For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Parenting Tips : पालकांच्या 'या' सवयी मुलांच भविष्य करतात खराब, आजच बदला

06:58 PM Nov 21, 2023 IST | प्रशांत गोमाणे
parenting tips   पालकांच्या  या  सवयी मुलांच भविष्य करतात खराब  आजच बदला
Parenting tips Sign of competitive Parent kill future of children
Advertisement

Sign of competitive Parent : प्रत्येक पालकांना त्यांचा मुलगा अभ्यासात, खेळात चांगला असावा असे नेहमीच वाटते. यासाठी पालक मुलांकडून खूप अपेक्षा ठेवतात. जसे मुलांने वर्गात अव्वल यावे. तसेच शाळेच्या इतर अॅक्टीव्हिटीमध्ये सुद्धा त्याने स्वत:ला चांगल्या परफॉर्मन्स द्यावा. प्रत्येक पालक त्यांच्या मुला/मुलींकडून याच अपेक्षाच ठेवत असतो. पालकांच्या या अपेक्षांमुळे आणि काही सवयीमुळे मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे पालकांनी नेमक्या कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात. (Parenting tips Sign of competitive Parent kill future of children)

Advertisement Whatsapp share

पालक मुलं जन्माला आल्या आल्याच त्याच्यावर अपेक्षाच ओझ टाकत असतात. जसे आमच्या मुलाला अमुक तमुक बनवायचंय. त्याला आम्ही मोठा डॉक्टर, इंजिनियर बनवू. मुलाची स्वत:ची इच्छा काय असते, हे जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही.तसेच शाळेत गेल्यावर त्याने प्रत्येक विद्यार्थ्याशी स्पर्धा करावी. वर्गातून अव्वल यावे. खेळातही त्याने मेडल मिळवावे,अशा अनेक अपेक्षा पालकांकडून लादल्या जातात.या सवयी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नुकसानकारक ठरतात. त्यामुळे अशा परिस्थितीत पालकांनी नेमकं मुलांशी कसे वागावे, हे वाचूयात.

Advertisement

हे ही वाचा : WhatsApp Ban : …तर आयुष्यभरासाठी व्हाट्सअ‍ॅप होईल बॅन! ‘या’ चुका आजच टाळा

दुसऱ्या मुलांशी तुलना टाळा

अनेक पालकांना त्यांच्या मुलाची इतर मुलांशी तुलना करायची सवय असते. जसे उदाहरण द्यायचं झालं तर, तुझ्या मित्राला चांगले गुण मिळाले, तुला का नाही मिळाले. तुझा मित्र खेळातही चांगला आहे, तु काही नाही. अशी तुलना पालक आपल्याच मुलाची इतर मुलाशी करून बसतात. ज्यामुळे मुलांमध्ये खुप निराशा येते. त्यामुळे आपल्या मुलाची तुलना इतरांशी करणे टाळले पाहिजे.

Advertisement सब्सक्राइब करा

पालकांमध्येच रंगते स्पर्धा

अनेकदा पालक मित्रांमित्रांमध्ये स्पर्धा लावतातच, त्यासोबत स्वताचीही इतर पालकांशी स्पर्धा लावतात. जसे मुलाच्या मित्राने त्याची आई कशी टिफीन देते. त्याप्रमाणे तुम्ही देखील त्यापेक्षा चांगले टिफिन देण्याचा प्रयत्न करता. ज्यामुळे पालकांमध्येच स्पर्धा रंगते. हे देखील पालकांनी टाळले पाहिजे.

हे ही वाचा : Rohit Sharma : “सूर्यकुमारवर विश्वास नव्हता, तर…”, गंभीर-अक्रमने रोहितला सुनावलं

मुलांचा परफॉर्मन्स

काही पालक मुलांच्या परफॉर्मन्स खुप जास्त लक्ष देतात. ही चांगली देखील गोष्ट आहे. पण मुलांची तुलना झाली नाही पाहिजे. जर तुमच्या मुलाचे त्याच्या मित्रापेक्षा कमी गुण आले तर त्यावरून त्याला बोलल नाही पाहिजे. तसेच इतर स्पोर्टस अॅक्टीव्हीटीतही त्याची तुलना टाळली पाहिजे. याउलट तो या गोष्टीत कसा चांगला होईल याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज