For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Ayesha Shroff keyword : जॅकी श्रॉफच्या पत्नीला लाखोंचा गंडा! प्रकरण काय?

06:40 PM Jun 09, 2023 IST | रोहिणी ठोंबरे
ayesha shroff keyword   जॅकी श्रॉफच्या पत्नीला लाखोंचा गंडा  प्रकरण काय
Advertisement

Fraud With Ayesha Shroff : ऑनलाईन असो की ऑफलाईन दररोज आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना कानावर येतात. यात अगदी सुशिक्षित आणि सेलिब्रिटीही बळी ठरत आहे. आता प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफच्या पत्नीला लाखो रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement Whatsapp share

जॅकी श्रॉफच्या पत्नीसोबत काय घडलं?

जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफला 58 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. तिची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आयशाच्या तक्रारीनुसार, अ‍ॅलन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीने तिची 58 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. त्यानंतर ती तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली. आरोपीविरुद्ध भादंवि कलम 420, 408, 465, 467 आणि 468 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विलंब न लावता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Advertisement

Mumbai Tak Chavadi : सगळ्यांना भिडणारे संजय राऊत नेमकं कुणाला घाबरतात?

माहितीनुसार, 2018 मध्ये अ‍ॅलन यांना MMA मॅट्रिक्स कंपनीमध्ये डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती. MMA मॅट्रिक्स ही टायगर श्रॉफ आणि त्याची आई आयशा चालवणारी जिम आहे. आरोपींनी भारतात आणि भारताबाहेर 11 टूर्नामेंटची योजना बनवली होती, असेही म्हटले जात आहे. यासाठी त्यांनी कंपनीकडून मोठी रक्कमही घेतली होती. डिसेंबर 2018 ते जानेवारी 2023 पर्यंत या स्पर्धेसाठी कंपनीच्या खात्यात 58,53,591 रुपये जमा करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावर आयशाने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

Advertisement सब्सक्राइब करा

आयशा श्रॉफची फसवणूक करण्याची ही पहिलीच वेळ नाही!

सुप्रिया सुळे ज्या प्रकरणावरुन पारा चढला, ‘ती’ सोलापुरातील धक्कादायक घटना जशीच्या तशी!

आयशा श्रॉफला फसवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी आयशाचा अभिनेता-इन्फुएन्सर साहिल खानसोबतही वाद झाला आहे. 2015 मध्ये आयशाने साहिलविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. यासोबतच त्याच्यावर धमकावल्याचाही आरोप होता. हे प्रकरण चार कोटी रुपयांच्या फसवणुकीचे होते, जे परस्पर सामंजस्याने निकाली काढण्यात आले.

 

Advertisement

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज