तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते कसे आहे? जाणून घ्या 'या' गोष्टीतून...
Life Style : सध्याचा जमाना तंत्रज्ञानाचा असला, सोशल मीडियाचा (Social Media) आहे. त्यामुळे त्याचा परिणाम नातेसंबंधावरही झालेला दिसतो. कोणत्याही जोडप्याचे नातेसंबंध कसे आहेत, त्यांची विचार मिळतेजुळते आहेत की नाही हे ओळखण्याच्याही काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. कोणत्याही जोडप्यामध्ये किती प्रेम (Love) आहे हे केवळ त्यांच्या बोलण्यातून आणि सोशल मीडियाच्या पोस्टवरून दिसून येत नाही तर जाणूनबुजून आणि नकळत केलेल्या प्रत्येक कृतीतूनही ते दिसून येते.
जोडीदार नेमका कसा पाहिजे
त्याचबरोबर त्या दोघांच्या एकत्र झोपण्याच्या पद्धतीवरुनही काही गोष्टी कळत असतात. होय खरचं आहे, तुम्ही बरोबरच वाचले आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत ज्या पद्धतीने झोपता ते तुमच्यातील नातेसंबंधाची खोली दर्शवत असते. त्यामुळे जाणून घ्या प्रत्येक झोपण्याच्या पोझिशनचा नेमकं अर्थ काय आहे. तसेच तुमचे आणि तुमच्या जोडीदारामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे नाते आहे?
हे ही वाचा >> Chanakya Niti: अपयशाला घाबरू नका, चाणक्याचा युक्तीच्या 5 गोष्टी बदलून टाकतील आयुष्य
नात्यात विश्वास आणि सुरक्षितता
कोणतीही व्यक्ती आपल्या जोडीदाराला मागून मिठी मारून झोपत असेल तर ते नातेसंबंधातील विश्वास आणि सुरक्षितता दर्शवत असते. त्यावरुन असं दिसून येते की दोघांमध्ये अगदी खोल भावनिक नातेसंबंध निर्माण झाले आहेत. त्यामध्ये एका जोडीदाराला दुसऱ्याकडून आराम आणि सुरक्षितता मिळत असते.
नातेसंबंधात वेगळी जागा
ज्यावेळी कोणतेही जोडपे एकमेकांच्या पाठीवर झोपत असते तेव्हा ते नातेसंबंधातील स्वातंत्र्य आणि वैयक्तिकतेबाबत विचार करत असते. त्यातून दोघांच्या नातेसंबंधातील प्रत्येकाला वेगळा वेळ हवा असतो असंही दिसून येते.
नात्यातील असंतुलितपणा
तर एक जोडीदार दुसऱ्यापेक्षा जास्त जागा घेऊन झोपत असेल तर ते नात्यातील असंतुलितपणा दाखवत असते. त्यामुळे त्या त्या जोडीतील एक जोडीदार दुसऱ्यापेक्षा आपली भावनिक जागा अधिक घेत असते.