For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

मातोश्री बंगल्याच्या आवारात चार फुटांचा 'क्रोबा'; उद्धव ठाकरेही आले घराबाहेर

10:34 AM Aug 07, 2023 IST | मुस्तफा शेख
मातोश्री बंगल्याच्या आवारात चार फुटांचा  क्रोबा   उद्धव ठाकरेही आले घराबाहेर
बंगल्याच्या परिसरात कोब्रा जातीचा नाग आढळून आल्याचे कळल्यानंतर उद्धव ठाकरे हेही घराबाहेर आले होते.
Advertisement

King cobra was Found at Matoshree, Residence of Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या आवारात नाग दर्शन झाले. रविवारी (6 ऑगस्ट) दुपारी मातोश्री बंगल्याच्या परिसरात किंग कोब्रा साप आढळून आला. सर्पमित्रांना बोलावून नागाला पकडण्यात आले आणि वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. (A four-feet long cobra was found at Matoshree)

Advertisement Whatsapp share

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रेतील कलानगर परिसरात उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान आहे. रविवारी (6 ऑगस्ट) दुपारी 1.54 वाजता वाईल्ड लाईफ अॅनिमल प्रोटेक्शन अॅण्ड रेस्क्यू असोसिएशन या संस्थेला मातोश्रीवरून कॉल आला.

Advertisement

A four-feet long cobra was found at Matoshree.

Advertisement सब्सक्राइब करा

मातोश्री परिसरात साप आढळून आला आहे. आम्हाला सर्पमित्रांची गरज आहे, असे कॉल करून संस्थेला सांगण्यात आले. त्यानंतर संस्थेकडून अतुल कांबळे यांना उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले.

वाचा >> "बिचारा देवेंद्र, मला दया येते", ठाकरे फडणवीसांना असं का म्हणाले?

कोब्रा जातीचा नाग मातोश्री परिसरात असलेल्या टाकीच्या मागे बसलेला होता. विषारी असलेल्या या नागाची लांबी अंदाजे चार फूट इतकी आहे. सर्पमित्र अतुल कांबळे यांनी नागाला पकडले आणि याची माहिती ठाणे वन विभागाला दिली.

Advertisement

वाचा >> जयंत पाटलांना भाजपची ऑफर? जितेंद्र आव्हाड म्हणाले,"सत्ता येते जाते”

सर्पमित्राने हा नाग वन विभागाच्या ताब्यात दिला. नागाला कोणतीही इजा झालेली नसल्याचे आढळून आल्यानंतर ठाणे वन विभागाने हा कोब्रा जातीचा नाग नैसर्गिक अधिवासात सोडून दिला.

उद्धव ठाकरेही आले बंगल्यातून बाहेर

Uddhav Thackeray and his son Tejas Thackeray came out of their residence to see the snake

बंगल्याच्या परिसरात कोब्रा जातीचा नाग आढळून आल्याचे कळल्यानंतर उद्धव ठाकरे हेही घराबाहेर आले होते. त्यांनीही हा नाग बघितला आणि सर्पमित्राकडून त्याची माहिती घेतली.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज