For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

'Adipurush' च्या निराशाजनक कामगिरीनंतर, प्रेक्षकांचा कोणत्या चित्रपटाकडे वाढला कल? कमाईत मोठी झेप!

03:48 PM Jun 19, 2023 IST | मुंबई तक
 adipurush  च्या निराशाजनक कामगिरीनंतर  प्रेक्षकांचा कोणत्या चित्रपटाकडे वाढला कल  कमाईत मोठी झेप
Advertisement

Adipurush Vs  Jara BJara Hatkeachake : विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ (Hatke Jara Bachake) हा या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. ‘मिमी’ आणि ‘लुका छुप्पी’ सारखे चित्रपट करणाऱ्या लक्ष्मण उतेकर यांना या चित्रपटाकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. पण या कौटुंबिक विनोदी चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिस कलेक्शनसह लोकांना आपलसं केलं. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. (After the dismal performance of Adipurush audience turn towards Jara Hatke Jara Bachake increase in earning)

Advertisement Whatsapp share

मिळालेल्या माहितीनुसार, ‘जरा हटके जरा बचके’चे बजेट 40 कोटी रुपये होते. पहिल्या आठवड्यातच 37 कोटींच्या कलेक्शनसह चित्रपटाने हिट कॅटेगरीत प्रवेश केला. दुसऱ्या आठवड्यातही विकी-साराच्या चित्रपटाने चांगली कमाई केली. दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंती बनला. ‘जरा हटके जरा बचके’च्या दुसऱ्या आठवड्यातील कलेक्शनमध्ये जवळपास 30% घट झाली आणि 25 कोटींहून अधिक कमाई झाली. दोन आठवड्यांत 60 कोटींहून अधिक कलेक्शन करून हा चित्रपट चांगलाच गाजला आहे.

Advertisement

Lok Sabha 2024 : शिंदे-ठाकरेंची मोर्चेबांधणी, पण हर्षवर्धन जाधवांमुळे होणार ‘करेक्ट कार्यक्रम’?

‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटासमोर ‘Adipurush’ चे आव्हान! पण…

तिसऱ्या आठवड्यात विकी आणि साराच्या चित्रपटासमोर मोठे आव्हान उभे राहिले. या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ‘आदिपुरुष’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ‘आदिपुरुष’च्या आगमनाने कमी बजेटमध्ये बनलेल्या ‘जरा हटके जरा बचके’चा बॉक्स ऑफिसवरचा प्रवास संपणार असल्याचा अंदाज होता. पण या चित्रपटाने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर थक्क केलं आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

Manisha Kayande: ‘आमदारकीसाठी मी उद्धव ठाकरेंच्या मागे लागली नव्हती, त्यांनीच…’, सगळंच सांगितलं!

विकी-साराचा ‘जरा हटके जरा बचके’ कमाईत ‘आदिपुरुष’पेक्षाही आघाडीवर!

प्रभासच्या भव्य चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ‘जरा हटके जरा बचके’चे गुरुवारी जवळपास 2 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन होते. पण शुक्रवारी ‘आदिपुरुष’चे प्रदर्शन झाल्याने त्याची कमाई निम्म्यावर आली आणि केवळ एक कोटी रुपये जमा झाले. विकी-साराचा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर फार कमाई करू शकणार नाही अशी अपेक्षा होती. पण पुन्हा एकदा या चित्रपटाने चकित केले आणि शनिवारी 1.89 कोटी रुपयांची कमाई केली.

Crime : अरे देवाSS! बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेने घेतला गळफास, कारण…

‘जरा हटके जरा बचके’ आणि ‘आदिपुरुष’मधली एक कॉमन गोष्ट म्हणजे दोन्ही चित्रपट कुटुंबासोबत पाहाता येणारे आहेत. मात्र शुक्रवारी ‘आदिपुरुष’ रिलीज झाल्यापासून चित्रपटातील संवादाची भाषा आणि इतर बऱ्याच गोष्टींवरून वाद निर्माण झाला आहे. रामायणावर आधारित या कहाणीत आधुनिक काळातील संवाद लोकांना फार आवडला नाही. ‘आदिपुरुष’चे डायलॉग इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. चित्रपटाच्या संवादांवरून वाद इतका वाढला आहे की, रविवारी निर्मात्यांनी या आठवड्यात वादग्रस्त संवाद बदलण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज