For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

शोककळा! पहिल्या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच दिग्दर्शक स्वप्निल मयेकरचे निधन

06:20 PM May 04, 2023 IST | मुंबई तक
शोककळा  पहिल्या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच दिग्दर्शक स्वप्निल मयेकरचे निधन
Advertisement

Director Swapnil Mayekar passed away : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक-लेखक स्वप्निल मयेकर (Director Swapnil Mayekar) यांचे गुरूवारी (4 मे) निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट शुक्रवारी (5 मे) प्रदर्शित होणार होता. मात्र, त्याआधीच स्वप्नील मयेकर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Director Swapnil Mayekar passed away before the release of his first Marathi film)

Advertisement Whatsapp share

स्वप्नील यांचे 4 मे रोजी पहाटे चेंबूर घाटलागाव याठिकाणी राहत्या घरी निधन झाले. या घटनेने त्यांची पत्नी आणि दोन मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिलाच चित्रपट होता. पण हा क्षण अनुभवण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूची बातमी आली. संपूर्ण मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

NCP: शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार, राजीनाम्याच्या निर्णयावर यू-टर्न?

स्वप्नील यांनी ‘हा खेळ संचिताचा’ ह्या दूरदर्शन मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शन केले होते. त्यांनी ‘हम है धर्मयोद्धा’ या भोजपुरी सिनेमाचे दिग्दर्शन व अनेक मराठी सिनेमांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. पण स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची ही पहिलीच वेळ होती.

Advertisement सब्सक्राइब करा

‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटात अभिनेता चिराग पाटील, सिद्धी पाटणे, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी या कलाकारांनी काम केले आहे. चित्रपटातील ‘हाऊ पोऱ्या अनेर काठणा’ हे गाणे सध्या चर्चेत आहे. ते प्रेक्षकांना फार आवडलेही आहे. हे गाणे चिराग पाटीलवर चित्रित झाले आहे. एका दिवसानंतर सिनेमा प्रदर्शित होणार होता. परंतु आदल्याच दिवशी अचानक स्वप्नील यांचे निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Advertisement
Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज