For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

'Lust Stories 2' मध्ये दिसणार काजोल! ट्रेलरमध्ये नेमकं आहे तरी काय?

01:48 PM Jun 21, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
 lust stories 2  मध्ये दिसणार काजोल  ट्रेलरमध्ये नेमकं आहे तरी काय
Advertisement

Lust Stories 2 : ओटीटी प्लॅफॉर्मवर (OTT) 2018 साली प्रदर्शित झालेल्या लस्ट स्टोरीज या 4 शॉर्ट फिल्म असलेल्या सिरीजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याचा दुसरा सीझन बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता निर्मात्यांनी बुधवारी 21 जून रोजी ‘लस्ट स्टोरी 2’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे, जो पहिल्या सीझनपेक्षा अधिक मनोरंजक दिसत आहे. (Actress Kajol will be seen in Lust Stories 2 What exactly is in the trailer)

Advertisement Whatsapp share

ही शॉर्ट फिल्म 2023 च्या बहुप्रतिक्षित सिक्वेलपैकी एक आहे. जी नेटफ्लिक्सवर झळकणार आहे.

Advertisement

Suraj Chavan : आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्यांच्या घरासह 16 ठिकाणी ED चे छापे

‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये दिसणार ‘हे’ प्रसिद्ध कलाकार

तमन्ना भाटिया, नीना गुप्ता, विजय वर्मा, मृणाल ठाकूर, काजोल, कुमुद मिश्रा, अंगद बेदी आणि तिलोत्तमा शोम ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. आतापर्यंत या शॉर्ट फिल्मचे अनेक पोस्टर्स आणि टीझर रिलीज झाले आहेत. याचे दिग्दर्शन अमित रविंदरनाथ शर्मा, कोंकणा सेन शर्मा, आर.बाल्की आणि सुजॉय घोष यांनी केले आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांना प्रदर्शनाची उत्सुकता!

ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते आता ही शॉर्टफिल्म कधी प्रदर्शित होईल याची वाट पाहत आहेत. ‘लस्ट स्टोरीज 2’ 29 जूनपासून नेटफ्लिक्सवर प्रीमियर होईल.

TESLA : PM मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतल्यानंतर एलन मस्क यांची मोठी घोषणा

‘लस्ट स्टोरीज’ पहिल्या सीजनच्या यशानंतर, लोकप्रिय निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी आशी दुआ आणि नेटफ्लिक्सच्या सहकार्याने लस्ट स्टोरीज सीझन 2 तयार केला आहे. यामध्येही 4 वेगवेगळ्या स्टोरीज दिसणार आहेत.

Advertisement

ट्रेलरच्या प्रदर्शनाबाबत अभिनेत्री काजोलने पोस्ट शेअर करत दिली होती माहिती…

अभिनेत्री काजोलने लस्ट स्टोरीज सीझन 2 चा ट्रेलर कधी येतोय हे सांगणारी एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती. ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता कुमुद मिश्रा दिसत आहे. या नवीन पोस्टरवर ट्रेलरची रिलीज डेट 21 जून असल्याची माहिती दिली. काजोलने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘नेहमी लक्षात ठेवा… प्रेम मैत्री आहे. वासना देखील महत्वाची आहे. अन् #LustStories2 चा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे.’

 

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज