली जाईल आणि मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर, तम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला नोकरी मिळेल.

Advertisement सब्सक्राइब करा

इस्रोमध्ये नोकरीसाठी पात्रता

जर तुम्हाला ISRO मध्ये नोकरी मिळवायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला 12वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करावी लागेल, त्यानंतर ISRO मध्ये शास्त्रज्ञ पदासाठी उमेदवारांना सिव्हिल इलेक्ट्रिकल, आर्किटेक्चर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स यांसारख्या क्षेत्रात पदवी प्राप्त करावी लागेल. पदवीधरांची किमान 65% गुणांसह प्रथम श्रेणी BE/B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. तसंच BE/B.Tech नंतर डिप्लोमा केलेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. ISRO भरतीसाठी केंद्रीकृत बोर्डाद्वारे परीक्षा घेतली जाते , ती पास करणं आवश्यक आहे.

ISRO भरतीसाठी, किमान वयोमर्यादा 21 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे. SC/ST उमेदवार 40 वर्षांपर्यंत आणि OBC उमेदवार 38 वर्षांपर्यंत अर्ज करू शकतात.

Advertisement

Sudhir More : ठाकरे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाचे झाले अनेक तुकडे

12 वी नंतर इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होता येतं का?

12वी उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होऊ शकत नाही, यासाठी काही पात्रता अनिवार्य आहेत, 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला IIT परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल आणि IIST मध्ये B.Tech चा 4 वर्षांचा कोर्स करणं अनिवार्य आहे. IIT NIT आणि इतर सरकारी किंवा खासगी संस्थांमधून पदवी पूर्ण करण्यासोबतच असे कोर्सेस करणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्हाला या क्षेत्राची जास्तीत जास्त माहिती मिळेल.

इस्रोमध्ये अंतराळवीर कसं व्हावं?

जर तुम्हाला इस्रोमध्ये अंतराळवीर व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स, बायोलॉजिकल सायन्स, इंजीनिअरिंग, फिजिकल सायन्स किंवा गणित या विषयात पदवी घ्यावी लागेल. यासोबतच 3 वर्षांचा व्यावसायिक अनुभव किंवा कोणत्याही विमानाच्या जेटमध्ये 1000 तास पायलट म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे.

Murder Case : केंद्रीय मंत्र्याच्या घरात तरुणाची गोळी घालून हत्या, पिस्तुल केले जप्त

इस्रोमध्ये नोकरी मिळवण्यासाठीची अर्ज प्रक्रिया

  • जर तुम्हाला ISRO चा अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला ISRO च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
  • त्यानंतर recruitment वर क्लिक करावं लागेल.
  • तुमच्या समोर ISRO Recruitment 2023 असा ऑप्शन दिसेल.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर, तेथे विचारलेली सर्व माहिती भरा, त्यानंतर तुमचा ऑनलाइन अर्ज पूर्ण होईल.

इस्रोमध्ये किती आहे पगार?

इस्रोमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा पगार 25 हजार ते 75 हजार दरम्यान असतो. ISRO वैज्ञानिकांचे वेतन ते ज्या पदासाठी अर्ज करतात त्यानुसार ठरवलं जातं.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारताची एक राष्ट्रीय अंतराळ संस्था आहे ज्याचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. या संस्थेमध्ये सुमारे 17000 कर्मचारी आणि शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. भारताला अंतराळाशी संबंधित तांत्रिक माहिती पुरवणं हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे. ही संस्था अंतराळाशी संबंधित तंत्रज्ञानासाठी काम करते.

 

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज