For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Extra Marital Affairs: '...म्हणून महिलांचे विवाहबाह्य संबंध असतात', सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर

07:28 PM Oct 17, 2023 IST | मुंबई तक
extra marital affairs      म्हणून महिलांचे विवाहबाह्य संबंध असतात   सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
Extra Marital Affairs: '...म्हणून महिलांचे विवाहबाह्य संबंध असतात', सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
Advertisement

Survey on Women Extra Marital Affairs: नवी दिल्ली: लग्न हे पवित्र बंधन मानले जाते, पण जोडीदारासोबतचे नाते चांगले नसेल तर त्यात दुरावा येऊ शकतो. आजच्या काळात विवाहबाह्य संबंधांची (Extra Marital Affairs) प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत, यावरून लोक त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसल्याचे दिसून येते यात शंका नाही. तथापि, हे नाकारता येत नाही की, काही लोक स्वतःच्या थ्रिलसाठी त्यांच्या पार्टनरची फसवणूक करतात. यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. (in survey 7 out of 10 married women are unfaithful to their husbands this mistake of men is the major reason)

Advertisement Whatsapp share

परंतु 5 लाखांहून अधिक यूजर्स असलेल्या ग्लीडन अॅपने विवाहित महिलांवर केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की बहुतेक महिलांचे विवाहबाह्य संबंध हे त्यांच्या जोडीदाराच्या वागण्यामुळेच असतात. येथे तुम्ही हे सर्वेक्षण तपशीलवार जाणून घेऊ शकता.

Advertisement

सर्वेक्षणात नेमकं काय?

स्त्रिया इतर पुरुषांशी संबंध का ठेवतात? हे सर्वेक्षण भारतात विवाहबाह्य डेटिंग अॅप ग्लीडेनने केले आहे. त्याच्या प्रकटीकरणामुळे तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाची काळजी वाटू शकते. या सर्वेक्षणातील बहुतांश महिला या मेट्रो शहरांतील होत्या.

Advertisement सब्सक्राइब करा

हे ही वाचा>> Sexual health: लैंगिक संबंधांसाठी ‘ही’ वेळ सर्वात वाईट, काय आहे कारण?

महिलांनी सांगितले कारण

भारतातील 10 पैकी 7 स्त्रिया त्यांच्या पतीची फसवणूक करत आहेत कारण त्यांचे पती त्यांना घरातील कामात मदत करत नाहीत, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. वैवाहिक जीवनाचा कंटाळा आल्याने दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या महिलांची संख्याही अशीच आहे.

हे ही वाचा>> Sexual Health Tips: लैंगिक संबंध ठेवताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर…

वैवाहिक जीवनात दुसऱ्याच्या पुरुषासोबत फ्लर्ट करण्याचे फायदे

सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, 37% स्त्रिया प्रतारणा करतात कारण त्या काहीतरी नवीन करायचं असतं आणि त्यांना त्यांचे सुरू असलेले संबंध देखील सुधारायचे असतात. ज्यावर अॅपचे मार्केटिंग स्पेशलिस्ट म्हणतात की याचा अर्थ असा लावला जाऊ शकतो की, विवाहबाह्य संबंध देखील लग्न मोडण्यापासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज