For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

ट्रेनला प्रचंड गर्दी अन् मिळत नाही तिकीट? 'या' सोप्या पद्धतीने IRCTC वर करता येईल तत्काळ बुकिंग!

04:23 PM Nov 06, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
ट्रेनला प्रचंड गर्दी अन् मिळत नाही तिकीट   या  सोप्या पद्धतीने irctc वर करता येईल तत्काळ बुकिंग
Train is very crowded and you don't get a ticket for Instant booking on IRCTC try this easy way
Advertisement

IRCTC Ticket Booking : भारतात कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. यंदा दिवाळी आणि त्यानंतर छठ पूजेचा सण काही दिवसांनी येत आहे. या सणासुदीच्या काळात अनेक लोक आपआपल्या घरी जातात. या काळात ट्रेनसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यामुळेच आज आपण अशा काही खास टिप्स जाणून घेऊयात ज्यांच्या मदतीने यूजर्स IRCTC वर तत्काळ तिकीट कन्फर्म करू शकतात. (Train is very crowded and you don't get a ticket for Instant booking on IRCTC try this easy way)

Advertisement Whatsapp share

IRCTC वर सीट बुकिंग इतक्या वेगाने होते की, बरेच लोक मागे राहून जातात. आज याच एका खास ट्रिकबद्दल समजून घेऊयात, ज्यानंतर तत्काळ तिकीट बुक करणे खूप सोपे होईल.

Advertisement

वाचा : Gram Panchayat Election Result 2023 : दिलीप वळसे पाटलांच्या गडाला सुरूंग

बुकिंग सुरू होताच प्रक्रिया मंदावते?

सामान्यत: लोकांची तक्रार असते की, जेव्हा ते IRCTC वर तत्काळ तिकीट बुक करतात तेव्हा वेबसाइटचा वेग कमी होतो किंवा अशा परिस्थितीत अनेकांचे इंटरनेट स्लो होते. अशा वेळी, यूजर्स प्रवाशांचे तपशील भरत असताना, अनेक जागा भरल्या जातात.

Advertisement सब्सक्राइब करा

'या' ऑनलाइन टूल्समुळे तिकीट बुकिंग होईल सोपे

IRCTC वर तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी, तुम्ही IRCTC तत्काळ ऑटोमेशन टूल वापरणे आवश्यक आहे. हे तुम्हाला प्रवाशांचे तपशील भरण्यास मदत करेल आणि तुम्ही त्वरीत तिकीट बुक करू शकता.

वाचा : Gram Panchayat election Result : हर्षवर्धन पाटलांना अजित पवार गटाकडून धक्का!

IRCTC तत्काळ ऑटोमेशन टूल काय आहे?

IRCTC तत्काळ ऑटोमेशन टूल हे एक मोफत ऑनलाइन टूल आहे, जे बुकिंगमध्ये लागणारा वेळ कमी करण्यात मदत करते. वास्तविक, हे प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग सेवा लाइव्ह होताच नाव, वय, प्रवासाची तारीख लगेच भरण्यास मदत करते, ज्यामुळे कन्फर्म तिकीट मिळणे सोपे होईल.

Advertisement

वाचा : Prathemesh-Mugdha Engagement : प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनने गुपचूप उरकला साखरपुडा ?

'या' टूलद्वारे ट्रेनची तिकिटे कशी बुक करायची?

  • क्रोम ब्राउझरमध्ये IRCTC तत्काळ ऑटोमेशन टूल डाउनलोड करा.
  • यानंतर IRCTC अकाउंटमध्ये लॉग इन करा.
  • तत्काळ तिकीट बुक करण्यापूर्वी, हे टूल तारीख, प्रवाशांचे डिटेल्स आणि तारीख सेव्ह करण्याची संधी देते.
  • बुकिंग प्रक्रियेदरम्यान तुम्हाला फक्त लोड डेटावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर डिटेल्स सेव्ह केले जाईल.
  • यानंतर लगेच पेमेंट करा. तुमचे तत्काळ तिकीट कोणत्याही त्रासाशिवाय बुक केले जाईल. यामुळे तिकीट बुकिंगची शक्यता वाढेल हे लक्षात ठेवा.
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज