For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

What is Hamas : माणसांच्या कत्तली... इस्रायलला संपवण्यासाठी जन्म; काय आहे हमास?

06:53 PM Oct 08, 2023 IST | भागवत हिरेकर
what is hamas   माणसांच्या कत्तली    इस्रायलला संपवण्यासाठी जन्म  काय आहे हमास
कोण आहे हमास जिने इस्रायलवर केले हल्ले?
Advertisement

Hamas History : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने शनिवारी (7 ऑक्टोबर) इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात भयावह आणि भंयकर हल्ला केला. हमासच्या सैनिकांनी जमिनीवरून आणि हवेतून अशा तिन्ही ठिकाणांहून इस्रायलला लक्ष्य केले. यात 300 हून अधिक लोक मारले गेले. शेकडो जखमी झाले आणि असंख्य लोकांना ओलिस ठेवले आहे.

Advertisement Whatsapp share

शनिवारी (7 ऑक्टोबर) इस्रायलमधून आलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारी आहेत. हमासचे दहशतवादी सामान्य लोकांवर अत्याचार करत आहेत. हमासकडून सुरू असलेल्या क्रूर कृत्ये थरकाप उडवत आहेत. याच संघटनेने अभेद्य समजल्या जाणाऱ्या इस्रायलची सुरक्षा व्यवस्था नष्ट केली. त्यामुळेच हमास कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

हमास ही पॅलेस्टिनी इस्लामिक दहशतवादी संघटना आहे, जिचा गाझा पट्टीवर कब्जा आहे. हमासने इस्रायलचा सत्यानाश करण्याची शपथ घेतली आहे आणि 2007 मध्ये गाझामध्ये सत्ता घेतल्यापासून इस्रायलशी अनेक युद्धे केली आहेत. त्या युद्धांदरम्यान हमासने इस्रायलवर हजारो रॉकेट डागलेत आणि इतर प्राणघातक हल्ले केलेत. इस्रायलनेही हमासवर वारंवार हवाई हल्ले केले आहेत आणि इजिप्तसोबत मिळून गाझा पट्टीवर 2007 पासून सुरक्षेसाठी नाकेबंदी केली आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

पॅलेस्टिनी गट हमास काय आहे?

1) हमास किंवा इस्लामिक संघटनेची स्थापना 1987 मध्ये पहिल्या पॅलेस्टिनी इंतिफादादरम्यान झाली. इंतिफादा, ज्याचा अर्थ बंड किंवा विद्रोह करणे आहे. याला इराणचा पाठिंबा आहे आणि त्यांची विचारधारा 1920 च्या दशकात इजिप्तमध्ये स्थापन झालेल्या मुस्लिम ब्रदरहूडच्या इस्लामिक विचारसरणीसारखी आहे.

हेही वाचा >> Israel Palestine : धर्म अन् भूमी… इस्रायल-पॅलेस्टाईनमधील रक्तरंजित संघर्षाची कहाणी काय?

2) पॅलेस्टाईनमध्ये इस्लामिक राजवट प्रस्थापित करणे आणि इस्रायलला नष्ट करणे हे या दहशतवादी संघटनेचे उद्दिष्ट आहे. वयाच्या 12व्या वर्षापासून व्हीलचेअरवर बसलेल्या शेख अहमद यासिन यांनी हमासची स्थापना केली होती. यासीनने 1987 मध्ये इस्रायलविरुद्ध पहिला इंतिफादा (बंडाची घोषणा) घोषित केला होता.

Advertisement

3) 2007 मध्ये गृहयुद्धात हमासने राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या सैन्याचा पराभव केला. ज्यांनी वेस्ट बँकमध्ये सत्ता घेतली आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) चे प्रमुख केले.

'हमास'ने काय काय केलंय?

4) 2006 च्या पॅलेस्टिनी संसदीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर हमासने गाझापट्टी ताब्यात घेतली. त्यानंतर येथे शेवटच्या वेळी निवडणुका झाल्या. हमासने महमूद अब्बास यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला. त्याचवेळी अब्बास यांनी हमासने गाझा ताब्यात घेणे म्हणजे सत्तापालट असल्याचे म्हटले होते.

5) तेव्हापासून हमासची इस्रायलशी अनेक युद्धे झाली आहेत, ज्यात अनेकदा गाझामधून इस्रायलच्या दिशेने रॉकेट डागले गेले आहेत. प्रत्युत्तरात इस्रायलकडूनही हवाई हल्ले आणि रॉकेट हल्ले केले गेले आहेत.

हेही वाचा >> Israel: ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा, तरूणीच्या अंगावर बसून दहशतवाद्यांनी तोडले अब्रूचे लचके!

6) हमासने इस्रायलला मान्यता देण्यास नकार दिला आहे. आणि 1990 च्या मध्यात इस्रायल आणि पीएलओ यांनी वाटाघाटी केलेल्या ओस्लो शांतता कराराला हिंसक विरोध केला होता.

7) हमासची इज्ज अल-दिन अल-कासम ब्रिगेड नावाची सशस्त्र शाखा आहे, ज्यांनी अनेक बंदूकधारी आणि आत्मघाती बॉम्बर इस्रायलला पाठवले आहेत. हमास आपल्या सशस्त्र कारवायांचे वर्णन इस्रायलविरूद्धचा प्रतिकार म्हणून करते.

हमासला कुणा कुणाचा पाठिंबा?

8) त्याच्या 1988 च्या संस्थापक चार्टरमध्ये इस्रायलचा नाश करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, हमासच्या नेत्यांनी 1967 च्या युद्धात इस्रायलने बळकावलेल्या सर्व पॅलेस्टिनी भूभागावर व्यवहार्य पॅलेस्टिनी राज्याच्या बदल्यात इस्रायलबरोबर दीर्घकालीन युद्धविराम (अरबीमध्ये हुडना) करण्याचीही वारंवार ऑफर दिली आहे. दुसरीकडे, इस्रायल याला फसवणूक मानत आहे.

9) इस्रायल, युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन, कॅनडा, इजिप्त आणि जपान यांनी हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. हमास हा असा गट आहे, ज्यात इराण, सीरिया आणि लेबनॉनमधील शिया इस्लामी गट हिजबुल्ला यांचा समावेश आहे, जे मध्य पूर्व आणि इस्रायलमधील अमेरिकेच्या धोरणांचा व्यापकपणे विरोध करतात.

हमासच्या सत्तेचा आधार गाझामध्ये आहे. हमासचे पॅलेस्टिनी प्रदेशातही समर्थक आहेत आणि त्यांचे नेते कतारसह मध्यपूर्वेतील देशांमध्ये पसरलेले आहेत. हमासने शनिवारी (7 ऑक्टोबर) केलेला रॉकेट हल्ला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज