For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Sion Station : पत्नीला धक्का लागताच लगावली कानशिलात, प्रवाशाचा लोकलखाली चिरडून मृत्यू

05:28 PM Aug 17, 2023 IST | सौरभ वक्तानिया
sion station   पत्नीला धक्का लागताच लगावली कानशिलात  प्रवाशाचा लोकलखाली चिरडून मृत्यू
मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीचा लोकल खाली चिरडून मृत्यू झाला. एका कपलच्या मारहाणीत हा व्यक्ती रुळावर पडला होता.
Advertisement

Mumbai Sion Station Incident : मुंबईतील सायन (शीव) रेल्वे स्थानकावर एक संतापजनक घटना घडली. पत्नीला धक्का लागला म्हणून पतीने एका एसटी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे तोल जाऊन तो रुळावर पडला. वर चढत असतानाच लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये चिरडून त्याचा मृत्यू झाला. (A heart-wrenching incident came to light, local runs over man at sion railway station)

Advertisement Whatsapp share

मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सायन रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी होती. यावेळी एक महिला एसटी महामंडळात नोकरीला असलेल्या कर्मचाऱ्याला अचानक मारण्यास सुरुवात करते.

Advertisement

वाचा >> बापाच्या प्रेम प्रकरणाची मुलाला शिक्षा, प्रेयसीने गळा आवळून…घटनेने शहर हादरलं

महिला छत्रीने मारत असतानाच तिचा पती येतो आणि तो मयत व्यक्तीला जोरात कानशिलात लगावतो. अचानक मारल्याने व्यक्तीचा तोल जातो आणि तो प्लॅटफॉर्मवरून खाली कोसळतो. रेल्वे रुळावर पडल्यानंतरही महिला त्या व्यक्तीला छत्रीने मारते.

Advertisement सब्सक्राइब करा

तरीही ते मारतच होते...

दरम्यान, रेल्वे रुळावर पडल्यानंतरही पती-पत्नी त्या व्यक्तीला मारतच राहतात. त्याचवेळी डाऊन दिशेने जाणारी लोकल स्थानकाजवळ येते. त्यावेळी खाली पडलेला व्यक्ती प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, वेगाने आलेल्या लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकून तो घासत जातो. आणि रेल्वे खाली चिरडला जातो.

Kalyan Crime: आईसमोरच सपासप वार…! 12 वर्षाच्या मुलीने सोडला जीव

दरम्यान, त्यानंतर जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव दिनेश राठोड असं आहे. तो मुंबईतीलच रहिवाशी आहे. मयत एसटी महामंडळात नोकरीला होता.

Advertisement

मारहाण करणारे कोण?

ज्या पती-पत्नीने दिनेश राठोड यांना मारहाण केली, त्यांचं नाव अविनाश माने आणि शीतल माने असं आहे. ते मानखुर्द येथे राहतात. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जीआरपी पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शीतल माने आणि अविनाश माने या दोघांना अटक केली आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज