For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Chandrayaan-3 नंतर ISRO चं लक्ष सूर्यावर, कशी असेल Aditya-L1 मोहीम?

04:44 PM Aug 28, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
chandrayaan 3 नंतर isro चं लक्ष सूर्यावर  कशी असेल aditya l1 मोहीम
Advertisement

Aditya-L1 Mission : चांद्रयान 3 चे विक्रम लँडर 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. इस्रोच्या या चांद्रयान-3 मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश बनला आहे. खरं तर आता भारताची चंद्रानंतर सूर्याच्या जवळ जाण्याची तयारी सुरू आहे. इस्रोच्या या मिशनचे नाव 'आदित्य-L1' आहे. या मोहिमेअंतर्गत इस्रो काय प्रयत्न करत आहे? यामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर पोहोचण्याचा काय फायदा होईल? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. (ISRO's focus on MISSION Sun after Chandrayaan-3 how will Aditya-L1 mission be)

Advertisement Whatsapp share

'आदित्य-L1' मोहिमेची तयारी कुठपर्यंत पोहोचली?

14 ऑगस्ट रोजी इस्रोने 'आदित्य-L1' मोहिमेशी संबंधित काही फोटो शेअर केले होते. सूर्याचा अभ्यास करणारी इस्रोची ही पहिलीच मोहीम आहे. त्याची तयारी जोरात सुरू आहे. इस्रोने याबाबत ट्वीटरवर पोस्ट करून माहिती दिली.

Advertisement

Ajit Pawar Press : ‘महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा’; भुजबळांच्या भाषणावर अजितदादा बोलले

पोस्ट मध्ये लिहिलं होतं की, “PSLV-C57/Aditya-L1 मोहीम ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन केलेली अवकाश-आधारित वेधशाळा (ऑब्जर्वेटरी) आहे. ते प्रक्षेपणासाठी तयार केले जात आहे. याची सॅटेलाइट बंगळुरू येथील यूआर राव सॅटेलाइट सेंटर (URSC) येथे तयार करण्यात आली असून ती श्रीहरिकोटा येथे पोहोचली आहे."

Advertisement सब्सक्राइब करा

इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नीलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ही मोहीम 2 सप्टेंबर 2023 ला प्रक्षेपित केली जाऊ शकते. आदित्य-एल1 मिशन सूर्याचे खूप जवळून निरीक्षण करेल. सूर्याचे वातावरण आणि चुंबकीय क्षेत्राची माहिती गोळा करेल. त्यात 7 पेलोड बसवण्यात आले आहेत. जे सूर्याची किरणं आणि त्यातून निघणारे रेडिएशन, सोलर वादळ, फ्लेअर्स आणि कोरोनल मास इजेक्शन (CME) यांचा अभ्यास करतील. याशिवाय सूर्याचे इमेजिंग केले जाईल.

'या' मोहिमेच्या अभ्यासाची गरज का आहे?

सूर्य हा आपल्या सौरमालेतील एक मोठा ग्रह आहे. त्याच्या मध्यभागी हायड्रोजन आणि हेलियम आहे. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर 150 दशलक्ष किलोमीटर आहे. सूर्य पृथ्वीपेक्षा इतका मोठा आहे की, 1.3 दशलक्ष पृथ्वी त्यात बसू शकते. सूर्याचा सर्वात उष्ण भाग हा त्याचा गाभा म्हणजेच त्याच्या आतील भाग आहे. त्यामुळे प्रचंड ऊर्जा निर्माण होते. सूर्यप्रकाशातील स्फोटांपासून ते चार्ज केलेल्या कणांच्या प्रवाहापर्यंत, सूर्यामध्ये किंवा सूर्याद्वारे सूर्यमालेवर परिणाम करणारं बरंच काही घडत असतं.

Advertisement

Nitesh Rane on Thackeray Family : ‘स्टुडिओ विकण्यासाठी ठाकरेंच्या नितीन देसाईंना धमक्या’; नितेश राणेंचे गंभीर आरोप

सूर्याच्या पृष्ठभागाबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा भाग आपण पृथ्वीवरून पाहतो. त्याला फोटोस्फीअर म्हणतात. आपल्याला फक्त एक गोल चमकदार आकार दिसतो. याच्या वर सूर्याचे वातावरण आहे. या वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला क्रोमोस्फियर म्हणतात आणि सर्वात वरच्या थराला कोरोना म्हणतात. सामान्यत: सूर्यप्रकाशामुळे कोरोना दिसत नाही. परंतु सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा विशेष सॅटेलाइटद्वारे ते पाहता येते आणि या कोरोनावर काही महत्त्वाच्या घटना घडतात.

सूर्याच्या पृष्ठभागावर काय काय असते?

सूर्याच्या पृष्ठभागावर घडणारी पहिली घटना म्हणजे सोलर प्रॉमिनन्स

तुम्ही 100 वॅटचा फिलामेंट बल्ब पाहिला असेल. सोलर प्रॉमिनन्स म्हणजेच ते फिलामेंट म्हणून विचार करा. ज्याचे एक टोक तुटलेले आहे. सोलर प्रॉमिनन्स फोटोस्फियरपासून सुरू होऊन ते सूर्याच्या बाह्य वातावरणात म्हणजेच कोरोनापर्यंत येते. जसं की सूर्याच्या हजारो किलोमीटर बाहेर एक चमकणारा तारा अर्धवर्तुळाच्या आकारात बाहेर आला आहे. कधी ते एका दिवसासाठी तयार होतं तर कधी महिनाभर कोरोनामध्येच राहू शकतं. शास्त्रज्ञ अजूनही शोधत आहेत की सोलर प्रॉमिनन्स का तयार होते.

दूसरी गोष्ट म्हणजे सोलर अॅक्टिव्हिटी

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्याच्या वरच्या पृष्ठभागावर अनेक विद्युत चार्ज केलेले वायू आहेत, ज्यामुळे खूप शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार होतात. सूर्याचे चार्ज केलेले वायू हे स्थिर चुंबक नसून ते सतत इकडे तिकडे फिरत असतात, त्यामुळे चुंबकीय क्षेत्रही वळत राहते, आकुंचन पावते, विस्तारत असते किंवा मार्ग बदलत असते. यालाच सोलर अॅक्टिव्हिटीही म्हणतात. ही क्रिया नेहमी सारखीच राहात नाही, कधी ती कमी असते तर कधी जास्त असते. अधिक सोलर ऑक्टिव्हिटींमुळे सूर्याचे डाग तयार होतात. सनस्पॉट म्हणजे काळे डाग. सूर्याच्या पृष्ठभागावर जिथे चुंबकीय क्षेत्र खूप जास्त असते, तिथे सूर्याची आंतरिक ऊर्जा आत थांबते म्हणूनच ते काळ्या डागसारखे दिसते.

Who is Abdul Karim Telgi: ट्रेनमध्ये शेंगदाणे विकणारा ते सर्वात मोठा घोटाळेबाज, काय आहे कहाणी?

कोरोन मास इजेक्शन (CME) आहे तरी काय?

सूर्याच्या कोरोना थरातून काहीतरी बाहेर येणे म्हणजे मोठे गॅस फुगे आहेत ज्यावर मॅग्नेटिक फील्ड लाइंस गुंडाळल्या जातात. ते सूर्याच्या कोरोना थरातून बाहेर पडतात आणि ही प्रक्रिया कित्येक तास चालते. कोरोन मास इजेक्शन प्रत्यक्षात किरणोत्सर्गाचे कवच आणि सूर्याचे कण आहेत. ज्याच्या मॅग्नेटिक फील्ड लाइंस एकत्र आल्यावर अतिशय वेगाने स्फोट होतो.

आदित्य-L1 कोणत्या कुठपर्यंत पोहोचणार?

सूर्य आणि पृथ्वी या दोन्हीच्या आत गुरुत्वाकर्षण आहे. सूर्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा जास्त आहे. पण एका विशिष्ट टप्प्यावर दोघांमधील गुरुत्वाकर्षण एकमेकांना संतुलित करते. याचा अर्थ असा की या पॉइंटमधून जाणाऱ्या कक्षेत एखादी सॅटेलाइट ठेवली तर सूर्य किंवा पृथ्वी दोघेही त्याला स्वतःकडे खेचणार नाहीत. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील सरळ रेषेवर असेच पाच पॉइंट निश्चित केले आहेत.

गणितज्ञ जोसेफ-लुई लॅग्रेंज यांच्या नावावरून त्यांना लॅग्रेंज पॉइंट्स म्हणतात. L1 त्यापैकी एक आहे. L1 बिंदू पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर दूर आहे. हे अंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराचा शंभरावा भाग आहे. L1 चा फायदा असा आहे की त्यातून जाणार्‍या कक्षेत फिरणारी वस्तू (ज्याला हॅलो ऑर्बिट म्हणतात) सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणात लपत नाही.
इस्रोच्या म्हणण्यानुसार, सूर्यातून बाहेर पडणारे आणि पृथ्वीच्या दिशेने जाणारे सौर वादळ देखील L1 मधून जाते. त्यामुळेच आदित्य-एल1 मोहिमेसाठी सॅटेलाइटला एल1 मधून जाणाऱ्या हॅलो कक्षेत लॉन्च करण्यात येणार आहे. ते या कक्षेत राहून सूर्याची माहिती सतत गोळा करेल.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज