For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Perfume Headache : परफ्यूमच्या सुगंधामुळे डोकेदुखीचा त्रास का होतो? समजून घ्या

03:50 PM Sep 07, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
perfume headache   परफ्यूमच्या सुगंधामुळे डोकेदुखीचा त्रास का होतो  समजून घ्या
Advertisement

कधी कधी अगरबत्ती, अत्तर किंवा सेंट्सचे सुंगध इतके तीव्र असतात की, त्यामुळे आपल्याला चक्कर, डोकेदुखी सारखे त्रास होऊ लागतात. तर कधी शिंका येणे किंवा मळमळल्यासारखे वाटते? पण असा त्रास काहीच लोकांना होतो. उदाहरणार्थ, काहींना या सुगंधाने विशेष असा त्रास होत नाही. परंतु, दुसऱ्या व्यक्तींना डोकेदुखी सुरू होते, डोळ्यात पाणी येते किंवा त्वचेवर रिअ‍ॅक्शन होते. हे वासाच्या अ‍ॅलर्जीमुळे होते. याला परफ्यूम अ‍ॅलर्जी असंही म्हणतात. (smell of perfume cause headache Understand the reason)

Advertisement Whatsapp share

असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला ज्याने पैसे साठवून त्याच्या आवडीचा महागडा परफ्यूम विकत घेतला. त्याने तो परफ्यूम घरी आणून स्वतःच्याच अंगाला लावून पाहिला. दुःखाची गोष्ट म्हणजे काही मिनिटांतच त्या व्यक्तीची तब्येत बिघडू लागली. त्याला फक्त खोकला, मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागला नाही तर त्वचा देखील लाल झाली आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला.

Advertisement

Amravati Crime Illicit relationship : वहिनीवर दिराचे जडले प्रेम अन् पुतण्यालाच…

हे एक अ‍ॅलर्जीक रिअ‍ॅक्शन असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्या व्यक्तीला तीव्र सुगंधाची अ‍ॅलर्जी होती. पण हे का घडते आणि आपण ते कसे टाळू शकतो? हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊयात.

Advertisement सब्सक्राइब करा

लोकांना विशिष्ट सुगंध/परफ्यूमची अ‍ॅलर्जी का असते?

  • डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रोज वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये परफ्यूमचा वापर केला जातो.
  • परफ्यूम्स म्हणजेच ज्यामध्ये कृत्रिम सुगंध असतो.
  • परफ्यूममध्ये सुमारे अडीच हजार कण असतात ज्यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते.
  • सुमारे 20 टक्के लोकांना परफ्यूमची अ‍ॅलर्जी असू शकते.
  • ही अ‍ॅलर्जी अशा लोकांमध्ये जास्त आढळते ज्यांना आधी दुसरी कोणती अ‍ॅलर्जी आहे.
  • परफ्यूम, साबण, तेल, सनस्क्रीन आणि अगरबत्तीमुळेही अ‍ॅलर्जी होऊ शकते.
  • तुम्हाला कोणत्या उत्पादनाच्या वापरामुळे अ‍ॅलर्जी होते हे नेहमी लक्षात ठेवा.
  • परफ्यूममध्ये अल्कोहोल, हायड्रोकार्बन, प्राणी आणि वनस्पतींच्या घटकांचा वापर केला जातो. यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते.

Aditya L1 ने काढला पहिला सेल्फी, ISROने व्हिडिओ पोस्ट करून दिली मोठी माहिती

परफ्यूममुळे होणाऱ्या अ‍ॅलर्जीची लक्षणं कोणती?

  • डोळ्यात पाणी येणे, चिडचिड होणे
  • वासामध्ये बदल होणे
  • डोकेदुखी होणे
  • शरीरावर पुरळ येणे
  • त्वचेवर लालसरपणा येणे
  • श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो, अशा वेळी तातडीने डॉक्टरांकडे जावे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी निर्णयाची केली पोलखोल, शिंदे सरकार काय करणार?

अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी काय करावं?

  • तुम्हाला जी उत्पादनं सूट होतात केवळ त्यांचाच वापर करा.
  • कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी त्याची आधी टेस्ट करून पाहा.
  • उत्पादन खरेदी करण्यापूर्वी, लेबल तपासा की ते त्वचेसाठी योग्य आहे की नाही.
  • ही अ‍ॅलर्जी ऑफिसमध्ये होत असेल तर एअर प्युरिफायर सोबत ठेवा.
  • ही अ‍ॅलर्जी अशा लोकांमध्ये अधिक सामान्य आहे ज्यांना आधीच कोणती अ‍ॅलर्जी आहे.
  • तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही सांगा की, तुम्हाला एखाद्या विशिष्ट सुगंधाची अ‍ॅलर्जी आहे.
  • शक्यतो फक्त नैसर्गिक सुगंध असलेली उत्पादने वापरा.

कोणत्याही वासाची किंवा सुगंधाची अ‍ॅलर्जी असणे ही काही मोठी गोष्ट नाही. तुम्हाला कोणत्या गोष्टींची अ‍ॅलर्जी आहे याबाबत तुम्ही माहिती ठेवा आणि त्या गोष्टी वापरणं नेहमी टाळा.

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज