For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

भाऊ गमावला, आता बहिणीसाठी प्रार्थना...अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरसोबत काय घडतंय?

05:03 PM Apr 17, 2023 IST | मुंबई तक
भाऊ गमावला  आता बहिणीसाठी प्रार्थना   अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरसोबत काय घडतंय
Advertisement

Apurva Nemalekar : मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemalekar) हिच्या आयुष्यातील दु:ख संपता संपत नाही. नुकतंच अपूर्वाच्या 28 वर्षाच्या भावाचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) निधन झाल्याची घटना घडली होती. या दु:खातून सावरत असतानाच आता अपूर्वाने आणखीण एक धक्कादायक माहिती दिली आहे. अपूर्वाच्या मोठ्या बहिणीची प्रकृती ठिक नसल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी तिने सोशल मीडियावर पोस्ट करून माझ्या बहिणीसाठी प्रार्थना करा, असे आवाहन चाहत्यांना केले आहे. ही पोस्ट केल्याच्या काही तासानंतर तिने तिची पोस्ट डिलीट केली होती. त्यामुळे नेमकं अपूर्वाच्या आयुष्यात काय चालंलय असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. (apurva nemalekar share another post and appeal fans to pray for my sister)

Advertisement Whatsapp share

डिलीट केलेल्या पोस्टमध्ये काय?

अपूर्वा नेमळेकरच्या (Apurva Nemalekar) भाऊ ओमकार नेमळेकरचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे 15 एप्रिलला निधन झाले होते. या निधनानंतर अपूर्वाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले होते. आता या निधनानंतर अपूर्वाने तिची मोठी बहिण स्वामिनी नेमळेकरसाठी पोस्ट लिहली होती. माझे जग उद्ध्वस्त होते आहे असे दु:ख तिने पोस्टमध्ये सुरुवातीला व्यक्त केले होते. त्यानंतर मला प्रार्थनांवर विश्वास आहे. आता मला आशा आहे की माझी मोठी बहिण सुद्धा लवकरच बरी होईल, असे ती म्हणतेय. यासोबत कृपया तिला तुमच्या प्रार्थनेत ठेवा, असे आवाहन ती तिच्या चाहत्यांना करतेय. ही पोस्ट शेअर केल्याच्या काही तासानंतर तिने ती डिलीट केली होती.

Advertisement

कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे भावाचे निधन

अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemalekar) हिच्या 28 वर्षीय भावाचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) दु:खद निधन झाल्यानंतर तिने इंस्टाग्रामवर इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. अपूर्वाने इंस्टाग्रामवर भावासोबतचे फोटो शेअर करत सुरुवातीला त्याला श्रद्धांजली वाहिलीय. आयुष्यात कधी कधी नुकसान होते. हे नुकसान कधीच भरुन येत नाही. तुला गमावणे ही माझ्या जगण्यातली सर्वात कठीण गोष्ट आहे,असे अपुर्वा पोस्टमध्ये म्हणतेय.

Advertisement सब्सक्राइब करा

मी निरोप घ्यायला तयार नव्हते. मी तुला सोडायला तयार नाही. मी आणखी एका दिवसासाठी काहीही देईन, फक्त एक सेकंद. पण मी बिनशर्त प्रेमावर विश्वास ठेवायला शिकले आहे कारण मृत्यूबद्दलची एक गहन गोष्ट म्हणजे प्रेम कधीही मरत नाह,असे ती पोस्टमध्ये म्हणतेय.

 

Advertisement

View this post on Instagram

 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

काही बंध तोडता येत नाहीत. तू जरी शारीरिकदृष्ट्या नसलास तरी तु माझ्या मनात कायम आहेस. मी तुझे हृदय माझ्याजवळ ठेवेन. ज्या दिवशी मला बरे करण्याचे आणि वाढण्याचे धैर्य मिळेल त्या दिवशी मी ते घेऊन जाईन,असेही अपुर्वाने लिहलेय. कधीतरी आपण पुन्हा भेटू आणि आपण यापुढे वेळ किंवा जागेने वेगळे होणार नाही. पण तू माझ्यासोबत आहेस हे जाणून मला धीर मिळेल. मी तुझ्यावर प्रेम केले. नेहमी केले आहे, करत राहीन, कायमचे माझ्या मनात, माझ्या हृदयात मी तुला घेऊन जाईन. माझ्या बाळ भाऊ लवकरच भेटू अशी आशा आहे, असे शेवटी ती तिच्या पोस्टमध्ये म्हणतेय. अपुर्वाच्या या पोस्टवर अनेक चाहते तिच्या भावाला श्रद्धांजली वाहत आहे.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज