For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

भाजपची तक्रार, CM शिंदेंना धक्का! BMC ची कंत्राटदाराला नोटीस, प्रकरण काय?

03:17 PM Oct 13, 2023 IST | भागवत हिरेकर
भाजपची तक्रार  cm शिंदेंना धक्का  bmc ची कंत्राटदाराला नोटीस  प्रकरण काय
बृहन्मुंबई महापालिकेने रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस बजावली आहे. कंत्राटदार एकनाथ शिंदेंच्या जवळचा असल्याचे म्हटले जात आहे.
Advertisement

Eknath Shinde-BJP, Mumbai Politics : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी जरी सत्तेत एकत्र असले तरी विविध मुद्यांवरुन एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न तिनही पक्षांकडून केला जात आहे. त्यातच आता भाजपच्या लोकप्रतिनिधींमुळे शिंदेंच्या मर्जीतल्या कंत्राटदाराला बीएमसीने नोटीस पाठवल्याने भाजप शिंदेंवर कुरघोडी करतंय का असा प्रश्न निर्माण झाला आहे? त्यामुळे बीएमसीमध्ये नेमकं घडतंय काय आणि एका नोटीसीमुळे भाजप आणि शिंदेंच्या राजकारणावर कसा फरक पडेल हेच समजावून घेऊयात...

Advertisement Whatsapp share

मुंबईला खड्डेमुक्त करण्याचा निर्धार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. दोन वर्षांमध्ये मुंबईला खड्डेमुक्त करु असं ते म्हणाले होते. यासाठी नोव्हेंबर 2022 मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. शहर भागासाठी एक, पूर्व उपनगरांसाठी एक तर पश्चिम उपनगरासाठी तीन अशा एकूण पाच निविदा मागवण्यात आल्या होत्या. एकूण 6 हजार कोटींच्या कामांसाठी या निविदा मागवण्यात आल्या होत्या. यासाठी नामांकित कंत्राटदारांना काम देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. असं असलं तरी प्रत्यक्षात कामं सुरु झाली नव्हती.

Advertisement

शिंदेंच्या जवळच्या कंत्राटदाराला नोटीस का?

जानेवारीमध्ये रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश निघाल्यानंतरही शहर विभागातील कामे अद्याप सुरु न झाल्याने बीएमसीने कंत्राटदाराला अंतिम नोटीस बजावली आहे. सर्व डिपॉझिट जप्त करुन काम काढून घेण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. हा कंत्राटदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा असून भाजपच्या नगरसेवकांनी वारंवार केलेल्या तक्रारीमुळे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. याबाबतची बातमी दैनिक लोकसत्ता यांनी दिली आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

हेही वाचा >> ‘2 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश द्यावे लागतील..’, कोर्टाने नार्वेकरांना झापलं!

या आधी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सिमेंटच्या रस्त्यांवरुन रान उठवलं होतं. सिमेंटच्या रस्त्यांच्या कंत्राटामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंना केला होता. त्याचबरोबर ही कामं पावसाळ्याआधी सुरु होणार नाहीत असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले होते.

भाजपच्या माजी नगरसेवकांची तक्रार काय?

आता थेट भाजपच्याच माजी लोकप्रतिनिधींकडून बीएमसीकडे तक्रार करण्यात आली. वारंवार केलेल्या तक्रारीमुळे बीएमसीने कंत्राटदाराला अखेरची नोटीस पाठवली आहे. वेळेत काम सुरु न झाल्याने या आधी देखील बीएमसीकडून कंत्राटदाराला नोटीस पाठवण्यात आली होती. त्याचबरोबर दंड देखील करण्यात आला होता. असं असताना काम सुरु न झाल्याने आता अंतिम नोटीस देण्यात आली आहे.

Advertisement

हेही वाचा >> Sextortion : तरुणीने टाकलं प्रेमाचं जाळं अन् रेल्वे कर्मचाऱ्याचा गेला जीव; करु नका ‘ही’ चूक

दरम्यान मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी चढाओढ सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीएमसीमध्ये नगरसेवक नाहीत. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कार्यालय बीएमसीमध्ये सुरु करण्यात आले होते. त्यावरुन मोठ्याप्रमाणावर गदारोळ माजला होता. विरोधकांकडून यावर टीका करण्यात आली होती. लोकांच्या कामांसाठी हे कार्यालय उघडण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबईचे शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे देखील कार्यालय बीएमसीमध्ये उघडण्यात आलं होतं. त्यामुळे एकप्रकारे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदेंना धक्का

दुसरीकडे बीएसीमध्ये भाजपला स्वतःचा महापौर बसवायचा आहे. त्यासाठी भाजप कामाला लागली आहे. दुसरीकडे युतीत निवडणुका झाल्या तर जागा वाटप कशा असणार याबाबत देखील अद्याप स्पष्टता आलेली नाही. विरोधकांकडून देखील बीएमसीवरुन भाजप आणि शिंदेंना टार्गेट करण्यात येत आहे. त्यामुळे आता शिंदेंच्या मर्जीतल्या कंत्राटदारालाच बीएमसीने नोटीस पाठवल्याने शिंदेंना हो मोठा धक्का मानला जातोय. आता या प्रकरणात या कंत्राटदारावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज