For the best experience, open
https://m.mumbaitak.in
on your mobile browser.
Advertisement

Mumbai Heavy Rain : रस्त्यांचे कालवे, स्टेशनवर धबधबे; मुंबईतील ही दृश्ये बघा

01:43 PM Jun 25, 2023 IST | मुंबई तक
mumbai heavy rain   रस्त्यांचे कालवे  स्टेशनवर धबधबे  मुंबईतील ही दृश्ये बघा
पहिल्या पावसात मुंबईतील मान्सून पूर्वतयारीच्या कामाचे पितळ उघडे पडल्याचे दिसले. अंधेरीतील सबवे दरवर्षी प्रमाणे यंदाही पाण्याखाली गेला.
Advertisement

Heavy Rain Alert in Mumbai : मान्सून मुंबईत दाखल होण्यापूर्वीच कोसळलेल्या सरींनी शहरातील अनेक भागात दयनीय अवस्था दिसली. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागांत पावसाचे प्रचंड पाणी साचले. तर अनेक ठिकाणी वाहनही पाण्यात अडकली. तर घाटकोपर भागात बहुमजली इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली. पहिल्या पावसामुळे मुंबईत पाणी साचलेल्या विविध ठिकाणचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Advertisement Whatsapp share

तब्बल दोन आठवडे उशिराने आलेल्या पावसाने मुंबईत जोरदार सलामी दिली. शनिवारी पावसाचा जोर इतका होता की, मुंबईच्या वाहतुकीचा वेग मंदावला होता. मुंबई, मुंबई उपनगरात शनिवारी (24 जून) पावसाचा जोर कायम राहिल्याने सायंकाळपर्यंत अनेक भागात प्रचंड पाणी भरले होते.

Advertisement

मुंबईतील पावसाचे व्हिडीओ व्हायरल

पहिल्या पावसात मुंबईतील मान्सून पूर्वतयारीच्या कामाचे पितळ उघडे पडल्याचे दिसले. अंधेरीतील सबवे दरवर्षी प्रमाणे यंदाही पाण्याखाली गेला. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवावी लागली. सबवे मध्ये रिक्षा,चारचाकी अडकल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काहींनी गाड्या दोरीने बांधल्याची दृश्येही समाजमाध्यमांवर चांगली व्हायरल झाली.

Advertisement सब्सक्राइब करा

Rain Update in Maharashtra : मान्सून मुंबईत! पुणे, नागपूरसह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंट अलर्ट!

Kolhapur : बलात्कार प्रकरण अन् पत्नी, मुलाला पाजले विष; स्वतःचा चिरला गळा!

Pune, MPSC: ‘दर्शना पवारला राहुल दीदी, दीदी… बोलयचा’, धक्कादायक माहिती समोर

रेल्वे स्थानकांना गळती

मुंबईतील काही रेल्वे स्थानकांत पाण्याची गळती झाली. सोशल मीडियावर हे व्हिडीओ शेअर केले गेले असून, अनेकांनी रेल्वे स्टेशनमध्ये धबधबे बघा म्हणत खिल्ली उडवली आहे.

‘देवेंद्रजी तुमच्या परिवाराचेही WhatsApp चॅट…’, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी डिवचलं

दहिसर भागातही पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यांचे कालवे झाले होते. साकीनाका मेट्रो स्थानकाबाहेर भयावह स्थिती निर्माण झाली होती. भर पावसात कचरा जमा करण्याचे काम महापालिका कर्मचाऱ्यांकडून सुरू होते.

Advertisement googlenews
Tags :
Advertisement
Advertisement
×

.

tlbr_img1 बातम्या tlbr_img2 व्हिडिओ tlbr_img3 शॉर्ट्स tlbr_img4 वेब स्टोरीज