For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

बहीण हवी तर अशी... आलिया भट्टने बहिणीसाठी खर्च केले करोडो रुपये, पण कसे?

04:44 PM Apr 25, 2023 IST | मुंबई तक
बहीण हवी तर अशी    आलिया भट्टने बहिणीसाठी खर्च केले करोडो रुपये  पण कसे
Advertisement

Alia bhatt buys apartment in pali hill :बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (alia bhatt) मुंबईत दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. या फ्लॅट्सची किंमत करोडोंच्या घरात आहे. या दोन घरांपैकी एक फ्लॅट आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा (ranbeer Kapoor) आहे, तर दुसरा फ्लॅट हा आलिया तिची बहिण शाहिन भट्टला (shaheen bhatt) गिफ्ट देणार असल्याची माहिती आहे. आता ही घरं मुंबईतल्या कोणत्या ठिकाणी आहेत? तसेच या घराची किंमत किती आहे? हे जाणून घेऊय़ात. (alia bhatt buys apartment in pali hill rs 38 crores gifted to her sister shaheen bhatt)

Advertisement Whatsapp share

आलिशान फ्लॅटची किंंमत किती?

आलिया भट्ट (alia bhatt) सध्या प्रॉपर्टी खरेदी करण्यात व्यस्त आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्रींच्या नावे असलेले डॉक्युमेंट इंडेक्सटॅप कॉम वर पाहता येणार आहे. या डॉक्युमेंटनुसार, आलियाने खरेदी केले अपार्टमेंट 2,497 स्केअर फुट आहे. हे घर एरीयल व्यू को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडमध्ये आहे. आलियाने ही प्रॉपर्टी गोल्ड स्ट्रीट मर्कनटाईल कंपनीकडून खरेदी केली आहे. या फ्लॅटला 10 एप्रिल 2023 मध्ये रजिस्टर करण्यात आले होते. आलियाने हा फ्लॅट 37.80 करोडच्या किंमतीत खरेदी केला होता. यासोबतच 2.26 कोटीची स्टॅम्प ड्युटी भरली होती.

Advertisement

मीडिया रिपोर्टनुसार आलियाने (alia bhatt) दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. यामधील एक घर ती तिची बहिण शाहिणला गिफ्ट देणार आहे. एका वेबसाईटनुसार, आलियाने खरेदी केलेले हे दुसरे घऱ 7.68 करोडचे आहे. हे आलिशान घर एबी नायर रोड, जुहूच्या जीजी अपार्टमेंटमध्ये आहे. या फ्लॅटसाठी आलियाने 30.75 लाख स्टॅम्प ड्युटी भरली आहे.आलियाने ही संपुर्ण प्रॉपर्टी प्रोडक्शन हाऊस एटर्नल सनसाईन प्रोडक्शनच्या नावाने खरेदी केली आहे.

Advertisement सब्सक्राइब करा

कसे आहे आलियाचे घर?

आलियाच्या (alia bhatt) या घराचे कंस्ट्रक्शन सुरू आहे. आतापर्यंत अर्धे काम पुर्ण झाले आहे. मीड़िया रिपोर्टनुसार, आलिया आणि रणबीर कपूरचे नवीन घर 8 माळ्याचे असणार आहे. या घरात इनडोअर स्विमिंग, पूल, जिम, स्पा, ऑफिस स्पेस, प्लेइंग एरीया आणि पार्कींग सारख्या सुविधा आहेत. आलियाच्या या घरात रणबीर कपूरची आई नीतू कपूर देखील राहणार आहे.

दरम्यान वर्कफ्रंटबद्दल बोलायच झालं तर, आलियाचा (alia bhatt) हॉलिवूड सिनेमा हार्ट ऑफ स्टोन 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. तसेच आलियाचा आगामी हिंदी सिनेमा रॉकी औऱ रानी की प्रेम कहानी सिनेमाची शुटींग पुर्ण झाली आहे. या सिनेमात आलियासोबत रणवीर सिंह दिसणार आहे.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज