For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Hamas समोर मोसाद का ठरली अपयशी? हल्ल्यामागील तीन प्रमुख कारणं समजून घ्या...

03:37 PM Oct 09, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
hamas समोर मोसाद का ठरली अपयशी  हल्ल्यामागील तीन प्रमुख कारणं समजून घ्या
Why did Mossad fail Infront of Hamas May Be these three reasons behind the attack on Israel
Advertisement

Israel-Palestine Conflict : इस्त्रायलचा उल्लेख जगात वेळोवेळी केला जातो. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचे कारनामे प्रख्यात आहेत. ही जगातील सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली गुप्तचर संस्था मानली जाते. मोसादकडे एवढी प्रगत हेरगिरी तंत्रे असल्याचा दावा केला जात आहे की त्यांच्यापासून कोणतीही गुप्तचर माहिती लपून राहू शकत नाही. (Why did Mossad fail Infront of Hamas May Be these three reasons behind the attack on Israel)

Advertisement Whatsapp share

याशिवाय इस्रायलचे सुरक्षा दल, ज्यांना इस्रायल डिफेन्स फोर्सेस म्हणून ओळखले जाते, ते ही बऱ्यापैकी शक्तिशाली आहेत. इस्रायली सुरक्षा उपक्रमाकडे जगातील सर्वात प्रगत शस्त्रे आहेत. त्यामुळे हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की, इस्रायलला या हल्ल्याचा सुगावा कसा लागला नाही? इस्रायलला हे अपयश कसं आलं, त्याची कारणे काय होती? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात.

Advertisement

भाजपच्या बालेकिल्ल्यात ‘मविआ’ची मुसंडी, नांदेड कृषी समितीत शेकापने उधळलला गुलाल

जर तुम्ही नकाशावर नजर टाकली तर तुम्हाला इस्रायल आणि गाझा पट्टीची सीमा दिसेल. या गाझा पट्टीतून हमासच्या हल्ल्याला सुरुवात झाली. येथून क्षेपणास्त्र डागण्यात आले. त्यानंतर हमासच्या सैनिकांनी जमीन, हवाई आणि सागरी मार्गाने इस्रायलमध्ये घुसखोरी केली. हमासने यापूर्वीही गाझा पट्टीतून हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र गोळीबाराच्या घटना जवळपास रोजच घडत आहेत. हे टाळण्यासाठी इस्रायलने आयर्न डोम नावाचे संरक्षण कवच तयार केले आहे. जे क्षेपणास्त्र हल्ल्यांना इस्रायलमध्ये प्रवेश करण्यापासून रोखते.

Advertisement सब्सक्राइब करा

याशिवाय इस्रायलने गाझा पट्टीवर नाकेबंदी केली आहे. ज्यांच्या सुरक्षेसाठी सतत गस्त असते. याठिकाणी सेन्सर आणि कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या घुसखोरीवर नजर ठेवता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, हमासचे सैनिक हे तिथलं तारेचं कुंपण तोडून इस्रायलमध्ये घुसले.

इस्रायलच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 1973 मध्ये गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली होती. जेव्हा योम किप्पूरच्या दिवशी अरब देशांनी अचानक हल्ला केला आणि गुप्तचर यंत्रणांना काहीच सुगावा लागला नाही. योम किप्पूर हा ज्यूंचा सर्वात मोठा सण आहे. यावेळी हा हल्ला योम किप्पूरच्या एका दिवसानंतर झाला. त्यामुळे हा हल्ला पूर्ण नियोजनातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी इस्रायली गुप्तचर यंत्रणांची चूक कुठे झाली हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेक तज्ज्ञ आणि अहवालानुसार, इस्रायली यंत्रणा काही सिग्नल शोधण्यात अपयशी ठरली. या हल्ल्यामागे तीन प्रमुख कारणे आहेत.

Advertisement

Assembly Election Dates 2023 : बिगुल वाजला! राजस्थान, मध्य प्रदेशसह 5 राज्यांचा 3 डिसेंबरला निकाल

पहिलं कारण – 'इस्रायलच्या वेस्ट बँकवरील लक्ष'

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे कट्टर उजव्या विचारधारेचे नेते बेन ग्विर यांच्या पक्षाच्या सहकार्याने सरकार चालवत आहेत. बेन ग्विर हे इस्रायलचे संरक्षण मंत्री आहेत आणि वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी क्षेत्रांवर ताबा मिळवण्यासाठी ते समर्थ होते. बेन ग्विर यांच्यावर आरोप आहेत की त्यांच्या कार्यकाळात वेस्ट बँकमध्ये प्रचंड तणाव आहे.

वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टिनी नागरिकांना जमीन बळकावण्याच्या आणि बेदखल करण्याच्या मोठ्या घटना घडत आहेत. इस्रायली सुरक्षा दलांचा मोठा भाग वेस्ट बँकमध्ये तैनात करण्यात आला आहे. वेस्ट बॅंकवर अधिक लक्ष क्रेंदित केल्यामुळे गाझामधील सुरक्षा दलांची संख्या कमी झाली. दररोज हजारो लोक कामाच्या संदर्भात गाझामधून इस्रायलमध्ये प्रवेश करतात. हमासला या लोकांकडून पैसे मिळतात. 2021 मध्ये, इस्रायलने गाझा पट्टीमध्ये मोठी कारवाई केली. त्यानंतर बऱ्याच अंशी शांतता कायम राहिली. गेल्या दोन वर्षांत कोणतीही मोठी घटना घडली नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना हमासचे नियोजन समजण्यात अपयश आले असावे.

दुसरं कारण- 'अल-अक्सा मशिदीचा वाद'

यावर्षी एप्रिल महिन्यात इस्रायली पोलीस 'अल-अक्सा' मशिदीत घुसले होते. मशिदीच्या आत तोडफोड करण्यात आली आणि लोकांवर स्टन गन आणि रबर बुलेटने हल्ला करण्यात आला. ज्यात सुमारे 40 जण जखमी झाले. यावर पोलिसांचं म्हणणं होतं की, काही बदमाश मास्क घालून मशिदीत लपले होते. त्यांच्याकडे काठ्या, फटाके आणि दगड होते. त्यामुळे त्यांना आवारात प्रवेश करावा लागला. या घटनेनंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील तणाव वाढू लागला.

त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत, जेव्हा इस्रायली लोकांनी अल-अक्सा मशिदीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनांमुळे हमास अनेक दिवसांपासून इस्रायलला धडा शिकवण्याच्या तयारीत होता, असे जाणकारांचे मत आहे. हमासने या हल्ल्याला अल-अक्सा फ्लड्स असे नावही दिले आहे. हमासच्या निवेदनात असेही म्हटले आहे की, 'हा हल्ला अल-अक्साच्या संरक्षणासाठी करण्यात आला आहे. अल अक्सा मशीद वेस्ट बँकेच्या जवळ आहे. त्यामुळे वेस्ट बँक परिसरात सुरक्षेसाठी अतिरिक्त काळजी घेण्यात आली होती. पण या प्रकरणावर गाझामधून एवढी मोठी प्रतिक्रिया येऊ शकते याची कल्पना इस्रायली सुरक्षा दलांना नव्हती.'

Hamas Israel : पॉर्न स्टार मिया खलिफाची संघर्षात उडी, हमासबद्दल काय बोलली?

तिसरं कारण- 'इस्रायल-सौदी अरेबिया करार'

गेल्या काही वर्षांत इस्रायल आणि अरब देशांमधील संबंध सुधारले आहेत. अमेरिकेच्या पुढाकाराने पहिला अब्राहम करार झाला. त्यामुळे बहरीन, मोरोक्को आणि यूएईने इस्रायलला मान्यता दिली. आता सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये करार झाल्याची चर्चा आहे. माहितीनुसार, या कराराअंतर्गत इस्रायल पॅलेस्टाईन अथॉरिटीला (पीए) सवलत देऊ शकते. पॅलेस्टाईन प्राधिकरण हा वेस्ट बँक नियंत्रित करणारा गट आहे. 2006 पूर्वी गाझा पट्टीवरही त्याचे नियंत्रण होते. पण 2006 नंतर हमाससोबतच्या लढाईत गाझा पट्टी पॅलेस्टाईन प्राधिकरणाच्या हातातून गेली.

पॅलेस्टाईन प्राधिकरण आणि हमास दोघेही पॅलेस्टिनींचे खरे नेते असल्याचा दावा करतात. इस्रायल सरकार आणि पीए यांच्यात कोणताही करार हमासला नको आहे. इराण हमासला पाठीशी घालतो. दोघांनाही अरब देश आणि इस्रायलमधील सुधारणारे संबंध पुढे जाण्यापासून रोखायचे आहेत. हा ताजा हल्ला अरब देश आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेली शांतता चर्चा रुळावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे..

या सर्व कारणांशिवाय इतरही काही मोठे प्रश्न कायम आहेत. मोसादने आपले हेर गाझा पट्टीत तैनात ठेवले आहेत. एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार, 2014 मध्ये इस्रायली सूत्रांनी गाझा पट्टीमध्ये पूर्णपणे गुप्तचर नेटवर्क स्थापित केल्याचा दावा केला होता. अशा वेळी मोसादला शस्त्रांचा एवढा मोठा साठा तैनात करण्याबाबत कल्पना नसणे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. इस्रायली जनता आणि प्रसारमाध्यमे आता हे प्रश्न उपस्थित करत आहेत. सध्या विरोधकही सरकारच्या पाठीशी येऊन उभे राहिले आहेत. मात्र येत्या काळात या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाची सखोल चौकशी होणार आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज