For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Arshad Warsi: 'मुन्नाभाई'तील सर्किटच्या खऱ्या आयुष्याची कहाणी वाचून तुमचाही फ्यूज उडेल!

04:07 PM Apr 19, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
arshad warsi   मुन्नाभाई तील सर्किटच्या खऱ्या आयुष्याची कहाणी वाचून तुमचाही फ्यूज उडेल
Advertisement

Bollywood : Arshad Warsi Birthday Special : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधील सर्किट आजही सर्वांना आठवतो. ही भूमिका साकारली होती अभिनेता अर्शद वारसीने (Arshad Warsi). त्याचा बुधवारी (19 एप्रिल) 55 वा वाढदिवस आहे. अरशदने आजपर्यंत प्रेक्षकांना भरभरून हसवलं आहे. पण, यामागे त्याने इथपर्यंत पोहचण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. अरशदने मुन्नभाई एमबीबीएस, धमाल, जॉली एलएलबी, गोलमाल, इश्किया यांसारख्या अनेक जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण, क्वचितच लोकांना हे माहिती आहे की, त्याला लहानपणापासून खूप दु:ख झेलावे लागले आहे. चला त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेऊयात.

Advertisement Whatsapp share

एकेकाळी सेल्समॅन म्हणूनही केले होते काम!

मुंबईत मुस्लिम कुटुंबात जन्म झालेल्या अर्शद वारसीला लहानपणापासूनच अडचणींचा सामना करावा लागला होता. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी आई-वडिलांचा गमावल्याने त्याला 10वी नंतर शाळा देखील सोडावी लागली होती. यानंतर त्याला मुंबईत राहण्यासाठी खूप मेहनत करावी लागलेली. घर चालवण्यासाठी अर्शदला 17व्या वर्षी काम करावे लागले. तो घरोघरी जाऊन कॉस्मेटिक्स सामान विकायचा. यानंतर त्याने फोटो लॅबमध्ये काम केले. यादरम्यान, त्याला अकबर सामीच्या डान्स ग्रुपमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि तिथून त्याचा नवा प्रवास सुरू झाला.

Advertisement

हे ही वाचा>> Pawar Vs Raut : ‘वकिली’ लागली जिव्हारी! संजय राऊत अजित पवारांना भिडले

पहिल्यांदा अर्शदला महेश भट्टच्या काश या चित्रपटात कोरियोग्राफर म्हणून ब्रेक मिळाला. यानंतर त्याने काही मागे वळून पाहिले नाही. अर्शदने लंडनमधील एक डान्स स्पर्धा जिंकली आणि ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकची कोरियोग्राफी करण्याची संधी त्याला मिळाली. यानंतर अमिताभ बच्चन यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट ‘तेरे मेरे सपने’मधून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण हा सिनेमा फ्लॉप ठरला. अर्शद वारसीने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले, परंतु त्याला खरी ओळख 2003 साली आलेल्या संजय दत्तसोबतच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटामधून मिळाली.

Advertisement सब्सक्राइब करा

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील आपल्या जबरदस्त अभिनयाने अर्शद प्रसिद्धीच्या झोतात…

बॉलिवूड इंडस्ट्रीत अर्शद वारसी गेल्या 36 वर्षांपासून काम करत आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत 50 हून अधिक चित्रपट केले, पण जेवढे यश मिळायला हवे होते तेवढे त्याला कधीच मिळाले नाही. त्यानंतर 2003 मध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आला, ज्यामध्ये त्याने सर्किटची भूमिका केली होती. अर्शदचे हे पात्र सर्वांनाच आवडते. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. हा चित्रपट मिळाला नसता तर त्याचे करिअर संपले असते, असे अर्शदने याआधी एका मुलाखतीत सांगितले होते. यानंतर अरशदचे अनेक मल्टीस्टारर कमर्शिअल हिट चित्रपट आले, ज्यांनी अभिनेत्याला एक नवी ओळख मिळाली.

महाराष्ट्र भूषण : 14 श्री सदस्यांचे मृत्यू चेंगराचेंगरीमुळे? Video ने शिंदेंच्या वाढवल्या अडचणी

एका मुलाखतीत अर्शद म्हणाला होता की, ‘पूर्वीच्या मॅनेजरमुळे मी माझ्या करिअरमध्ये झेप घेऊ शकलो नाही. तेरे मेरे सपने हा चित्रपट केल्यानंतर अनेक चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. पण दहा वर्षे असे चित्रपट करायला मिळत राहिले, ज्याला काही अर्थ नव्हता. माझे करिअर अशा टप्प्यावर आले होते जिथे चित्रपट ऑफर करण्यात आले होते जे अनेक ए-लिस्ट किंवा बी-लिस्ट कलाकारांनी नाकारलेले होते.’

Advertisement

एका विधानामुळे धार्मिक भावनांना दुखावत सापडला होता वादात

अर्शद 2015 मध्ये एका वादात सापडला होता. ज्याचा त्याने कधी विचारही केला नव्हता. अरशदने ट्विटरवर नागा साधूंबद्दल एक असभ्य टिप्पणी केली होती. यानंतर त्याच्याविरूद्ध अनेक सेलिब्रिटींनी वक्तव्य केले होते. त्याला जाळण्यापर्यंतच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याला लोक काहीही वाईट बोलू लागले. हे प्रकरण आणखी तापू लागले अखेर अर्शदने ते ट्वीट डिलीट केले आणि माफी मागितली.

Sanjay Raut : ‘किती पापं लपवणार?’, राऊत देवेंद्र फडणवीसांवर संतापले, दाखवला Video

तसेच, 2016 मध्ये द लिजेंड ऑफ माइकल मिश्रा या चित्रपटामुळेही त्याच्यावर संकट आले होते. यामध्ये एक डायलॉग होता ज्यामुळे अनेक हिंदू संघटन त्याच्यावरल भडकले होते. चित्रपटात अर्शद म्हणाला होता की, ‘डाकू वाल्मिकी वरून संत वाल्मिकी बनेल.’ यामुले त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. फोनवरून त्याला जिवंत जाळण्यात येईल असंही सांगितले होते. त्याचवेळी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. एका मुलाखतीत अर्शदने सांगितले होते की, त्याचा खून करण्यात येणार आहे अशीही त्याला तालिबान्यांकडून धमकी मिळाली होती.

सेबीने अर्शदवर घातली होती बंदी

अर्शद त्यावेळी अडचणीत सापडला होता ज्यावेळी त्याला सिक्योरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने बंदी घातली होती. यामध्ये त्याची पत्नी मारिया गोरेट्टीचंही नाव सामील होतं. अर्शदवर युट्यूब चॅनेलवर दिशाभूल करणारे व्हिडीओ अपलोड करून गुंतवणूकदारांना दोन कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केल्याचा आरोप होता. या आरोपांची चौकशी केल्यानंतर सेबीने या त्याला शेअर बाजारात एका वर्षासाठी बंदी घातली होती.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज