For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Akanksha Dubey आत्महत्या प्रकरणात नवा ट्वि्स्ट, दिग्गज अभिनेत्यावर हत्येचा आरोप

02:29 PM Mar 27, 2023 IST | मुंबई तक
akanksha dubey आत्महत्या प्रकरणात नवा ट्वि्स्ट  दिग्गज अभिनेत्यावर हत्येचा आरोप
Advertisement

Akanksha Dubey Death : भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हीने रविवारी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली होती. आता अभिनेत्रीच्या या आत्महत्या प्रकरणात (Akanksha Dubey Death) नवीन ट्विस्ट समोर आला आहे. अभिनेत्री आकांक्षा दुबे हीची आत्महत्या नव्हे तर हत्या झाल्याचा गंभीर आरोप आई मधु दुबे हिने केला आहे. यासोबत तिने इंडस्ट्रीतील काही अभिनेत्यांची नावे घेऊन हत्या केल्याचा आरोप केला आहे. आता मधु दुबे यांच्या आरोपात किती तथ्य आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.(akanksha dubey death samar singh and sanjay singh responsible for her death mother madhu dubey allegation)

Advertisement Whatsapp share

रविवारी 26 मार्चला अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. अभिनेत्रीच्या राहत्या घरी ही घटना घडली होती. गेल्या काही वर्षापासून ती डिप्रेशनचा देखील शिकार होती. याच डिप्रेशनमधून आत्महत्येसारखं टोकाच पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी तिने आत्महत्या केली होती, त्याच दिवशी तिचं नवीन नवीन गाण रिलीज झालं होतं. त्यामुळे चाहत्यांना आणि सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता.

Advertisement

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनच्या केसला वेगळं वळण; आधी खटला नंतर…

कुटूंबियांचा गंभीर आरोप

आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिच्या आत्महत्या प्रकरणानंतर कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. आकांक्षा दुबे कधी आत्महत्या करू शकत नाही,असे तिच्या काकीने म्हटले आहे.तर आईने या प्रकरणात मोठे आरोप केलेत. समर सिंह आणि संजय सिंह यांनी गेली तीन वर्ष आकांक्षाकडून करोडो रूपयांचे काम करवून घेतले होते, मात्र त्याचे पैसेच दिले नव्हते. तसेच 21 तारखेला संजय सिंहने आकांक्षाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबतची माहिती तिने मला फोनवरून दिल्याचे मधु दुबे यांनी सांगितले होते. त्यामुळे भोजपूरी गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांनी माझ्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आकांक्षा दुबे हिची आई मधु दुबे हिने केला आहे. वाराणसीत पोहोचल्यानंतर तिने हा आरोप केला आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

 

अभिनेत्री डिप्रेशनची शिकार

अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) 2018 ला डिप्रेशनमध्ये गेली होती. डिप्रेशनची शिकार झाल्यानंतर ती पडद्यापासून दूर झाली होती. नवीन आर्टीस्टना नवीन कलाकारांसारखी वागणूक दिली जात नाही. त्यामुळे आत्मविश्वासाला तडा जातो,अशी खंत तिने व्यक्त केली होती. त्यानंतर आकांक्षा दुबे हिने पडद्यावर पुन्हा पुनरागमन करण्याचे श्रेय तिच्या आईला दिले होते. दरम्यान या डिप्रेशनमुळेच तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीचा बाथरुममध्ये घसरुन मृत्यू

दरम्यान या प्रकरणात आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिने आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली याचा पोलिस तपास करत आहेत. तसेच आईने आकांक्षा दुबे हिच्या सहकलाकावर लावलेले आरोपात किती तथ्य आहे, याचा शोध घेतला जात आहे. या संपुर्ण प्रकरणाचा तपास पोलिस करत आहे. या तपासानंतर घटनेचा उलगडा होणार आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज