For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

2000 ची बॉडी बॅग 6800 ला! BMC कोविड सेंटर घोटाळा, ईडीच्या हाती स्फोटक माहिती

09:45 AM Jun 23, 2023 IST | दिव्येश सिंह
2000 ची बॉडी बॅग 6800 ला  bmc कोविड सेंटर घोटाळा  ईडीच्या हाती स्फोटक माहिती
2,000 रुपये किमतीची बॉडी बॅग 6,800 रुपयांना विकत घेतली, जास्त किमतीत खरेदी केली औषधे, BMC कोविड सेंटर घोटाळ्यातील मोठा खुलासा
Advertisement

BMC Covid Centre Scam : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कोविड सेंटर घोटाळ्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने मुंबई महापालिकेच्या कार्यालयातही कागदपत्रांची झाडाझडती घेतली. या तपासात ईडीच्या हाती खळबळजनक माहिती हाती लागली आहे. 2000 रुपयांची बॉडी बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. बीएमसीच्या तत्कालीन महापौरांच्या सूचनेवरून हे कंत्राट दिले गेले होते.

Advertisement Whatsapp share

ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, कोविडसाठी बीएमसीने खरेदी केलेली औषधे बाजारात 25 ते 30 टक्के स्वस्त होती. म्हणजे बीएमसीने कोरोनाची औषधे चढ्या किमतीत खरेदी केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे अशा पद्धतीच्या नोटिसा जारी करण्यात आल्यानंतरही महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष केले.

Advertisement

लाईफलाईनबद्दल ईडीला काय मिळाले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या तपासात असेही समोर आले आहे की, लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटने जम्बो कोविड सेंटरमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांची नियुक्ती बीएमसीच्या बिलिंगमध्ये दर्शविलेल्या नियुक्त्यांपेक्षा 60-65% कमी होती. बिले काढण्यासाठी लाइफलाइन कंपनीकडून जम्बो कोविड सेंटरच्या संबंधित केंद्रामध्ये चुकीच्या पद्धतीने काम करत असलेल्या किंवा काम न करणाऱ्या डॉक्टरांची नावे दिली गेली.

Advertisement सब्सक्राइब करा

हेही वाचा >> कोविड सेंटर घोटाळा: IAS संजीव जयस्वाल यांच्या नावे 100 कोटींची मालमत्ता?

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईडीने गुरुवारी मुंबई महानगरातील जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करताना झालेल्या नियमिततेची चौकशी करण्यासाठी मुंबई नागरी संस्थेच्या केंद्रीय खरेदी विभागातही कागदपत्रांची तपासणी केली.

मालमत्तांच्या कागदपत्रांसह असंख्य वस्तू केल्या जप्त

अधिकाऱ्याने सांगितले की, ईडीची टीम बीएमसीच्या सेंट्रल पर्जेस डिपार्टमेंट म्हणजेच सीपीडीमध्ये गेली होती. यावेळी सुजीत पाटकर यांच्यासह अन्य तीन भागीदारांशी संबंधित फर्मला दिलेल्या निविदा आणि कंत्राटाबाबतची कागदपत्रे तपासण्यात आली.

Advertisement

कोविड घोटाळ्याच्या संदर्भात बुधवारी ईडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. माहितीनुसार, सुमारे 150 कोटी रुपयांच्या 50 हून अधिक स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, 15 कोटी रुपयांचे दागिने, मोबाइल फोन, लॅपटॉप इत्यादी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि 2.46 कोटी रुपयांच्या विविध आक्षेपार्ह नोंदी/कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा >> 17 तास ED ची धाड, सूरज चव्हाणांचे WhatsApp चॅट्स आले समोर

ईडीने बुधवारी पाटकर यांच्या निवासस्थानासह 15 ठिकाणी छापे टाकले होते. आणखी सांगायचं म्हणजे सुजीत पाटकर हे शिवसेना (UBT) राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या जवळचे मानले जातात.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, इतर ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्यात IAS अधिकारी संजीव जयस्वाल आणि शिवसेना (UBT) पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांचाही समावेश आहे. मुंबई पोलिसांनी पाटकर आणि त्यांच्या तीन साथीदारांविरुद्ध गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

सुरज चव्हाणच्या चॅट ईडीच्या हाती

सूत्रांनी सांगितले की, कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आझाद मैदान पोलीस एफआयआरमधील आरोपींशी सूरज चव्हाण यांच्या चॅट्स ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत. चव्हाण यांनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, पाटकर यांचे भागीदार आणि लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे डॉ. हेमंत गुप्ता, आरोपी राजू साळुंखे आणि संजय शहा यांच्यासोबतच्या या चॅट्स आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी कोणताही अनुभव नसतानाही लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला कंत्राट देण्याच्या निर्णयावर सूरज चव्हाण यांनी हस्तक्षेप करत प्रभाव टाकला होता. चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असून ठाकरे नुकतेच चव्हाण यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेले होते. दुसरीकडे बीएमसीच्या कोविड सेंटर कंत्राट देण्याच्या प्रकरणात ईडीला चव्हाण यांच्यावर संशय आहे.

IAS संजीव जयस्वाल यांच्या नावावर 100 कोटींहून अधिकची मालमत्ता

कोविड सेंटर घोटाळ्याच्या संदर्भात बुधवारी ईडीने छापेमारी करत झाडाझडती घेतली आणि 15 हून अधिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यादरम्यान आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला.

संजीव जयस्वाल हे सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष आहेत. कोविड काळात ते बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त होते. झडतीदरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांना जयस्वाल यांच्या कुटुंबीयांच्या नावे अनेक मालमत्तांची कागदपत्रे सापडली. मिळालेल्या माहितीनुसार, अशा 24 मालमत्तांची कागदपत्रे सापडली असून, ती बहुतांश मुंबई आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आहेत. बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त होण्यापूर्वी जयस्वाल हे ठाणे महापालिका आयुक्त होते.

हेही वाचा >> Covid Centre scam : ठाकरेंच्या नेत्यांना अडचणीत आणणारं ‘हे’ प्रकरण काय?

ईडी अधिकाऱ्यांना त्याच्या निवासस्थानातून सुमारे 100 कोटी रुपयांच्या अंदाजे 24 मालमत्तेची कागदपत्रे व्यतिरिक्त 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची एफडीची कागदपत्रे सापडली आहेत. या प्रकरणावर बोलताना जयस्वाल म्हणाले की, ‘ही मालमत्ता सुमारे 34 कोटी रुपये आहे आणि ती आपल्या सासरची आहे. त्यांनी ती आपल्या पत्नीला भेट दिली होती. या एफडी आपल्या सासरच्यांनी पत्नीलाही भेट दिलेल्या आहेत’, असा दावा त्यांनी केला.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज