For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Video Viral : 'हिंदीत बोलू नको...', AR Rehman ने पत्नी सायरा बानोला सगळ्यांसमोरच टोकलं

06:16 PM Apr 27, 2023 IST | मुंबई तक
video viral    हिंदीत बोलू नको      ar rehman ने पत्नी सायरा बानोला सगळ्यांसमोरच टोकलं
Advertisement

AR Rahman : ऑस्कर विजेता सुप्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार एआर रहमानचे (AR Rahman) नाव आज जगविख्यात आहे. आपल्या सुंदर गाण्यांनी एआर रहमानने चाहत्यांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. पण आता नुकताच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एआर रहमान पत्नी सायरा बानोसोबत दिसला.

Advertisement Whatsapp share

लवकरच चित्रपटगृहात ‘पोनियिन सेल्वन 2’ (Ponniyin Selvan 2) हा चित्रपट झळकणार आहे. या चित्रपटाचा संगीतकार ए.आर. रहमान हा आपल्या पत्नीसह पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आला होता. यावेळी त्यांने भाषण दिले. तामिळ भाषेत बोलताना एआर रहमान म्हणाला की, ‘सायरा त्याच्या मुलाखती पुन्हा पुन्हा पाहते, जेणेकरून ती त्याची चूक लक्षात घेऊन त्याला सांगू शकेल.’ यानंतर रहमान आपल्या पत्नीला माईक देतो आणि तिला हिंदी नव्हे तर तामिळमध्ये बोल असे सांगतो. (Don’t talk in Hindi AR Rahman stopped his wife fans were upset)

Advertisement

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 11 वाहनांचा भीषण अपघात; अनेक जण जखमी

एआर रहमानच्या या विधानावरून नेटकरी नाराज…

रहमानने सायराला माईक देत हिंदी बोलण्यास टोकल्याने चाहते नाराज झाले आहेत. त्याचे हे विधान ऐकून सायरा थोडी लाजलीही होती. त्याचवेळी तिथे उपस्थित प्रेक्षक जोरात हसले. सायरा म्हणते की, ‘तिची तामिळ भाषा चांगली नाही, त्यामुळे ती आता इंग्रजीत बोलणार आहे.’ पुढे सायरा म्हणाली, ‘तुम्हा सर्वांना शुभ संध्याकाळ. माफ करा, मला तामिळ भाषा नीट बोलता येत नाही म्हणूनच मी इंग्रजीत बोलते. मी खूप आनंदी आहे कारण ए आर रहमानचा आवाज माझा आवडता आहे. मी त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडले होते. मी एवढेच म्हणू शकेन.’

Advertisement सब्सक्राइब करा

‘जयंत पाटलांसारखा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री हवा…’, अमोल कोल्हे असं का म्हणाले?

एआर रहमानने वेगवेगळ्या भाषेतील फिल्म इंडस्ट्रीजमध्ये काम केले आहे, परंतु त्याला तमिळ भाषेची वेगळीच ओढ आहे. याआधी एहान भट्टने त्याला हिंदीत प्रश्न केला तेव्हा संगीतकार 99 गाण्यांच्या लॉन्चिंगच्या वेळी स्टेजवरून निघून गेला. वास्तविक, रहमानने 99 गाणी सह-लेखन आणि निर्मिती केली. यादरम्यान एहान आणि रहमानचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. एहान हिंदीत प्रश्न विचारत असताना रहमानने मधेच हिंदी शब्द उच्चारला आणि रहमान स्टेजवरून खाली उतरला. रहमान नंतर म्हणाला की, ‘मी तुम्हाला तामिळ भाषा येते की नाही असे विचारले होते, पण तुम्हाला ते समजले नाही.’ पण, त्यावेळी रहमानने मस्करी केली होती.

एआर रहमान आणि सायरा बानोचे लग्न 1995 मध्ये झालेले. त्यांना खतिजा, अमीन आणि रहीमा अशा तीन मुली आहेत. त्यांची मुलगी खतिजा रहमान तिच्या गाण्यांपेक्षा लुक्समुळे जास्त चर्चेत असते. खतिजा तिचा चेहरा नेहमी हिजाबने झाकून ठेवते. आजपर्यंत तिला कोणी पाहिले नाहीये. मागे या कारणामुळे एआर रहमानला खूप ट्रोलही केले गेले होते.

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज