For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Mumbai Tak Chavadi : जितेंद्र आव्हाडांनी कुणाला घाबरून दहीहंडी केली बंद?

08:52 PM Aug 03, 2023 IST | भागवत हिरेकर
mumbai tak chavadi   जितेंद्र आव्हाडांनी कुणाला घाबरून दहीहंडी केली बंद
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्यातील पाचपाखाडी भागात भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करायचे. पण, जितेंद्र आव्हाडांनी हा उत्सह घेणं बंद केलं.
Advertisement

Jitendra Awhad Dahi Handi : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्यातील पाचपाखाडी भागात भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करायचे. पण, जितेंद्र आव्हाडांनी हा उत्सह घेणं बंद केलं. जितेंद्र आव्हाडांनी हा निर्णय का घेतला? यामागे नेमकी काय कारण आहेत? याबद्दल त्यांनीच कारण सांगितलं. आमदार जितेंद्र आव्हाडांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना दहीहंडी बंद करण्यामागे एक भीती होती, हे सांगितलं.

Advertisement Whatsapp share

'सध्या इतके राजकीय खेळ चाललेत, पण तुमचा आवडता खेळ दहीहंडी आणि तो तुम्ही बंदच करून टाकलात. तुम्ही दहीहंडी बंद का करून टाकली', असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला.

Advertisement

वाचा >> शरद पवार नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला कारण…; जितेंद्र आव्हाडांनी केला खुलासा

या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, "असं आहे की, 2014 साली उच्च न्यायालयाचा निकाल आला. मग ते गाद्या घाला. मग उंची कमी करा. अमूक करा, तमूक करा. एक तर पहिलं तिथे खल्लास झालं. दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्टपणाने सांगतो की, मी 11 लाख रुपये रोख बक्षीस द्यायचो. आणि 25 हजारांची शंभर-दोनशे बक्षिसे वाटायचो. 1 लाखाची 20-25 बक्षिसे वाटायचो. ते सगळे रोख द्यायचो. आता जर मला कुणी विचारलं की, कॅश कुठून आणली, तर काय उत्तर देऊ."

Advertisement सब्सक्राइब करा

परत येईन पण आतमध्ये जाईन -जितेंद्र आव्हाड

याच मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, "किती एजन्सीज (केंद्रीय तपास यंत्रणा) माझ्या मागे लागतील. मग मला दहीहंडी महत्त्वाची की एजन्सींना लांब ठेवणं महत्त्वाचं? मी दहीहंडीवाल्यांनाही सांगितलं कारण दहीहंडीवाले माझ्याकडेच येतात. ते म्हणतात की, 'साहेब, तुम्ही नाहीतर दहीहंडीला काहीच महत्त्व नाही. ग्लॅमरच राहिलेलं नाही. तुम्ही परत या.' मी त्यांना म्हटलं की, परत येईन पण आतमध्ये जाईन. तेव्हा तुम्हीच खेळा तुमची दहीहंडी. आता मला त्यात नका घेऊ", असं आव्हाडांनी सांगितलं.

वाचा >> सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या! भाजपला घेरलं; म्हणाल्या, ‘नॅचरली करप्ट पार्टी म्हणता, मग…’

"आणखी एक प्रामाणिक सांगायचं म्हणजे मी 12-12 तास तिथे शब्दांवरती खेळवायचो. मला अजूनही आठवतं की, क्राऊड असायचा. मी आवाज दिला तरी लोक हलायचे नाहीत. आता मी 12 तास बोलू शकेन की नाही, याबद्दल... माझ्या एनर्जीबद्दल मला शंका आहे. तेव्हा मी 12 तास न थांबता बोलायचो. मज्जा यायची. बारा कपडे... मी एक महिना शॉपिंग करायचो. काय कपडे घालायचे, काय डोक्याला बांधायचं. मज्जा असायची", अशा आठवणींनीही आव्हाडांनी सांगितल्या.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज