For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

पंकजा मुंडेंचा धक्कादायक गौप्यस्फोट! "मराठी असल्याने मलाही मुंबईत घर नाकारलं"

11:20 AM Sep 29, 2023 IST | भागवत हिरेकर
पंकजा मुंडेंचा धक्कादायक गौप्यस्फोट   मराठी असल्याने मलाही मुंबईत घर नाकारलं
मुलुंडमध्ये मराठी महिलेला ऑफिससाठी जागा देण्यास गुजराती व्यक्तीने नकार दिला. याबद्दल पंकजा मुंडेंनी त्यांचा अनुभव सांगितला.
Advertisement

Pankaja Munde on mulund : मुलुंड पूर्व मध्ये तृप्ती देवरुखकर या महिलेला ऑफिससाठी जागा देण्यास गुजराती व्यक्तीने नकार दिला. याचे तीव्र पडसाद उमटले. विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी यावर संताप व्यक्त केला. हा विषय चर्चेत असतानाच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी एक धक्कादायक अनुभव सांगितला. मराठी असल्याने मलाही मुंबईत घर देण्यास नकार दिला गेला, असा गौप्यस्फोट पंकजा मुंडेंनी केला आहे.

Advertisement Whatsapp share

'मुलुंडच्या एका मुलीच्या एका व्हिडियोवरून माझ्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या, या आहेत त्या भावना...', असं म्हणत पंकजा मुंडेंनी त्यांच्या भावना एका व्हिडीओतून मांडल्या आहेत.

Advertisement

पंकजा मुंडे काय बोलल्या?

"आताच राजकारणातलं वातावरण आणि एकूणच समाजातलं वातावरण इतकं सगळं असताना... इतकी सगळी समृद्धी असताना रस्ते आहेत. हायवे आहेत. लोकांना सगळ्या सुविधा आहेत. प्रत्येकाकडे गाड्या आहेत. साधनं आहेत. हे सगळं असतानाही समाजात कुठेतरी अस्वस्थता वाटते", अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

Advertisement सब्सक्राइब करा

आरक्षणाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडेंनी काय मांडली भूमिका?

"आरक्षणाची भाडणं सुरू आहेत. वेगवेगळ्या समाजाचे लोक... कुणी मुंडण करतंय. कुणी आंदोलन करतंय. हे बघून ह्रदयाला पिळ पडतो. त्याचबरोबर प्रत्येक रंगात माणूस वाटला गेला आहे. हिरवा आहे. भगवा आहे. पिवळा आहे. निळा आहे. हे सगळं बघून कधी कधी वाटतं की, हे सगळे रंग जोरात फिरवले ना चक्रावर तर पांढरा रंग दिसतो. तो शांततेचा रंग आहे. हा रंग कधी आपल्या देशाला व्यापेल याची मी प्रतिक्षा करतेय", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'मराठी माणसाला घर देणार नाही', पंकजा मुंडेंनी काय सांगितला अनुभव?

मुलुंडच्या घटनेबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "आज एका मराठी मुलीची व्यथा मी पाहिली. खरंतर भाषा आणि प्रातंवादामध्ये पडायला मला आवडतं नाही. माझ्या राजकीय प्रवासात मी कधीही जातीयवाद, धर्मावाद यावर टिप्पणी केली नाही. कुणी कोणत्या भाषेत बोलावं. कुणी कोणत्या भाषेत त्यांच्या घरांची, दुकानांची नावं ठेवावीत, यातही मी कधी उडी घेतली नाही."

Advertisement

हेही वाचा >> वसुंधरा राजेंना भाजपने शोधला पर्याय! कोण आहेत महाराणी दिया कुमारी?

"एक मुलगी जेव्हा रडून सांगत होती की, इथे मराठी माणसाला घर देत नाहीत. मराठी माणसाला इथे परवानगी नाही. हे सांगताना तिच्यासोबत जो प्रकार झाला, तो प्रकार मला अस्वस्थ करणारा आहे. कारण जेव्हा सरकारी घरं सोडून मला घर घ्यायचं होतं. तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की, मराठी लोकांना आम्ही इथे घर देत नाही", असा अनुभव पंकजा मुंडेंनी मुलुंडच्या घटनेबद्दल बोलताना सांगितला.

हेही वाचा >> ‘…तर त्या माणसाला आयुष्यातून उठवायचं?’, ‘मनातील मुख्यमंत्री’वरुन पंकजा मुंडेंचा कोणावर निशाणा?

"मी कोणत्या भाषेची बाजू घेत नाही. मुंबईचं सौंदर्य प्रत्येक भाषेने, धर्माने नटलेलं आहे. ही राजकीय नसून आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे. त्यामुळे इथे सगळ्यांच स्वागत आहे. परंतु आम्ही यांना घर देत नाही, असं जर काही बिल्डिंगमध्ये बोलत असतील, तर हे फार दुर्दैवी आहे", अशी खंत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.

हेही वाचा >> ‘विधानपरिषदेचा फॉर्म भरलेला, शेवटच्या क्षणी सांगितलं आता…’, पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट

"माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला. हे फार दुर्दैवी आहे. या देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक भाषेच्या दुसऱ्या राज्यातील लोकांना, कोणत्याही जातीच्या लोकांना घर देण्यासाठी परवानगीची आवश्यकता काय? हा माझा साधा प्रश्न आहे. गणपती विसर्जनाचा दिवस आहे. गणपतीचं विसर्जन करायचं नाही, तर गणेशाचा आशीर्वाद ठेवून सगळ्या नकारात्मकेचं विसर्जन करायचं. सगळ्या वादांचं, जाती-धर्म, प्रांत, भाषा याचं विसर्जन करायचं. असं नाही का ठरवू शकतं. तुम्हाला कसं वाटतं. माझी भूमिका कुणा एकासाठी नाही, तर सगळ्यांनी एक व्हावं यासाठी आहे", पंकजा मुंडे म्हणाल्या.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज