For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

'मुंबईत साखळी बॉम्बस्फोट होणार'; धमकी देणाऱ्याला अटक, नावंही आलं समोर

10:37 AM Aug 06, 2023 IST | भागवत हिरेकर
 मुंबईत साखळी बॉम्बस्फोट होणार   धमकी देणाऱ्याला अटक  नावंही आलं समोर
मुंबई साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात येणार असल्याचा धमकीचा कॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Advertisement

Threat call of Serial Bomb Blast in Mumbai : मुंबईत साखळी बॉम्बस्फोट होणार आहे, अशी धमकी एका व्यक्तीने दिली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करून अज्ञात व्यक्तीने फोनवरून ही धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली. (Threat call gets mumbai police control room that serial bomb blast will be in mumbai)

Advertisement Whatsapp share

राज्यात इसिस महाराष्ट्र मोड्यूल केस प्रकरण चर्चेत असतानाच रविवारी मुंबई पोलीस दलात धमकीचा एक कॉल आला. या व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून सांगितले की, मुंबई साखळी बॉम्बस्फोट होणार आहेत.

Advertisement

रविवारी (6 ऑगस्ट) सकाळी हा धमकीचा कॉल आला. हा कॉल एका महिला पोलीस अधिकाऱ्याने घेतला. धमकी देणाऱ्या व्यक्तीने असा दावा केला की, मुंबईतील एका लोकल ट्रेन मध्ये बॉम्ब ठेवला आहे. अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

Advertisement सब्सक्राइब करा

वाचा >> NIA : डॉक्टरची पुण्यातून घातक कृत्ये? तरुणांना लावत होता इसिसच्या नादाला!

कोणत्या लोकल ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवला आहे, याबद्दल माहिती विचारली असता, समोरच्या व्यक्तीने कोणतेही उत्तर दिले नाही.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने कॉल बंद करताना पोलिसांना सांगितलं की, तो विले पार्ले परिसरातून बोलतोय. पोलिसांनी पुन्हा त्या नंबरवर कॉल केला. मात्र, तोपर्यंत समोरच्या व्यक्तीने मोबाईल स्विच ऑफ केला होता.

Advertisement

पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

धमकीचा कॉल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी काही तासांत या व्यक्तीला अटक केली. आरोपीचं नाव अशोक शंकर मुखिया असे आहे. तो मूळचा बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी त्याला मुंबईतील जुहू परिसरातून अटक केली.

मुंबई, ठाणे, पुण्यात अटकसत्र

दहशतवाद विरोधी केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने आणि एटीएसने महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुण्यात धाडी टाकत काही संशयित अतिरेक्यांना अटक केली आहे. एनआयएने अटक केलेल्या व्यक्तींविरुद्ध गंभीर आरोप केले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

वाचा >> नितीन देसाईंच्या मुलीचा खळबळजनक आरोप, "कंपनीची खोटी आश्वासनं, फसवणूक…"

28 जून 2023 रोजी इसिस महाराष्ट्र मोड्यूल प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. एनआयएने आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. यात मुंबईतून नासीर सिद्दीकी, पुण्यातून झुबैर नूर मोहम्मद शेख, ठाण्यातून शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला आणि पुण्यातील कोंढव्यातून डॉ. अदनान अली सरकार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज