For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

'तुमची काही...', आराध्या बच्चनच्या 'त्या' फेक न्यूजवरून कोर्टाने कोणाला झापलं?

08:15 PM Apr 20, 2023 IST | मुंबई तक
 तुमची काही      आराध्या बच्चनच्या  त्या  फेक न्यूजवरून कोर्टाने कोणाला झापलं
Advertisement

Aaradhya Bachchan Fake news Petition : बॉलिवूड अभिनेता बिग बी अमिताभ बच्चन यांची नात, अभिषेक ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्य बच्चनला ( Aaradhya Bachchan) दिल्ली कोर्टाने (Delhi High Court) मोठा दिलासा दिला आहे. प्रत्येक मुलाला सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे मत कोर्टाने नोंदवत युट्यूबला फटकारले आहे. तसेच युट्यूबने आराध्या संबंधित युट्यूबवर सुरु असलेल्या खोट्या बातम्या हटवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत फेक न्युज न शेअर करण्याचा आदेश दिला आहे. (aaradhya bachchan viral fake health news high court slams youtube strict warning)

Advertisement Whatsapp share

प्रकरण काय?

आराध्य बच्चन ( Aaradhya Bachchan) हिने दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल केली होती. या याचिकेत आराध्य बच्चन हिने काही युट्यूब चॅनेलवर चालत असलेल्या फेक न्यूज हटवण्याची मागणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून आराध्या आजारी असल्याच्या बातम्या युट्यूबवर चालवल्या गेल्या होत्या. त्यामुळे तब्येतीची चुकीची माहिती दिल्याविरोधात आराध्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

Advertisement

हे ही वाचा : बॉलिवूडवर शोककळा! यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन

दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) या प्रकरणात युट्यूबला चांगलेच फटकारत प्रश्नांची सरबत्ती केली. फेक न्युज चालणार नाहीत यासाठी आपल्याकडे असे कोणतेही धोरण का नाही? तु्म्ही अपलोड केलेल्या व्हिडिओमधून जास्तीत जास्त नफा घेत नाही आहात का? अशा प्रकरणात युट्यूबची काहीच जबाबदारी नाही का? तुम्हाला लोकांना फेक न्यूज अपलोड केल्याप्रकरणी थांबवले नाही पाहिजे का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती उच्च न्यायालयाने केली.यासह तु्म्ही लोकांना व्यासपीठ देत आहात का?, असे म्हणू शकत नाही. तसेच या प्लॅटफॉर्मवर जे काही दाखवले जाईल त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात, असे देखील न्यायालयाने म्हटले.

Advertisement सब्सक्राइब करा

दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) स्टारकिड्स संदर्भात सुरू असलेल्या बातम्या हटण्याचे निर्देश दिले आहेत.यासोबतच अशा प्रकारचे फेक न्यूज शेअर करण्यास सांगितले आहे. उच्च न्यायालयाने या आदेशाचे पालन आठवड्याभरात करायला सांगितले आहे.यासोबत या संबंधित रिपोर्ट देखील मागवली आहे. तसेच उच्च न्यायालयाने 9 वेबसाईट आणि व्हिडिओ अपलोडरवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा : कबड्डीपटूशी लग्न ते कॅन्सरने निधन… इमोशनल आहे ACP प्रद्युम्न यांची Love Story

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज