For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Mulund : 'दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून...', आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्ला

08:40 AM Sep 28, 2023 IST | भागवत हिरेकर
mulund    दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून      आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्ला
तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला घर गुजराती व्यक्तीनेऑफिससाठी जागा नाकारली. आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला केला सवाल.
Advertisement

Mulund Trupti Deorukhkar Video : मुलुंडमध्ये मराठी महिलेला ऑफिससाठी जागा देण्यास नकार दिल्याचा प्रकार घडला. गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घर देणार नाही, असं सांगत नकार दिला. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असून, आता आदित्य ठाकरेंनी शिंदे-भाजप निशाणा साधला आहे. (Gujarati man rejects home to Marathi woman in Mulund)

Advertisement Whatsapp share

तृप्ती देवरुखकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी गुजराती व्यक्तीने मराठी माणसांना सोसायटीत घर देत नाही, असं म्हणून ऑफिससाठी जागा देण्यास नकार दिल्याचं म्हटलं आहे. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत.

Advertisement

आदित्य ठाकरेंनी शिंदे-भाजपला केले लक्ष्य

आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणाले, "चीड आणणारी घटना… पण प्रश्न हा आहे, की हे पाहून मिंधे-भाजपा सरकार काय करणार?", असा सवाल ठाकरेंनी केलाय.

Advertisement सब्सक्राइब करा

"आमच्या मराठमोळ्या वारकऱ्यांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठ्या चालवल्या… तसा इथेही कायद्याचा धाक दाखवणार की दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून ‘हाताची घडी तोडांवर बोट’ ठेवून गप्प बसणार?", असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

हेही वाचा >> शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरेंच्या वकिलाने मांडला गंभीर मुद्दा

"ह्या बिल्डींगवर कारवाई होणार का? उद्या BMC आणि पोलीस पाठवणार का? की 'थॅंक यू' म्हणून बुलेट ट्रेनच्या कामाला वेग देणार? हिम्मत करा! कायद्याचा धाक 'इथे' दाखवा! महाराष्ट्र बघतोय! अतिशय संतप्त करणारी ही घटना", असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय.

Advertisement

अजित पवारांनी दिला इशारा

मुलुंडमध्ये घडलेल्या या प्रकारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात अशा घटना अजिबात चालणार नाहीत. अशी मक्तेदारी सहन केली जाणार नाही. आम्ही या घटनेची गंभीर दखल घेऊ आणि मराठी माणसाचा अपमान करण्याचे धाडस होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ", असे अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा >> Ajit Pawar:दादा मुख्यमंत्री? मोहित कंबोज यांचे बोचणारे 8 शब्द, Tweet का केलं डिलीट?

मनसेचा इंगा, गुजराती माणसाने मागितली माफी

तृप्ती देवरूखकर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मुलुंडमधील मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन गुजराती व्यक्तीला धारेवर धरले. त्या व्यक्तीला जाब विचारला. मनसे कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला तृप्ती देवरुखकर आणि मराठी माणसांची माफी मागायला लावली. माफी मागतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज