For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Sion Accident : वाशिमचा दिनेश मुंबईत आला पण मृतदेहच घरी गेला, आईने फोडला टाहो

01:49 PM Aug 20, 2023 IST | मुंबई तक
sion accident   वाशिमचा दिनेश मुंबईत आला पण मृतदेहच घरी गेला  आईने फोडला टाहो
मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर दिनेश राठोडचा लोकलखाली चिरडून मृत्यू झाला. दिनेशला एका दाम्पत्याने मारहाण केली, त्यावेळी त्याचा तोल गेला.
Advertisement

-जका खान, वाशिम

Advertisement Whatsapp share

Sion Station Accident : तारीख होती 13 ऑगस्ट. ठिकाण होतं सायन स्टेशन. एका तरुणाला महिला अचानक छत्रीने मारायला लागते. त्याचवेळी तिचा पती तरुणाला जोरात मारतो आणि तो तोल जाऊन रेल्वे रुळावर कोसळतो. त्यानंतर काही क्षणातच मृत्यू त्याचा घास घेतो. सायन स्टेशनवर लोकलखाली चिरडून मेलेल्या दिनेश राठोड या तरुणाचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. वाशिम जिल्ह्याचा रहिवाशी असलेल्या दिनेशचं कुटुंबावर या घटनेनं मोठा आघात झालाय. लेकाच्या दुःखाने आई कोलमडून गेलीये.

Advertisement

दिनेश राठोड हा मूळचा वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यात असलेल्या किनखेडचा. दीड वर्षापूर्वी मुंबईत आला. बेस्ट मध्ये कंडक्टर म्हणून नोकरीला लागला. अलिकडे दिनेशला कायमस्वरुपी कर्मचारी करण्यात आले होते.

Advertisement सब्सक्राइब करा

सायन स्टेशन अपघात : सीसीटीव्ही व्हायरल

13 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता हा प्रकार घडला होता. यात दिनेश राठोडचा लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये चेंगरून मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना रेल्वे पोलिसांनी माहिती दिल्यानंतर आई, भावंडासह सगळ्यांवर मोठा आघात झाला. दिनेशचा उतरताना लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितलं, असं त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे.

वाचा >> Sion Station : पत्नीला धक्का लागताच लगावली कानशिलात, प्रवाशाचा लोकलखाली चिरडून मृत्यू

सायन स्टेशनवरील घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना दिनेशच्या मृत्यूचं नेमकं कारण कळलं. या आघाताने दिनेशच्या घरची परिस्थिती खूपच वाईट झालीये. आई दिनेशचा फोटो घेऊन रडत आहे. तर बहिणीने स्टेशनवरील बघ्यांवर संताप व्यक्त केलाय.

Advertisement

'त्याला वाचवण्यासाठी कुणीच पुढे आलं नाही'

मृत दिनेशची बहिणी म्हणाली, "आमच्या कुटुंबात कमावणारा दिनेश एकटाच होता. आता तोच राहिला नाहीये, आमचं कसं होणार. दिनेशने खाली पडल्यानंतर वर येण्यासाठी लोकांकडे मदत मागितली, पण कुणीच समोर आलं नाही. कुणीच त्याला मदत केली नाही', असं सांगताना त्याच्या बहिणीच्या अश्रूंचा बांध फुटला.

वाचा >> Kalyan Crime: आईसमोरच सपासप वार…! 12 वर्षाच्या मुलीने सोडला जीव

मिळालेल्या माहितीनुसार दिनेश बहीण आणि भावासोबत घणसोली येथे राहायला होता. ड्युटी संपवून घरी जायला निघाला होता, पण सायन स्टेशनवर एका दाम्पत्याने केलेल्या मारहाणीवेळी तो रुळावर पडला आणि चिरडला गेला.

वाचा >> ‘बायको आत्महत्या करेल सांगून शिंदेंकडून घेतलं मंत्रिपद’, भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब

ज्या पती-पत्नीने दिनेश राठोडला मारहाण केली, त्यांचं नाव अविनाश माने आणि शीतल माने असं आहे. ते मानखुर्द येथे राहतात. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जीआरपी पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शीतल माने आणि अविनाश माने या दोघांना अटक केली.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज